' या विचित्र कारणामुळे थेट लग्नातच पोलिसांनी केली वधू- वराला अटक – InMarathi

या विचित्र कारणामुळे थेट लग्नातच पोलिसांनी केली वधू- वराला अटक

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

लग्नसोहळा म्हटलं, की सगळीकडे अगदी हवीहवीशी धांदल असते. वातावरणात आनंद भरून राहिलेला असतो. भावी आयुष्याची सुंदर स्वप्नं रंगवत वधू-वर आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात करणार असतात.

आपलं लग्न आपल्यासाठी आणि इतरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरवा असं आपल्यातल्या अनेकांना वाटत असतं. लग्न जरी एकाच दिवशी असलं तरी ज्यांचं लग्न व्हायचं असतं त्यांच्या घरात त्या आधीचे बरेच दिवस लग्नाचं वातावरण असतं.

चित्रपटांमध्येही बघायला मिळणार नाही इतक्या नाट्यमय गोष्टी कुठल्या लग्नात घडलेल्या तुम्ही पाहिल्या आहेत? म्हणजे मूळ लग्न राहिलं बाजूलाच आणि एखादी भलतीच गोष्ट समोर यावी आणि रंगाचा बेरंग व्हावा असं काही? विश्वास बसणार नाही अशी एक विचित्र घटना एका लग्नात घडली आहे.

 

marraige inmarathi

 

त्या लग्नात नवरीने होणाऱ्या नवऱ्याच्या आधीच्या बायकोचा ड्रेस चोरून घातला होता. भर लग्नात या वधू-वराला अटक झाली आणि समारंभाचा विचका होऊन लग्नाला आलेल्या सगळ्यांना आपापल्या घरी परतावं लागलं. काय घडलं होतं नेमकं?

ऍडम आणि चेलसी या जोडप्याच्या लग्नात ही घटना घडली. चेलसीशी लग्न होण्यापूर्वी ऍडमचं मेरीशी लग्न झालं होतं आणि त्यांचा अनेक वर्षे संसार झाला होता. ते दोघे एकाच ऑफिसमध्ये पण वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करायचे.

मेरीला वेगळं करियर करायचं होतं म्हणून तिने कंपनी सोडली. ऍडम आणि मेरी या दोघांसोबत काम केलेल्या त्यांच्या एका ३८ वर्षीय कलीगने ‘रेडीट’वर घडल्या घटनेविषयी सविस्तर माहिती दिलीये.

तिच्या म्हणण्यानुसार, मेरी ही तिला भेटलेल्या माणसांपैकी सगळ्यात प्रेमळ आणि छान व्यक्ती आहे. त्यामुळे जेव्हा मेरी ऍडमसोबत घटस्फोट घेणार असल्याचं कळलं तेव्हा ते ऐकून त्यांच्या कलीगला धक्का बसला, पण ऍडमने तिची प्रतारणा केली असल्याने मेरीने हा निर्णय घेतला होता.

 

divorce-in-india InMarathi

 

आपल्याला मेरीसाठी वाईट वाटतंय असं त्या सहकारी मैत्रिणीने मेरीला सांगितलं. त्या दोघी गप्पा मारायच्या तेव्हा मेरी ऍडमच्या मागे कधीही त्याच्याविषयी वाईटसाईट बोलली नाही. अशा परिस्थितीत मेरी स्वतःला किती चांगल्या प्रकारे सांभाळतेय हे पाहून या सहकारी मैत्रिणीला फार बरं वाटलं.

 एक दिवस मेरी आणि ऍडमच्या राहत्या घरातून मेरी आपलं सामान हलवत असताना आपला लग्नाचा ड्रेस आणि तिच्या कुटूंबीयांकडून तिला मिळालेल्या काही मौल्यवान वस्तू, दागिने गायब झाले असल्याचं तिच्या लक्षात आलं. आपण या गोष्टी दुसरीकडे कुठेतरी ठेवल्या असतील आणि आपल्याला त्या सापडतील असं मेरीला वाटलं.

या सगळ्याला काही वर्ष लोटली. मेरी आणि ऍडमची कलीग आता ऍडमच्याच विभागात काम करत होती. ज्या स्त्रीमुळे ऍडमने मेरीला फसवलं होतं त्या चेलसीशी तो आता लग्न करणार होता. त्याने संपूर्ण विभागाला लग्नाचं आमंत्रण दिलं.

मेरीची काही हरकत नाही हे लक्षात आल्यावर मेरी आणि ऍडमच्या त्या कलीगनेही लग्नाला जायचं ठरवलं. लग्नाच्या दिवशी त्या कलीगला असं दिसलं, की मेरी आणि ऍडमच्या लग्नाच्या फोटोंमध्ये मेरीने जो ड्रेस घातला होता तसाच ड्रेस चेलसीने घातलाय.

 

wedding im

 

 

त्यामुळे काही विचार न करता त्या कलीगने पटकन फोटो काढून मेरीला पाठवला आणि तुझ्याच ड्रेससारखा हा ड्रेस दिसतोय ना? असं तिला विचारलं. मेरीने तो मेसेज पाहिला पण त्यावर ती काही बोलली नाही. त्यानंतर तासाभरात लग्न होतं त्या स्थळी खुद्द पोलिसच येऊन हजर झाले.

मेरीनेच पोलिसांना फोन करून घडला प्रकार सांगितला होता. मेरीने पूर्वी ऍडमला तू माझा लग्नाचा ड्रेस आणि दागिने पाहिलेस का असं विचारलं होतं, पण आपण ते पाहिले नसल्याचं ऍडमने तिला सांगितलं. फोटो बघितल्यावर ऍडम आपल्याशी खोटं बोलला हे मेरीच्या लक्षात आलं आणि तिने याबाबत पोलिसात तक्रार केली.

आपल्या होणाऱ्या नवऱ्याच्या आधीच्या पत्नीचा ड्रेस चोरून स्वतःच्या लग्नात घालणं हा प्रकार चेलसीने का केला असेल? ऍडमच्या सांगण्यावरून केला असेल का? याचा खल करायला गेलं तर नुसता गोंधळ उडेल. त्यामुळे त्यात पडायला नको, पण थेट पोलिसांनी या जोडप्याचा समाचार घेत चेलसीला तिने घातलेला ड्रेस आणि दागिने काढायला सांगितले.

 

keral police inmarathi

 

तिने ते करायला नकार दिला आणि पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. ऍडमनेही पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. ते दोघे पोलिसांशी उर्मटपणे बोलत होते त्यामुळे त्यांना पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये नेलं. लग्नाला आलेल्या मंडळीना लग्न सोडून हाच तमाशा बघावा लागला आणि त्या सगळ्यांना नाईलाजाने आपापल्या घरी परतावं लागलं.

पोलिसांनी त्या दोघांना जामीन दिल्यावर चेलसीला पोलीस स्टेशनमध्येच तो ड्रेस आणि दागिने काढून द्यावे लागले. त्यानंतर ऍडम जेव्हा कामावर परतला तेव्हा तो अतिशय वैतागला होता. तू आमचे लग्नाचे फोटो मेरीला का पाठवलेस असं म्हणत त्याने त्यांच्या त्या कलिगला बरीच दूषणं दिली.

वरची सबंध घटना बुचकळ्यात पाडणारी आहे. रोजच्या जगण्यात काय कमी समस्या असतात का म्हणून लग्नासारखी घटना जी अतिशय आनंदाची असायला हवी त्यातही लोकांना नको त्या समस्या निर्माण करून स्वतःचा आणि दुसऱ्याचाही वेळ फुकट घालवायला सुचतं? आधी मेरीच्या आयुष्याचा आणि मग स्वतःच्याच लग्नाचा खेळखंडोबा केलेलं हे अजब जोडपं यापुढे स्वतःचा संसार तरी बरा करेल की नाही हे त्यांचं नशीबच जाणे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?