' सोशल मीडियावरून चक्क खुनाची सुपारी घेणारा दुर्लभ कश्यप...

सोशल मीडियावरून चक्क खुनाची सुपारी घेणारा दुर्लभ कश्यप…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही दिवसांपूर्वी औरंगबादमधल्या एका पान विक्रेत्या तरुणावर फुकटात विडी सिगरेट न दिल्यामुळे चाकू, तलवारी याने जीवघेणा हल्ला करण्यात आला होता, चक्क एका मोकळ्या मैदानावर या तरुणाला चाकू, तलवारीने भोसकण्यात आलं.

सुदैवाने त्या तरुणाचे मित्र तिथे धावून आले आणि त्याचा जीव वाचला. ५ फेब्रुवारीच्या या घटनेत काही लोकांना पोलिसांनी अटकदेखील केली. त्यांच्यापैकी २ जण तर दोन दिवस आधीच पोलिस कोठडीतून बाहेर आले होते.

 

aurangabad inmarathi

 

गेल्या काही दिवसांत औरंगाबादमधील गुन्ह्यांचे प्रमाण ही वाढलेले दिसून आले आहे. तरुणांची गुंडांची टोळी आणि बेधडकपणे कोणावरही होणारे जीवघेणे हल्ले यावर पोलिसांचादेखील काहीच वचक राहिलेला नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

विशेष म्हणजे या टोळीतले तरुण दुर्लभ कश्यपला मानतात असं समोर आलं आहे. हा दुर्लभ कश्यप नेमका होता तरी कोण? गुन्हेगारी वर्तुळात त्याचं वर्चस्व का होतं? त्यांची गुन्हे करण्याची स्टाईल याविषयी आपण जाणून घेऊयात!

कपाळावर लाल गंध, डोळ्यात काजळ, आणि खांद्यावर नॅपकिन अशा अवतारात दुर्लभ कश्यप या तरुणाने उज्जैनमधल्या लोकांची एकेकाळी झोप उडवली होती. दुर्लभ हा किशोरवयात असतानाच गुंडगिरीविश्वात आला, सोशल मीडियावर खुलेआम सुपारी घेण्याची कामं तो  करू लागला.

 

durlabh kashyap IM

 

२०२० मधल्या गॅंगवॉरमध्ये दुर्लभ कश्यप ठार झाला, पण गुन्हा करण्याच्या त्याच्या स्टाईलने तरुण पिढी मात्र बिघडली. आजही कित्येक तरुण गुंड ही स्वतःला दुर्लभ कश्यपचे फॅन म्हणवून घेतात, औरंगाबादमधली टोळकीसुद्धा याच दुर्लभ कश्यपप्रमाणे काम करते!

उज्जैनचा रहिवासी असलेला दुर्लभ कश्यप हा वयाच्या १६ व्या वर्षीच गुन्हेगारी विश्वात आला. इतर गुंडांप्रमाणे तो लपून छपून काम करत नसे तर सोशल मीडियावर तो खुलेआमपणे “कोणाची सुपारी द्यायची असेल तर मला संपर्क साधा” असं आव्हान करत असे.

त्याच्या या सोशल मीडिया अकाऊंटमुळे कित्येक तरुण त्याचे फॅन झाले, त्याच्यासोबत काम करू लागले. खून, मारामारी, हफ्ता वसूली अशी कामं ही दुर्लभ कश्यप गॅंग करत असे.

 

durlabh kashyap gangs IM

 

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की या गॅंगचं सोशल मीडिया अकाऊंट हॅंडल करणारी एक टीम होती. त्या अकाऊंटच्या माध्यमातून अशाच गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन दिलं जायचं जेलमधल्या कैद्यांचे फोटोज त्यावरून शेयर केले जायचे.

वयाच्या १८ व्या वर्षी दुर्लभवर ९ वेगवेगळ्या केसेस रजिस्टर केल्या गेल्या.  २०१८ च्या दरम्यान दुर्लभला पोलिसांनी अटक केली खरी पण जेलमध्ये जाऊनसुद्धा त्याच्या गॅंगच्या कारवाया काही कमी झाल्या नाहीत.

२०२० दरम्यान कोरोना काळात दुर्लभची सुटका झाली खरी पण गुन्हेगारी विश्वात फक्त वन वे तिकीट असतं, तो मार्ग एकदा निवडला की परतीचे सगळे मार्ग बंद होतात. दुर्लभ तुरुंगातून सुटला खरा, पण त्याने स्वतःचा एवढे शत्रू तयार केले होते की त्यातच दुर्लभचा शेवट झाला.

 

durlabh kashyap 2IM

 

गुन्हेगारी विश्वातला पोस्टर बॉय बनलेला दुर्लभ कश्यप २० व्या वर्षीच एका गॅंगवॉरमध्ये मारला गेला. दुर्लभ मारला गेला पण त्याच्या नावावर आजही उज्जैनमध्ये कित्येक गॅंग कार्यरत आहेत.

त्याच्या स्टाईलप्रमाणे त्या गॅंगसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुपारी घेत आहेच. आधी फक्त या गॅंग उज्जैनमध्येच दिसायच्या. आता या दुर्लभ कश्यपला फॉलो करणारे तरुण महाराष्ट्रातसुद्धा सर्रास दिसू लागले आहेत.

खुलेआमपणे ही तरुण मंडळी स्वतःला दुर्लभ कश्यपचे फॅन म्हणवत आहेत. एकंदरच ही परिस्थिति फार भीषण आहे. सोशल मीडियाचा आपल्या जीवनाव केवढा प्रभाव आहे हे आपल्याला या दुर्लभ प्रकरणावरुण जाणवलं असेलच!

 

durlabh kashyap fb IM

 

सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारी विश्वावर स्वतःचा प्रभाव टाकणाऱ्या दुर्लभ कश्यपप्रमाणेच या इतर तरूणांचा दुर्दैवी अंत होऊ नये, आणि वेळीच त्यांना त्यांच्या कृत्याची जाणीव होऊन ते यातून बाहेर पडावेत अशीच आशा आपण करुयात!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?