' योग्य फिटिंगची ‘ब्रा’ कशी घ्याल? मोजमाप करण्याची योग्य पद्धत बघा – InMarathi

योग्य फिटिंगची ‘ब्रा’ कशी घ्याल? मोजमाप करण्याची योग्य पद्धत बघा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

स्त्रियांच्या कपड्यांमध्ये आपल्याला ढिगाने वैविध्य आढळतं. फक्त फॅशनेबल कपडेच नाहीत, तर स्त्रियांच्या अंतर्वस्त्रांमध्येदेखील खूप वेगवेगळ्या गोष्टी, प्रिंट्स आढळतात, पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, की या अंतर्वस्त्रांबाबतच्या अनेक गोष्टी खुद्द स्त्रियांनाच माहित नसतात.

यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘ब्रा’ची साईज. अनेक स्त्रियांना त्यांच्या ब्रा ची साईज काय आहे, हेच कळत नाही. ऑनलाईन ब्रा मागवताना बऱ्याच स्त्रियांना साईजची समस्या येते, कोणत्या साईजची ब्रा मागवायची हा प्रश्न स्त्रियांना पडतो.

 

bra im

 

अनेकदा फार विचार न करता स्त्रिया चुकीच्या साईजच्या ब्रा घालतात, पण असं करणं आरोग्यासाठी धोक्याचं आहे. खूप सैल किंवा अगदीच घट्ट ब्रा घातल्याने तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

असं होऊ नये, यासाठी आपण योग्य साईज समजून तशीच ब्रा निवडली पाहिजे. इतर कपड्यांप्रमाणे स्त्रिया दुकानात ब्रा घालूं बघू शकत नाहीत, त्यामुळे बऱ्याचदा अंदाजपंचे ब्रा ची खरेदी होते. असं होऊ नये, यासाठी आम्ही खास महिलांसाठी घेऊन आलो आहोत, ब्रा ची साईज मोजण्याच्या खास टिप्स –

१. ब्रा चा बेल्ट जोथे येतो, म्हणजेच तुमच्या ब्रेस्टचा खालचा भाग इंच टेप घेऊन मोजा.

२. यानंतर बस्ट साईज, म्हणजेच ब्रेस्टचा गोलाकार भाग असतो, तो इंच टेपने मोजा.

३. बेल्टची साईज तुमच्या ब्रा ची साईज असते आणि बस्ट साईजने तुम्हाला तुमची कप साईज समजू शकेल.

 

bra im 1

 

४. आता कप साईज कसा समजेल? ब्रा साईजमधून तुमची बेल्ट साईज वजा करा. बेल्ट साईज ३६ आणि ब्रा साईज ३९ असेल. तर ३९-३६ म्हणजेच ३. ३ इंच म्हणजे c कप. यावरून तुम्हाला कळेल, की तुमच्या ब्रा च्या साईज ३६c आहे.

५. जर तुमची बेल्ट साईज विषम संख्या आली असले, तर त्यापेक्षा एक साईज मोठी पकडा. म्हणजे ४१ आली असले, तर ४२ आकडा धरा.

अशाप्रकारे तुमच्या ब्रा ची साईज मोजा आणि मगच दुकानात ब्रा खरेदी करायला जा. अंदाजपंचे, आवडलीये म्हणून चुकीच्या साईजची ब्रा घालू नका. याने नको ते होऊन होऊन बसेल, त्यामुळे ब्रा ची योग्य साईज इंच टेपने मोजा आणि त्यानंतरच ऑनलाईन मागवा.

कोणत्या कपड्यांमध्ये कोणती ब्रा घालायची आहे, याचा विचार करा. हल्ली मार्केटमध्ये विविध प्रकारच्या ब्रा उपलब्ध आहेत. त्यांचा योग्य रिसर्च करा. व्यायाम करताना कम्फर्टेबल ब्रा घाला.

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?