' सर्व विवाहित पुरुषांनी तर या फळाचं सेवन नियमित करायलाच हवं! – InMarathi

सर्व विवाहित पुरुषांनी तर या फळाचं सेवन नियमित करायलाच हवं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सुंदर दिसणं, उत्तम सौंदर्याने आपली खास छाप पाडणं, ही काही फक्त स्त्रियांचीच मक्तेदारी आहे असं म्हणता येणार नाही. बॉलिवूडमध्ये अनेक चॉकलेट हिरो तयार होऊ लागले आणि छान दिसण्याचं महत्त्व पुरुष वर्गालाही कळू लागलं असं म्हटलं, तरी ते अगदीच चुकीचं ठरत नाही.

आता हँडसम दिसायचं म्हणजे मग केस, चेहरा, त्वचा, बॉडी या सगळ्या गोष्टी अगदी आकर्षक असायला हव्यात, हे काही वेगळं सांगायला नको. या आणि अशाच इतरही काही फायद्यांसाठी, एक फळ मोठं वरदान ठरतं.

 

hrithik roshan IM

 

ते फळ म्हणजे अंजीर! ओला अंजीरही खाता येतोच, मात्र सुक्यामेव्यामध्ये हा गडी अगदी महत्त्वाचं स्थान राखून आहे. असा हा अंजीर पुरुष वर्गाने अगदी आवर्जून आणि नियमितपणे खाल्ला पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

चला जाणून घेऊया, नियमित अंजीर खाण्याचे काही खास फायदे…

१. साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते :

 

sugar test inmarathi

 

अंजीर हे पोटॅशियमचे उत्तम प्रमाण असणारे फळ आहे. पोटॅशियम असल्यामुळे साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण राहण्यास मदत होते. भिजवलेले अंजीर खाल्ल्यामुळे, शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास सहाय्य्यता मिळते.

नुसता अंजीर खायला आवडत नसेल, तर अंजीर स्मूदीसारखे टेस्टी प्रकार ट्राय करायला काहीच हरकत नाही. खाण्यात थोडी रुचिही येईल आणि रक्तातील सारेच प्रमाणही नियंत्रित राहील.

२. बद्धकोष्ठता दूर :

 

constipation IM

 

हल्लीच्या बैठ्या जीवनशैलीत अन्नपचन ही एक समस्या ठरतेय, असं म्हणायला हवं. अन्नपचन नीट न होण्याचा एक परिणाम म्हणजे बद्धकोष्ठता! या समस्येवरील एक उत्तम उपाय म्हणून अंजीर खाणं फायदेशीर ठरतं.

फायबरचं पुरेपूर प्रमाण असणारा अंजीर रोज आहारात असला, तर ही समस्या दूर व्हायला नक्कीच मदत होईल.

३. वजन नियंत्रणासाठी उपयुक्त :

 

weight loss IM

वजन नियंत्रित ठेवायचा असेल, तरीही अंजीर फार मदत करू शकतो बरं का मंडळी! आता तुम्ही म्हणाल, सुक्यामेव्यातील हा सदस्य वजन कसं नियंत्रित करणार. हीदेखील त्यात असणाऱ्या फायबरची कमाल आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात अंजीर खाल्ला, तर पुरेशा फायबरमुळे अन्नपचन नीट होऊन वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

अर्थात, अंजीर कॅलरी सुद्धा मुबलक प्रमाणात देतो, त्यामुळे अतिसेवन वजन वाढवण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतं.

४. हाडांची मजबुती :

 

bones inmarathi

 

हाडं हा शरीराचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत. त्यांना मजबूत ठेवण्याचं काम सुद्धा अंजीर करू शकतो. अंजिरामधील कॅल्शियम हाडांना बळकटी देतं आणि मजबूत ठेवतं.

५. हृदयाचा टिक टिक सुरळीत :

 

heart attack inmarathi

 

रक्तदाब नियंत्रित ठेवण्याची क्षमता असलेला अंजीर हृदयासाठी खूपच फायदेशीर ठरतो. योग्य रक्तदाबामुळे, हृदयाकडील रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज निर्माण होत नाही. रक्तप्रवाह सुरळीत राहून आपोआपच हृदयाची क्रिया सुरळीत सुरु राहते.

६. लैंगिक ताकद वाढवतो :

 

sexual health IM

 

अंजिरामध्ये असणारे मॅग्नेशियम सेक्स हार्मोन्स निर्माण करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे योग्य प्रमाणात ऊर्जा मिळून, लैगिक क्षमता वाढायला मदत होते. त्यामुळे खासकरून विवाहित पुरुषांनी तर याचे सेवन नियमित करायलाच हवे!

७. केसांची वाढ :

 

hair growth IM

 

अंजीरमध्ये अनेक पोषकद्रव्ये असतात. ही सगळीच पोषक द्रव्ये, केसांची निगा राखण्यासाठी आणि वाढीसाठी अतिशय उपयोगी असतात. त्यामुळेच अंजीर फळाचे नियमित सेवन लांब आणि दाट केस मिळण्यासाठी फारच उपयोगी आहे.

८. त्वचेवरील तजेला :

 

glowing skin IM

 

अंजीर हा सी व्हिटॅमिनचा सुद्धा महत्त्वाचा स्त्रोत आहे. त्यामुळेच त्वचा सुरुकुत्या नसणारी आणि उत्तम तजेला असणारी राहण्यास मदत होते. अंजीरमधील फायबर अन्नपचनास उपयुक्त ठरत असल्याचा फायदा सुद्धा त्वचेसाठी होत असतो.

९. रोगप्रतिकार शक्ती वाढवतो :

 

immune system inmarathi

 

अनेक पोषकद्रव्यांचा खजिना असणारा अंजीर, रोग प्रतिकारशक्ती वाढवतनसता तरच नवल! अंजिराचे नियमित सेवन व्हायरस, बॅक्टेरिया आणि जंतांपासून शरीराला अपाय होणार नाही याची काळजी घेते.

असे अनेक आरोग्यदायी फायदे देणारा अंजीर रोजच्या आहारात असायलाच हवा, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. तुम्हाला सुद्धा अंजिराच्या सेवनाचे आणखी काही फायदे माहित आहेत का? असतील, तर कमेंटमधून नक्की कळवा.\

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?