' पुलवाम्याच्या दहशतवादी हल्ल्यामागचा ‘हा’ आहे खरा मास्टरमाइंड – InMarathi

पुलवाम्याच्या दहशतवादी हल्ल्यामागचा ‘हा’ आहे खरा मास्टरमाइंड

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

१४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. पण समस्त भारतीयांसाठी या दिवसाची एक कधीही पुसली जाणार नाही अशी अत्यंत कटू ओळख आहे.

 

pulvama attack im

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

तीन वर्षांपूर्वी याच दिवशी आपल्या देशाला पुलवामाचा भीषण दहशतवादी हल्ल्याने हादरवून टाकलं होतं. या दुर्दैवी घटनेला आणखीन काळं फासणारी गोष्ट ही की ज्या ‘जैश-ए-महंमद’च्या दहशतवाद्याने हा हल्ला केला होता तो आदिल दार आपल्याच देशातला दक्षिण काश्मीरमधल्या काकेपुरा या ठिकाणचा होता.

या अत्यंत घृणास्पद हल्ल्यात आपल्या तब्बल ४० CRPF जवानांना प्राण गमवावे लागले होते. त्यांच्या या हौतात्म्याचं देशाला कदापीही विस्मरण होणार नाही.

त्यानंतर भारताने ‘सर्जिकल स्ट्राईक’ करून या आणि अशा हल्ल्यांच्या विरोधात एक सणसणीत चपराक दिली. पुढे त्यावर ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपटदेखील आला.

 

URI IM

 

आदिल दारने जरी हा हल्ला केला असला तरी या हल्ल्यामागचा खरा मास्टरमाइंड निराळाच आहे. जम्मू आणि काश्मीरच्या ‘टॉप इंटेलिजन्स एजन्सी’च्या म्हणण्यानुसार पाकिस्तानस्थित ‘जैश-ए -महंमद’चा कमांडर गाझी अब्दुल रशीद हा या हल्ल्यामागचा मास्टरमाइंड आहे. ‘जैश-ए-महंमद’चा प्रमुख मौलाना मसूद अजहरच्या जवळच्या मदतनीसांपैकी तो एक आहे.

गाझी रशीद हा ‘आयईडी’ एक्स्पर्ट असून त्यानेच पुलवामावर हल्ला केलेल्या आदिल दारला प्रशिक्षण दिलं होतं. गाझी रशीदने हा हल्ला झाला त्याच्या आदल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये आपल्या दोन सहकाऱ्यांसमवेत काश्मीरमध्ये घुसखोरी केली होती. मसूद अजहरने त्याला त्याची दोन भाचरं तलाह रशीद आणि उस्मान यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात पाठवलं होतं.

 

uri 1 im

मसूद अजहरचा दुसरा भाचा उस्मान हा जैश-ए-महंमद संघटनेचा लपलेल्या ठिकाणाहून सैनिकांवर गोळीबार करणारा माणूस होता. हा हल्ला झाल्याच्या आदल्या वर्षी पुलवामातल्या ट्राल भागातल्या सुरक्षा रक्षकांबरोबरच्या एन्काउंटरमध्ये तो मारला गेला होता. त्यानंतर पाकिस्तानातल्या या संघटनेचा पुढारी गाझी रशीद याला तिथे पाठवण्यात आलं.

‘टॉप इंटेलिजन्स एजन्सी’च्या म्हणण्यानुसार हा हल्ला होण्याच्या काही दिवस आधी पुलवामातल्या रत्नीपोरा गावातल्या सुरक्षा रक्षकांमध्ये आणि अतिरेक्यांमध्ये एक एन्काउंटर घडलं होतं. त्यात गाझी रशीद थोडक्यात बचावला होता. या एन्काउंटरमध्ये एक स्थानिक अतिरेकी मारला गेला पण बाकीचे तिघे सुटून पळून गेले.

या गोळीबारात सैन्याचे जवान ‘एचव्ही बलजीत’ हेदेखील शहीद झाले होते. मसूद अजहरचा जवळचा सहकारी आणि अत्यंत विश्वासू कमांडर असलेलया गाझी रशीदने २००८ साली ‘जैश-ए-महंमद’मध्ये प्रवेश केला. अफगाणिस्तानातल्या तालिबानकडून त्याला प्रशिक्षण दिलं गेलं. २०१० साली पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तानमधून परतल्यावर तो पाकव्याप्त काश्मीरमधल्या जैश संघटनेच्या सदस्यांचा प्रशिक्षक म्हणून काम करू लागला. जैश-ए-महंमद संघटना भारतात ज्या काही हालचाली करते ते सगळं त्याच्या नेतृत्त्वाअंतर्गत चालतं. असं म्हटलं जातं की तो दक्षिण काश्मीरमध्येच कुठेतरी लपलेला आहे.

गेल्या काही वर्षांत ‘जैश-ए-महंमद’ या संघटनेने अतिरेक्यांना, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचं एक प्रचंड मोठं जाळं दक्षिण काश्मीरमध्ये विस्तारलं आहे. त्यातले काही जण तर तिथले स्थानिक लोक आहेत. सुरक्षा संस्था या जाळ्यावर कडक कारवाई करण्याच्या आणि गाझी रशीदला पकडण्याच्या प्रयत्नात आहेत.

 

pulwama im

 

स्वतःतल्या पाशवी वृत्तीचं शेवटचं टोक गाठलेल्या या अशा संघटना तरूणांना हेरून त्यांच्यात एका अत्यंत विध्वंसक विचाराचं जहरी विष पेरतात याइतकं अमानुष दुसरं काहीच नाही.

 

pulvama attack 1 im

 

हा इतका पराकोटीचा तिरस्कार प्रत्यक्ष अर्थाने आणि मती गुंग झालेले अतिरेकी,दहशतवादी तयार करणे अशा दोन्ही अर्थांनी लोकांचे बळी घेतो तेव्हा केवळ सुन्न वाटण्यापलीकडे आपण दुसरं काहीच करू शकत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?