' मोठ्ठं घर, सुपरकार्स आणि महागड्या फॉरेन टूर्स, अश्नीर ग्रोव्हरची शानशौकी… – InMarathi

मोठ्ठं घर, सुपरकार्स आणि महागड्या फॉरेन टूर्स, अश्नीर ग्रोव्हरची शानशौकी…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या भारतात कोट्याधीश, अब्जाधीश पुष्कळ आहेत. त्यांची नावेही सतत समोर येत राहतात. मात्र केवळ या मोठ्या बिझनेसमनकडेच एवढा अफाट पैसा आहे का? त्यांच्याएवढा नसेल पण आपल्याला खूप वाटेल एवढा पैसा जवळ असणारे लोक आहेत. यातले काही जण स्टार्टअपमधूनच मोठे झालेले आहेत.

सध्या स्टार्टअपचा जमाना आहे. सुरुवातीला हे प्रस्थ फार मोठं नव्हतं, पण फॉरेनची (इंग्लंड, अमेरिका) कॉपी करण्यापासून देश काही थांबलेला नाही. KBC, BIG BOSS यासारखी बरीच उदाहरणं तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहेत. यातलाच एक प्रकार म्हणजे शार्क टॅंक इंडिया.

 

shark tank im

 

घाबरू नका. शार्क टॅंक म्हणजे एक रियॅलिटी शो आहे. ज्यामध्ये नवीन उद्योजक येऊन त्यांच्या बिझनेसबद्दल संकल्पना मांडतात. त्यामध्ये जर गुंतवणूक करावीशी वाटली तर शार्क म्हणवले जाणारे इन्वेस्टर्स त्यांच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करतात.

या रियॅलिटी शो पहिल्यांदा अमेरिकेत २००९ मध्ये चालू झाला. यावर्षी भारतातही याचं एक व्हर्जन झालं. भारतातल्या शोमध्येही एकूण ७ शार्क्स म्हणजे गुंतवणूकदार होते, पण यातला अश्नीर ग्रोव्हर खूप प्रसिद्ध झाला तो त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे.

अनेकदा त्याला सोशल मीडियावर ट्रोलही केलं गेलं. पण त्याचे फॅन्सही तितकेच तयार झाले. अश्नीर या शोमधली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. चला त्याच्या श्रीमंतीबद्दल थोडी माहिती घेऊ.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

करोडपती अश्नीर ग्रोव्हरची संपत्ती नक्की आहे तरी किती?

अश्नीर ग्रोव्हर भारत पे या ऑनलाइन पेमेंट ॲपचा को-फाउंडर आणि एमडी आहे. त्याने त्याच्या पार्टनरसोबत २०१८ साली भारत पे हे स्टार्टअप सुरु केलं.

अश्नीर मूळ दिल्लीचा. तो IIT दिल्लीचा पास आउट आहे. पहिल्याच प्रयत्नात त्यानं तिथं ॲडमिशन मिळवली. त्यानंतर IIM अहमदाबादमधून मास्टर्स डिग्री घेतली. ही डिग्री झाल्यावर त्याने काही वर्ष जॉब केला आणि मग २०१८ साली भारत पे हे स्टार्टअप सुरु केलं.

हे स्टार्टअप चालू झालं, तेव्हा मार्केटमध्ये याप्रकारची सेवा देणारी ॲप्स होती. पण आता केवळ ४ वर्षांतच सगळ्यांशी स्पर्धा करून अश्नीर कुठं आहे ते आपल्याला ठाऊक आहे.

 

ashneer grover im

 

त्याची सध्याची सांपत्तिक स्थिती म्हणजे तो जवळजवळ २१,३०० करोड रुपये आहे. शार्क टँकमध्ये यायच्या आधीपासून अश्नीर वेगवेगळ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करत आहे. त्याने आतापर्यंत २२ स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केलेली आहे. तिथूनही त्याचं उत्पन्न होतं.

अबब! प्रशस्त बंगला आणि सुपरकार्सचं कलेक्शन तर पहा…

अश्नीर ग्रोव्हरचं दिल्लीत मोठ्ठंच्या मोठ्ठं घर आहे. ते अंदाजे १८ हजार स्क्वेअर फुटांपेक्षा मोठं आहे. म्हणजे अंदाजे १६ नॉर्मल आकाराचे ३ bhk फ्लॅट जेवढ्या जागेत बसतील, एवढं त्याचं एक घर आहे. पुढचे अंदाज आपण लावूच शकतो.

 

ashneer grover im1

 

त्याच्या या घराची किंमत कमीतकमी ३० कोटींहून अधिक आहे. त्याचं हे घर त्याच्या पत्नीनेच डिझाईन केलं आहे. अश्नीरला सुपरकार्सचीही आवड आहे.

अडीच करोडची मर्सिडीज मेबॅक, दीड करोडची पोर्श केमॅन, पावणे दोन करोडची मर्सिडीज बेंझ, ६० लाखांची ऑडी A६ आणि ह्युंदाई वेर्ना…. या सगळ्या गाड्यांचे आणि घराचे फोटो अशनीर इंस्टाग्रामवर टाकत असतोच. शिवाय वर्षातून कमीतकमी एक परदेश दौरा सहकुटुंब करतो, त्याचेही फोटो तो शेअर करत असतो.

 

ashneer grover im2

 

असो! हे सगळं सांगण्याचा उद्देश म्हणजे काही त्याच्यावर जळण्याचा नाही. त्याच्याकडून प्रेरणा घेण्याचा आहे. अश्नीरने कष्ट केले म्हणून आज तो एवढा मोठा बिझनेसमन आहे.

यासोबत आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे त्याचं शिक्षण IIT आणि IIM मधून झालेलं आहे. त्यानंतर त्याने काही वर्षं जॉब केला आणि अनुभव गोळा करून बिझनेस उभारला. त्यात खूप पुढेही गेला. आपणही सगळे आपल्या आयुष्यात खूप पुढे जाऊ शकतो. फक्त त्यासाठी मेहनत करण्याची जिद्द आणि चिकाटी हवी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?