' ह्यांच्यामुळे खिलाडीपासून बिग बी पर्यंत सर्व मोठे स्टार्स कुठेही बिनधास्त फिरतात!

ह्यांच्यामुळे खिलाडीपासून बिग बी पर्यंत सर्व मोठे स्टार्स कुठेही बिनधास्त फिरतात!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

आमीर खान पासून सलमान खान पर्यंत सगळ्यांच्या भोवती नेहमीच अंगरक्षकांचा गराडा दिसतो, परंतु हा प्रश्न अनेकांना सतावतो की, ज्यांचे स्वतःचे सिक्स पॅक्स आणि जबरदस्त बॉडी आहे त्यांना अंगरक्षकाची काय गरज काय? तर मित्रांनो शेवटी ते आहेत पडद्यावरचे हिरो, त्यांना प्रत्यक्षात तशी हिरोगिरी दाखवता येणार नाही, म्हणून सुरक्षेसाठी त्यांच्या भोवती नेहमी अंगरक्षक असतात, जे गर्दीपासून आणि कोणत्याही संकटापासून त्यांचे रक्षण करतात. आपल्या सगळ्यांचे हे प्रसिद्ध कलाकार कोणत्याही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जातात किंवा कुठे बाहेर शूटिंगसाठी जातात तेव्हा त्यांचा अनेक वेड्या चाहत्यांशी सामना होता जे त्यांची एक झलक मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जातात.अशाच चाहत्यांकडून वाचण्यासाठी काही स्टार्सनी वैयक्तिक अंगरक्षक देखील ठेवले आहेत.

 

१. सलमान खान – शेरा

shera-marathipizza01
theyouthmagazine.com

शेरा बॉलीवुड मध्ये ‘भाई ऑफ दी बॉडीगार्ड्स’च्या नावाने ओळखला जातो. तो गेल्या १८ वर्षापासून सलमान बरोबर आहे. शेरा म्हणतो की,

मी आयुष्यभर सलमान खानचा बॉडीगार्ड बनून राहीन.

सलमान खानने ‘बॉडीगार्ड’ चित्रपट शेराला समर्पित केला होता आणि या चित्रपटाच्या ट्रेलर मध्येही त्याला लाँच केले होते.

 

२. शाहरुख खान – यासीन खान/रवी सिंह

shaharukh-bodyguard-marathipizza01
post.jagran.com

बॉलीवुड मध्ये या ६ फुट ३ इंच लांब माणसाला सर्वच ओळखतात. याला शाहरुख बरोबर राहून एका दशकाहून अधिक वेळ झाला आहे. यासीन खानला त्याच्या लग्नात शाहरुखने एक फ्लॅट गिफ्ट केला होता. त्या आधी यासीन मन्नत मध्येच राहत होता. परंतु, आता यासीनने स्वतःची सुरक्षा कंपनी सुरु केली आहे आणि आता रवी सिंह शाहरुखचा नवीन अंगरक्षक आहे.

 

३. अमिताभ बच्चन – जितेंद्र शिंदे

amitab-bodyguard-marathipizza
in.bookmyshow.com

जितेंद्र शिंदे याला अमिताभ बच्चन यांच्या पाठीचा कणा मानले जाते. घरात असो, शूटिंग मध्ये असो किंवा मुलाखतीमध्ये, जितेंद्र प्रत्येकवेळी त्यांच्या बरोबर असतो. जितेंद्र शिंदे याची स्वतःची सुरक्षा कंपनी असून सुद्धा तो अमिताभ बच्चन बरोबर नेहमी असतो.जेव्हा Elijah Wood भारतात फिरायला आले होते,तेव्हा त्यांचा सुरक्षेची जबाबदारी देखील जितेंद्र शिंदेवरच होती.

 

४. आमिर खान – युवराज घोरपडे

amir-khan-bodyguard-marathipizza
in.bookmyshow.com/

एका मुलाखतीत अभिनेता रोनित रॉयने सांगितले होते की, त्याने दोन वर्ष आमिर खानचा सिक्युरिटी हेड म्हणून काम पहिले आहे. त्यानंतर तो Ace नावाच्या एजन्सीचा मालक झाला. आमिर खानचा सध्याचा अंगरक्षक आहे मराठमोळा तरुण – युवराज घोरपडे!

 

५. अक्षय कुमार – श्रेयस ठेले

akshay-kumar-bodyguard-marathipizza
thestorypedia.com

’खिलाडी’ अक्षय कुमारचा सुद्धा वैयक्तिक अंगरक्षक आहे ही गोष्ट फारशी कोणाला माहित नाही. पण ऐकून तुम्हाला अभिमान वाटेल की या सुपरफिट स्टारचे रक्षण करतो श्रेयस ठेले. अतिशय हुशार बॉडीगार्ड म्हणून अक्षय कुमार त्याची नेहमी स्तुती करतो. सध्या अक्षय कुमारचा मुलगा आरव याच्या सुरक्षेची जबाबदारी सुद्धा त्याचाच हातात आहे.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?