' भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या रामनाथ कोविंद यांच्याबद्दल जाणून घ्या!

भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून निवड झालेल्या रामनाथ कोविंद यांच्याबद्दल जाणून घ्या!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक जसजसी जवळ येते होती, तसतश्या राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात कमालीच्या घडामोडी घडत होत्या. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने आपल्या पसंतीचा व्यक्ती राष्ट्रपतीपदावर विराजमान व्हावा यासाठी जोराने प्रयत्न सुरु केल्याचे दिसून आलेच. पण त्यांनी तर अनपेक्षितरित्या धक्का देत रामनाथ कोविंद या भारतीय जनतेसाठी अपरिचित असलेल्या चेहऱ्याला पुढे केले. या खेळीने विरोधक तर बावचळलेच. एक दलित नेता म्हणून मिडीयाने त्यांची ओळख उचलून धरली. मग काय, विरोधकांनी देखिल दलित उमेदवार मीरा कुमार यांना पुढे करत प्रभावी नसलेली पण नाईलाजाने खेळावी लागलेली चाल पुढे केली. पहिल्यापासूनच राम नाथ कोविंद यांचे पारडे जड होते आणि निकालही अपेक्षित लागला. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे १४ वे राष्ट्रपती म्हणून राम नाथ कोविंद विराजमान झाले.

ramnath-kovind-marathipizza01
indianexpress.com

७१ वर्षीय रामनाथ कोविंद हे कानपूरमधील दलित नेते आहेत. १९९४-२००० आणि २०००-२००६ असे सलग दोन वेळा उत्तर प्रदेश मधून ते राज्यसभेसाठी निवडून आले होते. ८ ऑगस्ट २०१५ पासून ते बिहारचे राज्यपाल म्हणून काम पाहत आहेत. व्यवसायाने ते वकील असून सध्या दिल्ली न्यायालयात प्रॅक्टीस करत आहेत.

ramnath-kovind-marathipizza02
navbharattimes.indiatimes.com

भारतीय जनता पार्टीचा उत्तर प्रदेशमधील दलित घटकांचा खंदा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. १९९८ ते २००२ या काळात त्यांनी भारतीय जनता दलित मोर्चाचे अध्यक्षपद देखील भूषवले आहे. तसेच अखिल भारतीय कोळी समजाचे देखील ते अध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीत प्रवक्ते या नात्याने देखील त्यांनी पक्षासाठी काम केले आहे.

ramnath-kovind-marathipizza03
governor.bih.nic.in

एक सक्षम पर्याय म्हणून सत्ताधारी पक्षातर्फे रामनाथ कोविंद यांना पुढे करण्यात आले. आता येणाऱ्या काळात त्यांच्या वावरणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पटलावर काय पडसाद उमटतात ते पहाचे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?