' ट्रॅफिक जॅम मध्ये तर कुणी खोट्या अंगठीसह: प्रपोज करताना या सेलिब्रिटींनाही घाम फुटलेला – InMarathi

ट्रॅफिक जॅम मध्ये तर कुणी खोट्या अंगठीसह: प्रपोज करताना या सेलिब्रिटींनाही घाम फुटलेला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या सर्वत्र ‘व्हॅलेंटाईन डे’ चा माहौल आहे. ठरवून कुणीच प्रेमात पडत नाही आणि तुमचं प्रेम तुम्ही अगदी कुठल्याही दिवशी व्यक्त करू शकता. पण आजही ‘व्हॅलेन्टाईन्स डे’चं महत्त्व कमी झालेलं नाही. अनेक प्रेमवीर आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायला हाच दिवस निवडतात.

प्रत्यक्षात जेव्हा प्रपोज करायची वेळ येते तेव्हा भल्याभल्यांची हिंमत होत नाही. प्रेमात पडलेली व्यक्ती जरी मनातल्या मनात फार सुंदर भावना अनुभवत असली तरी जिच्या आपण प्रेमात पडलोय ती व्यक्तीही आपल्याबद्दल असाच विचार करत असेल का? हा प्रश्न प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या मनात सतत असतो.

 

propose-tips-marathipizza00

 

नकार आलाच तर तो आपण किती चांगल्या प्रकारे पचवू शकू याचा अंदाज नसतो. काही जण अशा वेळी तेव्हाच नाद सोडून देतात.

काही जण मात्र आपली प्रेमाची गाडी पुढे सरकावी म्हणून धैर्य एकवटून समोरच्या व्यक्तीला आपल्या मनातल्या भावना सांगतात. पण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांसाठी हे जसं म्हणायला सोपं पण प्रत्यक्षात कठीण असतं तसंच काहीसं बऱ्याच सेलिब्रिटीजच्या बाबतीतही असतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जाणून घेऊया आपल्या काही आवडत्या सेलिब्रिटीजनी आपल्या हटके अंदाजात समोरच्या व्यक्तीला प्रपोज करून कसा मिळवलेला होकार.

१. अक्षय कुमार – ट्विंकल खन्ना :

 

akshay twinkle IM

 

अक्षय कुमारने ‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडमध्ये ट्विंकलला प्रपोज केल्याचा मजेशीर किस्सा सांगितला होता. अक्षयने ट्विंकलला प्रपोज केलं तेव्हा आपल्याला आपल्या अभिनयाच्या करियरवर लक्ष केंद्रित करायचंय असं सांगून आधी तिने ते प्रपोजल डावललं. पण तिने त्याला एक भलतीच अट घातली होती.

तिचा ‘मेला’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चालला तर आपण अक्षयशी लग्न करणार नाही. पण ‘मेला’ जर फ्लॉप झाला तर आपण लग्नाला राजी होऊ असं ती त्याला म्हणाली. ‘मेला’ बॉक्स ऑफीसवर चांगलाच आपटल्यामुळे अर्थातच त्यानंतर ट्विंकल आणि अक्षयचं लग्न झालं.

२. मुकेश अंबानी – नीता अंबानी :

 

mukesh ambani neeta ambani IM

मुकेश अंबानी नीता अंबानींच्या प्रथमदर्शनीच प्रेमात पडले होते. घरगुती पार्श्वभूमीपासून कशातच त्या दोघांच्यात साम्य नव्हतं तरी त्या दोघांचं एकमेकांसोबत उत्तम जमायचं. आपण नीता अंबानींशीच लग्न करायचं असा चंग बांधलेल्या मुकेश अंबानींनी आपल्याला कल्पनाही करता येणार नाही अशा ढंगात नीताजींना लग्नाची मागणी घातली होती.

एकदा ते दोघं डेटवर गेले असताना ट्रॅफिक सिग्नलवर गाडी थांबवून त्यांनी नीताजींना प्रपोज केलं. जोवर नीताजींकडून होकार आला नाही तोवर त्यांनी एकही गाडी पुढे जाऊ दिली नाही. त्यांनी होकार दिला आणि त्यानंतर ते विवाहबंधनात अडकले.

३. करण सिंग ग्रोव्हर – बिपाशा बासू :

 

karan singh and bipasha IM

 

करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासू एकमेकांच्या प्रेमात पडण्यापूर्वी दोघांनाही प्रेमात अपयश आलेलं होतं. एकमेकांच्या प्रेमात पडल्यावर ते दोघे एकदा थायलंडला फिरायला गेले होते. ते कोह सामुईला असताना थर्टी फर्स्टच्या रात्री आकाशात सगळीकडे दिव्यांचा झगमगाट होता.

बिपाशा ते दृश्य व्हिडियोत टिपून घेत असताना ‘हीच ती वेळ’ असं गट फिलिंग करण सिंगला आलं आणि त्याने तिला अंगठी देत लग्नाची मागणी घातली.

दहा मिनिटं तो गुडघ्यावर बसलेला होता आणि बिपाशा त्याला ‘तुला माझ्याशी लग्न का करायचंय?” असं विचारत होती. काहीही झालं तरी होकार मिळाल्याशिवाय आपण मागे हटायचं असं करण सिंग ग्रोव्हरने ठरवलं. शेवटी बिपाशाने त्याला होकार दिला आणि नंतर त्यांचं लग्न झालं.

४. अभिषेक बच्चन – ऐश्वर्या राय :

 

abhishek aishwarya IM

 

अनेकांना घायाळ केलेल्या ऐश्वर्या रायला अभिषेक बच्चनने चक्क खोटी रिंग देऊन प्रपोज केलं होतं. ‘गुरू’ चित्रपटाच्या शूटिंगनंतर ते दोघे न्यूयॉर्कला गेले असताना सगळी छान तयारी करून अभिषेकने तिला लग्नाची मागणी घातली होती.

मात्र त्यावेळी त्याच्याजवळ खरी अंगठी नसल्यामुळे त्याने चित्रपटात प्रॉप म्हणून वापरली जाणारी अंगठी तिला दिली होती. अंगठी खरी आहे की खोटी यापेक्षाही त्या नेमक्या वेळी तिला प्रपोज करणं त्याच्यासाठी महत्त्वाचं होतं. ऐश्वर्याने त्यानंतर त्याला होकार दिला.

५. शाहरुख खान – गौरी खान : शाहरुख- गौरी

 

shahrukh and gauri IM 2

 

या जोडीकडे बॉलिवूडमधलं एक आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. पण या दोघांची लव्हस्टोरी खूप फिल्मी आहे. शाहरुखच्या पझेसिव्हनेसमुळे चिडलेली गौरी खान मुंबईला निघून गेली होती.

शाहरुख तिला शोधत शोधत मुंबईला आला. अनेक आव्हानांना सामोरं जाऊन ते अक्सा बीचवर भेटले आणि अशा प्रकारे बॉलिवूडच्या किंग खानने गौरी खानला लग्नासाठी मागणी घातली.

६. प्रियांका चोप्रा – निक जोनस :

 

priyanka and nick IM

 

प्रियांका चोप्राचं नाव बॉलिवूडमधल्या अनेक आभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. पण अखेरीस या ‘देसी गर्ल’ने निक जोनसशी लग्न केलं.

आपल्यातल्या अनेकांना माहीत नसेल पण प्रियांकाचा वाढदिवस आणि त्यांची एंगेजमेंट ऍनिव्हर्सरी एकाच दिवशी येऊ नये म्हणून तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मध्यरात्रीपर्यंत निकने वाट पाहिली होती.

त्यानंतर अगदी गुडघ्यावर बसून त्याने तिला “तू माझ्याशी लग्न करून जगातील सर्वात आनंदी व्यक्ती होशील का?” असं विचारलं. ४५ सेकंदांनंतर प्रियांकाने त्याला होकार दिला.

७. सैफ अली खान – करीना कपूर :

 

saif and kareena IM

 

बॉलिवूडच्या या नवाबाने करीनाला तीनवेळा प्रपोज केलं होतं. तिन्ही वेळेस तिने त्याला नकार दिला. अखेरीस पॅरिसमध्ये सुट्टीची मजा घेताना त्याने तिला पुन्हा मागणी घातली आणि त्यावेळी मात्र करिनाने त्याला होकार दिला.

सेलिब्रिटीजप्रमाणे आपल्याही आयुष्यात कुणालातरी प्रपोज केल्याचे असे रंजक किस्से असतील.

थोडक्यात काय, तर सेलिब्रिटीज असो की सामान्य माणूस, कुणी कुणाला कधी प्रपोज करतंय यापेक्षा हवाहवासा ‘होकार’ येणं आणि प्रेम यशस्वी होणं महत्त्वाचं. नकार आलेल्या प्रेमवीरांनीही प्रयत्नात कसूर ठेवू नका. भल्याभल्यांनीही नकारानंतर माघार घेतलेली नाही.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?