' दफन विधीनंतर ती जिवंत झाली आणि…. विज्ञानाला आव्हान देणारी घटना – InMarathi

दफन विधीनंतर ती जिवंत झाली आणि…. विज्ञानाला आव्हान देणारी घटना

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विज्ञान कितीही पुढे गेलेलं असलं तरीही काही घटना या अशा असतात की, त्याचं उत्तर विज्ञानाकडे सुद्धा नसतं. आजच्या स्मार्ट जगात अशा अनाकलनीय घटनांचं प्रमाण त्या मानाने कमी झालं आहे, पण १९१५ मध्ये दक्षिण कैरोलिना या देशात असं घडलं होतं की, मृत्यू झालेली व्यक्ती ही मृत्यू शय्येवरून जिवंत झाली होती आणि पुढे चक्क ४७ वर्ष जगली होती.

एखाद्या काल्पनिक कथेसारखी वाटणारी ही कथा सुरुवातीला लोकांना खरी वाटली नव्हती. एस्सी डुंबर हे त्या महिलेचं नाव आहे जिला हा पुनर्जन्म मिळाला होता. काय होती ही पूर्ण घटना? जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

एखाद्या व्यक्तीला डॉक्टर, वैद्यकीय यंत्रणा ही मृत घोषित करते. शवपेटी मागवली जाते, अंत्ययात्रा निघते आणि अर्ध्या रस्त्यात ती व्यक्ती उठून बसते ही घटना एस्सी डुंबर या महिलेने आपल्या आत्मचरित्रात लिहून ठेवली आहे.

‘बरीड अलाईव्ह : द टेरिफिक हिस्ट्री ऑफ अवर मोस्ट प्रायमल फ़ियर’ हे या २००१ मध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाचं नाव आहे. एस्सी डुंबरने आपल्या पुस्तकात सांगितलं आहे की, “मी त्यावेळेस ३० वर्षांची होते. माझा माझ्या बहिणीमध्ये फार जीव होता. ती येणार होती, पण तिला उशीर होत होता आणि ती यायच्या आधी मला हे जग सोडून जायचं नव्हतं आणि म्हणून मी परत जिवंत झाले.”

 

weird facts im

 

डॉक्टर डी.के.ब्रिग्स हे एस्सी डुंबर हिच्यावर उपचार करायचे. ३० वर्षीय एस्सी ला ‘एपिलेप्सी’ नावाच्या आजाराने ग्रासलं होतं. १९१५ मध्ये आलेल्या एका तीव्र झटक्याने तिच्यातील जीव निघून गेल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं होतं. परगावी असलेल्या बहिणीला एस्सी डुंबरचं अंत्यदर्शन व्हावं यासाठी अंतयात्रा ही दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता नियोजित करण्यात आली होती.

अंतयात्रेचा दिवस उजाडला. ११ वाजले, पण एस्सीची बहीण काही दक्षिण कैरोलीना येथे पोहोचू शकली नाही. ख्रिश्चन धर्मियांच्या प्रथेप्रमाणे तीन प्रचारकांनी त्या ठिकाणी जमलेल्या सर्वांसाठी प्रवचन दिलं. इतर धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर एस्सी डुंबर यांच्या शवपेटीला जमिनीच्या ६ फूट खाली ठेवण्यात आलं. एस्सीला सर्वात प्रिय असलेल्या बहिणीला आता तिचं दर्शन होणार नाही यासाठी जमलेल्या सर्व अतिथींना हळहळ वाटत होती.

१२.३० वाजता एस्सी डुंबरची बहीण अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचली. आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या बहिणीचं अंतिम दर्शन होऊ शकलं नाही याबद्दल तिला खूप वाईट वाटलं आणि तिला अश्रू अनावर झाले. जमलेल्या सर्व मित्र, नातेवाईकांनी तिथे उपस्थित असलेल्या धर्मगुरूंना विनंती केली की त्यांनी एकदा एस्सी यांची शवपेटी जमिनीखालून काढण्याची परवानगी द्यावी. धर्मगुरूंनी ती विनंती मान्य केली.

 

weird facts im1

 

शवपेटी वर घेण्यात आली. त्याचे दार उघडण्यात आले आणि त्यानंतर जे दृश्य दिसलं ते बघून जमलेले सर्व लोक अवाक् झाले. काही तासांपूर्वी मृत घोषित करण्यात आलेली एस्सी डुंबर ही शवपेटी मध्ये उठून बसली आणि तिने तिच्या बहिणीकडे बघून ‘स्माईल’ केलं.

हे बघणं तिथे जमलेल्या लोकांसाठी इतकं धक्कादायक होतं की, त्यांच्यातील कित्येक जणींनी ओरडण्यास सुरुवात केली. काही जण एस्सीला भूत समजत होते आणि ती जागा सोडून पळायचा प्रयत्न करत होते. तिथे बोलवण्यात आलेले ३ अधिकारी हे या गडबडीत तिथे खणलेल्या खड्ड्यात पडले. बाहेर पडण्याच्या गडबडीत त्यांना सौम्य इजा देखील झाली.

एस्सी डुंबरची बहीण सुद्धा असंच समजत होती, की हे एस्सीचं भूत आहे. पण, काही क्षणात एस्सी या आपल्या शवपेटीत उभ्या राहिल्या आणि त्या आपल्या बहिणीकडे धावायला निघाल्या. हे बघून कित्येक लोकांना चक्कर आली आणि ते तिथेच कोसळले. थोड्या वेळात लोकांना ही खात्री पटली की, समोर दिसणारी व्यक्ती ही एस्सी डुंबर आहे आणि ते तिचं भूत नाहीये. लोकांनी तिचं स्वागत केलं आणि सगळे आपल्या घरी जायला निघाले.

एस्सी डुंबरच्या आयुष्यात घडलेली ही घटना कित्येक वर्ष लोकांना आश्चर्यकारक वाटत होती. लोक तिच्याकडे एक झोंबी भूत आहे जे की मृतावस्थेतून परत आलं आहे असं बघत.

आजच्या इतकं त्या काळात ‘ब्रेकिंग न्यूज’ किंवा ‘ट्विट’ नसल्याने ही बातमी कुठेच त्वरित प्रकाशित झाली नव्हती. काही वर्षांनी ही बातमी प्रकाशित झाली आणि त्यानंतर एस्सी डुंबर ही एक सामान्य व्यक्ती दक्षिण कैरोलिना मध्ये खूप लोकप्रिय झाली. कमालीची गोष्ट म्हणजे ही बातमी जेव्हा प्रमुख वर्तमानपत्रात छापून आली ते १९५५ हे वर्ष होतं आणि तोपर्यंत एस्सी डुंबरने आपल्या दुसऱ्या इनिंगची ४० वर्ष जगली होती.

 

weird facts im2

 

२२ मे १९६२ रोजी एस्सी डुंबर यांचा खरा मृत्यू झाला. तोपर्यंत ज्या डॉक्टरांनी एस्सीला चुकीने मृत घोषित केलं होतं त्यांनी सुद्धा जगाचा निरोप घेतला होता. “एका स्थानिक फिजिशियनच्या चुकीच्या अहवालामुळे ही चूक घडली” असं स्पष्टीकरण संबंधित अधिकाऱ्यांनी नंतर दिलं होतं.

दक्षिण कॅरोलिना या भागात रहाणारे वयस्कर मंडळी कित्येक वर्ष या घटनेचे साक्षीदार म्हणून एस्सी डुंबर बद्दल चर्चा करायचे. डॉक्टर हामंड या दुसऱ्या फिजिशियनने एस्सी डुंबरला देण्यात आलेल्या अहवालात चूक शोधून काढली होती आणि प्रकरणाचा पूर्ण खुलासा करण्यात आला होता.

१९८० च्या दशकात या घटनेवर पुन्हा एकदा पडला जेव्हा ब्रिटिश मासिक ‘फोर्टन टाईम्स’ मध्ये हा लेख लिहिण्यात आला होता. एस्सी डुंबर यांच्या आत्मचरित्राचं शब्दांकन करणाऱ्या लेखक बॉण्डेसन यांना आवश्यक असलेली ही माहिती या मासिकानेच दिली होती.

 

weird facts im3

 

एस्सी डुंबर यांच्याप्रमाणे चुकीच्या मृत्यूचा अहवाल हा १८८५ आणि १८८६ मध्ये सुद्धा कॅनडा मध्ये सादर करण्यात आला होता. या सर्व घटना लक्षात घेऊन शवपेटी ही अशा पद्धतीने तयार करण्यात येऊ लागली की ज्यामध्ये हवेचा पुरवठा होत राहील.

इतिहासकारांनी ही पण माहिती समोर आणली आहे की, १६९५ मध्ये आयर्लंड मधील मार्गोरी कॉल या महिलेसोबत अशीच घटना घडली होती. तापाने फणफणलेली ही महिला बेशुद्ध पडली आणि नंतर कोमा मध्ये गेली आणि तंत्रज्ञान इतकं प्रगत नसल्याने महिलेला मृत घोषित करण्यात आलं.

एस्सी डुंबर ही जिवंत होती तर ती शवपेटीत झोपून का राहिली? तिने आधीच आवाज का केला नाही? आणि बंद शवपेटीत ती श्वासोच्छवास कशी करू शकली? या प्रश्नांची तर्कशुद्ध उत्तरं मात्र कुठेच प्रकाशित झालेली नाहीयेत. कदाचित, ही तिने केलेली गंमत असावी किंवा तिला जिवंत ठेवण्यामागे आपल्या बहिणीला भेटण्याची इच्छाशक्ती ही कारणीभूत ठरली असावी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?