' कित्येकांच्या लव्हस्टोरीचा अनमोल भागीदार असलेल्या युनिनॉर कंपनीचा बाजार उठला कारण.. – InMarathi

कित्येकांच्या लव्हस्टोरीचा अनमोल भागीदार असलेल्या युनिनॉर कंपनीचा बाजार उठला कारण..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्याची कपल्स ज्यांना मस्करीत निब्बा नीब्बी म्हणतात, त्यांच्यातली भांडणं आपल्या कानावर आली तरी आपल्याला हसूच येईल.

“ब्लु टिक येऊनसुद्धा रीप्लाय का दिला नाही?” “लास्ट सीन ऑफ का आहे?”, “मला ब्लॉक केलंयस का?” सध्याच्या तरुणाईच्या तोंडावर जेव्हा अशी वाक्यं ऐकायला मिळतात तेव्हा त्यांचं आयुष्य टेक्नॉलजीमध्ये गुरफटलंय याची जाणीव होते!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सध्याची पिढी ही ऑनलाइन पिढी आहे असं म्हंटलं तरी अतिशयोक्ति ठरणार नाही. ऑनलाइन पेमेंटपासून ते थेट डेटिंग आणि लग्नापर्यंत सगळ्या गोष्टी सध्या एका टचवर होऊ लागल्या आहेत.

 

online dating IM

 

मुकेश अंबानी यांनी लोकांना सुरुवातीला फुकट फास्ट इंटरनेट स्पीडची सवय लावून वोडाफोन, एयरटेलसारख्या मोठ्या कंपन्यांचा बाजार उठवला. आज याच जीयोच्या आधारावर अर्ध्याहून अधिक देश अवलंबून आहे.

पण जियोच्या ४जी जमान्यातल्या तरूणांना २जी, ३जी च्या काळातला स्ट्रगल समजणं अशक्य आहे. १० रुपयापासून ५०० रुपयापर्यंत रीचार्ज करण्यासाठी जवळच्या दुकानात जायचं त्यांच्याकडून एक कागद घेऊन यायचा, त्या कागदाच्या मागचा नंबर एखाद्या कॉईनने खोडायचा, आणि मग तो नंबर डायल करून रीचार्ज करायचा.

 

scratch card IM

 

हा स्ट्रगल सध्याच्या खाडकन एका फटक्यात गुगलपे वरून रीचार्ज करणाऱ्या पिढीला समजणं जरा कठीणच आहे. एक काळ असा होता जेव्हा टींडर ऐवजी जोडपी रोजच्या १०० फ्री मेसेजेसच्या जिवावर दिवसभर चॅटिंग करायचे, आणि त्यातूनच नाती फुलायची.

रीचार्जचे जास्ती रेट, फ्री एसएमएस, मिस्ड कॉल्सच्या जमान्यात त्या काळात एका कंपनीने कित्येक प्रेमी जोडप्यांना, कॉलेजमधल्या तरुण तरुणींना दिलासा दिला ती कंपनी म्हणजे यूनिनॉर.

कमी रेटमध्ये जास्त मिनिटं कॉलिंग, फ्री मेसेजेस स्कीम्स यामुळे या कंपनीने कमी वेळात तरुणांवर पकड घेतली पण याहून त्यांची सर्वात चर्चेत असलेली स्कीम म्हणजे युनिनॉर टू युनिनॉर मोफत कॉलिंग!

फक्त ३५ रुपयांत आठवडाभर भरपेट बोलायची सोय युनिनॉरने केली आणि त्यावेळेस त्यांच्या सीमचा जोरदार खप झाला. कित्येक तरुणांनी लपून छपून त्यांच्या गर्लफ्रेंडला युनिनॉरचं सीमकार्ड घेऊन दिलं होतं!

 

uninor IM

 

बांग्लादेशी किंवा पाकिस्तानी वाटणारी कंपनी ही भारतात आली तरी कशी आणि त्यांना त्यांचा गाशा का गुंडाळावा लागली याविषयीच आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत!

भारतातल्या टेलिकॉम पॉलिसीज बदलल्यानंतर नोर्वे देशातल्या टेलिनॉर कंपनीने २००८ मध्ये भारतात आपलं जाळं पसरवायचं ठरवलं आणि त्यासाठी युनिटेक कंपनीची मदत घेतली, आणि अशा अर्थाने भारतात युनिनॉरचा जन्म झाला!

तेव्हाच्या स्पर्धेतल्या वोडाफोन किंवा एयरटेल आयडियासारख्या कंपन्या त्यांच्या पोस्टपेडवर फोकस करण्यात मग्न होत्या, पण युनिनॉरने भारतातल्या तरुणाची नस अगदी अचूक ओळखली आणि स्वतःचा जम बसवायला सुरुवात केली आणि केवळ २ वर्षात त्यांनी ३० लाख ग्राहकांपर्यंत मजल मारली.

कित्येक तरुणांकडे त्यावेळेस २ नंबर असायचे, एक इतरांसाठी आणि एक खास व्यक्तीशी तासंतास गप्पा मारण्यासाठी, याच दरम्यान टाटा डोकोमोनेसुद्धा अशाच भन्नाट स्कीम्स काढून यूनिनॉरला टक्कर द्यायचा प्रयत्न केला खरा पण तब्बल ४ वर्षं युनिनॉरने एकहाती मार्केट काबिज केलं!

 

tata docomo IM

 

२०१२ मध्ये मात्र भारतीय सरकारने काही टेलिकॉम लायसन्स रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि अशा रीतीने युनिनॉरची तब्बल २२ लायसन्स रद्द करण्यात आली, हा कंपनीसाठी मोठा झटका होता.

यानंतर एकंदरच युनिनॉरची मार्केटवरची पकड कमी होऊ लागली, त्यांची पार्टनर कंपनी युनिटेकसोबतदेखील बरेच खटके उडू लागले, प्रकरण अगदी कोर्टापर्यंत गेलं आणि शेवटी युनिटेकने आपली भागीदारी परत घेतली आणि कंपनीचं नाव पुन्हा टेनिनॉर झालं.

आधीच कमी असलेले रेट त्यांनी आणखीन कमी केले पण त्याचाही काही परिणाम झाला नाही, जनरेशन २जी वरून ३जी वर शिफ्ट व्हायला सुरुवात झाली होती, सोशल मीडिया फोफावायला सुरुवात झाली आणि या सगळ्या शर्यतीत मागे पडलं.

 

uninor 2 IM

 

नंतर २०१८ मध्ये भारती एयरटेलने युनिनॉर विकत घेतली आणि कित्येक भारतीय तरुणांच्या प्रेम कहाणीची साक्ष देणाऱ्या या कंपनीचा अध्याय समाप्त झाला!

आजही ९० च्या काळातल्या तरुणांना उत्तम टेलिकॉम कंपनी कोणती असं विचारलं तर ते टाटा डोकोमो आणि युनिनॉर याच कंपन्यांची नावं घेतील, सध्याच्या “जेवलीस का?” कॅटेगरीमधल्या तरूणांना त्या फ्री मेसेजेस आणि कमी रेटमध्ये मिळणारं अनलिमिटेड कॉलिंगची गंमत नाही कळणार!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?