' अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती – InMarathi

अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताचे ज्येष्ठ उद्योगपती गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. गौतम अदानीच्या कंपनीने बाजार भांडवलाने देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सला मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अदानी हे आता ८८५० दशलक्ष डॉलर (६.६१ लाख कोटी रुपये) संपत्तीसह जगातील १० व्या क्रमांकाचे आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.

तर मुकेश अंबानी हे सध्या ८७९० दशलक्ष डॉलर म्हणजेच ६.५६ लाख कोटी रूपयाच्या संपत्तीसह जगातील ११ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग इंडेक्स ही जगातील टॉप ५०० श्रीमंतांची यादी आहे आणि ही यादी दररोज अपडेट केली जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गौतम अदानी यांच्या संपत्तीत यावर्षी १२०० दशलक्ष डॉलर्स म्हणजेच ८९.६ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे, तर मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत २०७ दशलक्ष डॉलर म्हणजेच १५.४५ हजार कोटी रुपयांनी घट झाली आहे.

 

gautam adani inmarathi

 

अंबानी यांची कंपनी रिलायंसकडे जगातील सर्वात मोठे तेल शुद्धीकरण कारखाना आहे. याशिवाय, रिलायंस दूरसंचार क्षेत्रातही अव्वल आहे आणि अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रात वेगाने विस्तार करत आहे. त्याच वेळी, गौतम अदानी हे देशातील सर्वात मोठे बंदर ऑपरेटर अदानी समूहाचे संस्थापक आहेत. याशिवाय अदानी हे देशातील कोळशा व्यापाराचे सगळ्यात मोठे व्यापारी आहे.

अंबानी यांच्याप्रमाणेच अदानीही ऊर्जा क्षेत्रात वेगाने वाटचाल करत आहे. अदानी समूहातील काही शेअरने मागील एक वर्षामध्ये गुंतवणूकदारांना ६०० टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे.

यामुळे अदानी समूहाच्या एकूण कंपनीचे मार्केट कॅप आता ११.४६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यानंतर गौतम अदानी आता मुकेश अंबानींच्या २१,००० कोटींनी पुढे आहेत. अंबानींची संपत्ती ६.६६ लाख कोटी रुपये आहे, तर अदानी यांची संपत्ती ६.८७ लाख कोटी रुपये आहे.

तसे तर काही दिवसांपूर्वी म्हणजेच २५ जानेवारीला गौतम अदानी यांनी मुकेश अंबानींना मागे टाकले होते. त्यावेळी दोघांच्या मालमत्तेत फक्त एक हजार कोटी रुपयांचा फरक होता. अंबानींची संपत्ती ६.७१ लाख कोटी रुपये होती, तर अदानी यांची ६.७२ लाख कोटी रुपये होती.

 

money inmarathi

● कंपनीमधील भागिदारी

तसेच गौतम अदानी यांची त्यांच्या कंपन्यांमधील भागीदारी अंबानींच्या रिलायन्स समूहातील कंपन्यांमधील भागीदारीपेक्षा जास्त आहे. मुकेश अंबानी यांच्याकडे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ५०.६१% हिस्सा आहे तर अदानीकडे त्यांच्या कंपन्यांमध्ये ७०.५९% हिस्सा आहे. अदानी यांचा त्यांच्या ३ कंपन्यांमध्ये ७४-७५% हिस्सा आहे, तर एका कंपनीत ७४.८०% हिस्सेदारी आहे.

 

adani and ambani inmarathi

 

● शिक्षण अर्धवट सोडून मुंबई गाठली

गौतम अदानी यांचा जन्म २४ जून १९६२ रोजी अहमदाबादमधील गुजराती जैन कुटुंबात झाला होता. वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी बी-कॉमचे शिक्षण सोडून दिले होते आणि कुटुंबाची कमकुवत आर्थिक परिस्थिती असल्याकारणाने ते मुंबईला कामाच्या शोधात निघाले होते. मुंबईत त्यांना डायमंड सॉर्ट महिंद्रा ब्रदर्समध्ये नोकरी मिळाली होती. काही महिन्यानंतर, त्यांनी स्वतःचे हिरा ब्रोकरेज आउटफिट सुरू केले.

 

How are Diamonds made.Inmarathi2
cnbc.com

 

१९८१ मध्ये त्यांच्या भावाने प्लास्टिकची फॅक्टरी उघडली होती, ज्याचा काम सांभाळण्यासाठी ते गुजरातला परतले. अदानी यांनी १९८८ मध्ये अदानी एंटरप्रायझेस सुरू केले जे आयात-निर्यात व्यवसायात गुंतलेली होती.

● गौतम अदानी यांची मालमत्ता

गौतम अदानी यांनी सप्टेंबर २०२० मध्ये भारतातील दुसरा सगळ्यात जास्त व्यस्त असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्ये ७४% हिस्सेदारी मिळवली आहे.

भारतातील सर्वात मोठे खाजगी बंदर असलेल्या गुजरातमधील मुंद्रा बंदरावर गौतम अदानी यांचे नियंत्रण आहे.

गौतम अदानी यांना महागदड्या कारचे शौक आहे, त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू सिरीज लिमोझिन, एक रोल्स-रॉईस घोस्ट आणि लाल फेरारी कॅलिफोर्निया यांसह अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे.

 

port adani inmarathi

 

गौतम अदानी यांची केवळ भारतामध्येच नाही तर विदेशामध्ये पण अनेक मालमत्ता आहेत. जसे की ऑस्ट्रेलियाचे अॅबॉट पॉइंट बंदर आणि जगातील सर्वात मोठी कोळसा खाण कारमाइकल खाणीचा समावेश आहे.

अदानी यांच्याकडे विमानांची पण कमतरता नाही, म्हणजे त्यांच्याकडे विमानांचा एक ताफाच आहे. त्यांच्याकडे बॉम्बार्डियर, एक बीचक्राफ्ट आणि हॉकर आहे. त्यांनी ऑगस्टा वेस्टलँड AW139 हे हेलीकाप्टर १२ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

गौतम अदानी यांचा गुडगावमधील सरखेज येथे स्वतःचा आलिशान बंगला आहे. त्यांनी नवी दिल्लीतील सर्वात महागड्या निवासी क्षेत्र असलेल्या लुटियन्स दिल्लीमध्ये ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

 

reuben singh cars inmarathi

 

● दोन वेळा मृत्युच्या दारातून परतले अदानी

१९९८ सालचा तो पहिला दिवस होता. अहमदाबादच्या कर्णावती क्लबमधून गौतम अदानी आणि शांतीलाल पटेल एका कारमध्ये बसून निघाले होते. ही कार मोहम्मदपुरा रोडच्या दिशेने जात होती. वाटेत रसत्याच्या मधोमध एक स्कूटर उभी होती.

गाडी थांबताच एक व्हॅन तिथे पोहोचली. अदानी आणि पटेल यांचे व्हॅनमधील लोकांनी अपहरण केले व त्यांना अज्ञात स्थळी नेले. दोघांची सुटका करण्यापूर्वी खंडणीखोरांनी ११ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे पोलिसांच्या आरोपपत्रात म्हटले आहे.तर दुसऱ्यांदा २६ नोव्हेंबर २००८ रोजी अशीच एक घटना घडली होती.

गौतम अदानी हे दुबई पोर्टचे सीईओ मोहम्मद शराफ यांच्यासोबत मुंबईतील ताज हॉटेलमधील वेदर क्राफ्ट रेस्टॉरंटमध्ये जेवण करत होते. त्यादरम्यान काही दहशतवादी हॉटेल ताज मध्ये घुसले होते आणि तिथे अंधाधुंद गोळीबार करत होते. त्यादिवशी २६ नोव्हेंबरची संपूर्ण रात्र त्यांनी हॉटेलच्या तळघरात दहशतीच्या सावलीत काढली होती. २७ नोव्हेंबरला सकाळी त्यांची सुटका करण्यात आली. आपल्या खासगी विमानाने अहमदाबादला पोहोचताच ते म्हणाले, ‘मी १५ फूट अंतरावरून मृत्यू पाहिला आहे’.

 

taj hotel InMarathi

 

● जगातील टॉप १० अब्जावधी

एलोन मस्क (२३५०० दशलक्ष डॉलर) यूएस.
जेफ बेझोस (१८३०० दशलक्ष डॉलर) यूएस.
बर्नार्ड अर्नॉल्ट (१६८०० दशलक्ष डॉलर) फ्रान्स.
बिल गेट्स (१२९०० दशलक्ष डॉलर) यूएस.
लॅरी पेज (१२४०० दशलक्ष डॉलर) यूएस.
सर्जी ब्रिन (११९०० दशलक्ष डॉलर) यूएस.
वॉरन बफेट (११५०० दशलक्ष डॉलर) यूएस.
स्टीव्ह बाल्मर (१०८०० दशलक्ष डॉलर) यूएस.
लॅरी एलिसन (९९६० दशलक्ष डॉलर) यूएस.
गौतम अदानी (८८५० दशलक्ष डॉलर) भारत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?