' झुंड सिनेमात Big- Bनी साकारलेले विजय बारसे नेमके आहेत तरी कोण? – InMarathi

झुंड सिनेमात Big- Bनी साकारलेले विजय बारसे नेमके आहेत तरी कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अमिताभ बच्चन आणि बॉलीवूड हे नातंच निराळं आहे. एखाद्या चित्रपटात अमिताभ बच्चन आहे आणि त्या चित्रपटाला रसिकांच्या मनावर अजिबातच भुरळ घालता आली नाही, असं घडल्याचं फारसं पाहायला मिळत नाही. बॉलिवूडमधल्या या सुपरस्टारचा एक नवा सिनेमा येऊ घातलाय. चित्रपटाचं नाव आहे झुंड.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

मार्च महिन्यातील पहिल्या आठवड्यात रिलीज होणार असलेला हा चित्रपट खेळावर आधारित आहे, हे तर तुम्हाला माहीतच असेल. मात्र याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मराठमोळा दिग्दर्शक, सैराट फेम नागराज मंजुळे याच्याकरिता हे हिंदी सिनेसृष्टीतील दिग्दर्शनाचं पदार्पण ठरणार आहे.

 

nagraj_manjule_inmarathi

 

मराठी बांधवांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट ठरणार, यात शंकाच नाही. मात्र एवढंच नाही, तर या चित्रपटाचं मराठी मातीशी आणखी एक आगळंवेगळं नातं आहे. सुप्रसिद्ध नायक अमिताभ बच्चन या चित्रपटात साकारत असलेली भूमिका, ही चक्क एका मराठी माणसावर आधारित आहे. या मराठी वीराचं नाव आहे, विजय बारसे! ‘विजय बारसे नेमके कोण आहेत?’, ‘महाराष्ट्राशी त्यांचं काय नातं आहे?’, ‘काय आहे, खऱ्या झुंडच्या खऱ्या नायकाची कहाणी?’ हे असे प्रश्न तुम्हालाही पडायला लागले असतील ना? चला मग आज त्याचीच उत्तरं माहीत करून घेऊ.

 

amitabh bachchan flag IM

 

विजय बारसे यांच्याबद्दल थोडंसं…

बारसे हे एक निवृत्त खेळ प्रशिक्षक आहेत. त्यांची जन्मभूमी विचारल, तर ती आहे नागपूर. खेळाडू घडवणाऱ्या या नागपूरमधील माणसाचं कार्य फार मोठं आहे. कारण खेळाडू तर अनेकजण घडवत असतात, मात्र त्यांनी जे खेळाडू घडवले, ज्या लोकांना खेळापर्यंत पोचवलं, संधी उपलब्ध करून दिली, त्यांच्यासाठी काम करणं ही फारच महत्त्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे.

 

vijay im 1

भारतासारख्या देशात, जिथे क्रिकेट या खेळाला धर्म मानलं जातं, तिथे त्यांनी फुटबॉलच्या खेळाला प्रोत्साहन दिलं. तेदेखील चक्क झोपडपट्टीसारख्या भागांमध्ये! या भागात त्यांनी केवळ फुटबॉलचा प्रसार केला नाही, तर त्या भागांमधून अनेक खेळाडू घडवले. ज्यांना आर्थिकदृष्ट्या सामान्य जीवन जगणं सुद्धा कठीण जातं, अशा वंचितांसाठी त्यांनी ‘स्लम सॉकर’ नावाची एक चळवळच उभी केली असं म्हटलं, तरी ते वावगं ठरणार नाही.

बारसे यांना स्लम सॉकरचे संस्थापक म्हणूनच ओळखलं जातं. स्लम सॉकर अंतर्गत राज्य आणि राष्ट्रस्तरीय फुटबॉल स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. या स्पर्धा आर्थिक दृष्ट्या मागे असलेल्या वंचितांसाठी असतात, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

अशी झाली कार्याची सुरुवात…

निवृत्तीनंतर प्रत्येक व्यक्तीला एक मोठी रक्कम हातात मिळत असते. ही जमापुंजी, म्हणजे म्हातारपणाची सोय, अडल्यानडल्या कामांसाठी, आजारपणासाठी आणि आयुष्याची सेकंड इनिंग सुरळीतपणे पार पडावी यासाठी जपून ठेवावी असाच विचार कुठलीही सामान्य व्यक्ती करते. मात्र, बारसे ही काही सामान्य व्यक्ती म्हणता येणार नाही. त्यांनी आयुष्याची ही सेकंड इनिंग खेळायची ठरवली, ती दुसऱ्यांसाठी!

२००१ साली, निवृत्तीनंतर हाताला लागलेली १८ लाखांची रक्कम आणि अर्धांगिनी रंजना बारसे आणि मुलगा अभिजित बारसे यांच्यासह क्रीडा विकास संथी या संस्थेची स्थापना केली. याच संस्थेआंतर्गत पुढे स्लम सॉकर या प्रकल्पाची सुरुवात झाली.

 

football im

 

१८ लाखांची धनराशी खर्च करून, काही एकरची जागा विकत घेऊन सुरू झालेल्या अकादमीला खरं यश मिळू लागल्याच्या खुणा लगेच दिसू लागल्या होत्या. यातूनच चांगल्या कामांना अधिक हुरूप येत जातो. या सगळ्या कष्टाचं फलित अखिलेश नावाच्या एका खेळाडूच्या रूपात दिसलं. त्याची भारतीय फुटबॉल संघात निवड झाली. बारसे यांनी तयार केलेला संघ, ब्राझीलमध्ये स्लम सॉकर वर्ल्डकप खेळायला सुद्धा पोचला होता.

मित्रमंडळी आणि आप्तेष्टांच्या मदतीने, २००३ साली पहिली राज्यस्तरीय टुर्नामेंट खेळवली गेली. त्याच वर्षी राजीव गांधी मेमोरियल टुर्नामेंटचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. १२ राज्यांच्या संघांनी यात सहभाग घेतला. ओरिसाच्या संघाने या स्पर्धेत बाजी मारली, आणि महाराष्ट्राने उपविजेतेपद मिळवलं होतं. स्लम सॉकरला खऱ्या अर्थाने महत्त्व मिळायला सुद्धा सुरुवात झाली.

 

vijay 2 im

 

अशी सुचली कल्पना…

झोपडपट्टीमधील मुलांना पावसात फुटबॉल खेळताना पाहिलं, आणि बारसे यांच्या मनात या मुलांसाठी काहीतरी काम करावं अशी इच्छा निर्माण झाली. केवळ आर्थिकदृष्ट्या मगासलेले असल्याने त्यांना संधी मिळत नाही, हे बारसे यांच्या मनाला पटलं नाही, आणि त्यांनी स्लम सॉकर या अनोख्या उपक्रमाची सुरुवात करण्याचा विचार केला.

 

corona slum inmarathi 1
news track english

 

समाजकार्य आणि खेळाची अवड या दोन्ही गोष्टी उत्तमरीत्या हाताळत बारसे यांनी मोठं नाव कमावलं आहे. आज झुंडच्या निमित्ताने त्यांचं करू सगळ्यांसमोर मांडलं जाणार असल्याने, हा महाराष्ट्राचा अभिमान म्हणायला हवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?