' हिजाब वाद: ”बिकिनी चालेल का?” अभिनेत्री शर्लिनचा प्रियंका गांधींना अजब सवाल – InMarathi

हिजाब वाद: ”बिकिनी चालेल का?” अभिनेत्री शर्लिनचा प्रियंका गांधींना अजब सवाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कर्नाटकातील हिजाब प्रकरणाने देश ढवळून निघालाय. कर्नाटकातील शाळेत हिजाब परिधान करून आलेल्या विद्यार्थीनींवरून गदारोळ सुरु झाला आणि त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी या वादात उडी घेतली.

 

hijab im

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

आतापर्यत गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा, कंगना रनौत यांनी हिजाबवर प्रतिक्रिया दिली आहे. मात्र आता आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध असणाऱ्या शर्लिन चोप्राने नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी हिजाब प्रकरणावरून महिलांची बाजू घेतली होती. महिलांना कोणते कपडे घालावे? हा सर्वस्वी निर्णय महिलांचा आहे असे म्हणत प्रियांका गांधी यांनी ट्विट केलं होतं की” बिकीनी असो किंवा घुंघट असो किंवा हिजाब हे त्यांनीच ठरवायचं की, आपल्याला काय परिधान करायचं आहे ते. आपल्याला संविधानानं अधिकार दिला आहे. त्यामुळे आपले जे मुलभूत अधिकार आहेत ते आपल्यापासून कुणीही हिरावून घेऊ शकणार नाहीत. गेल्या काही दिवसांपासून संविधानाच्या अधिकारावरच गदा आणली जात आहे.

 

tweet im

 

त्या व्टिटरवर शर्लिननं प्रतिक्रिया दिली आहे. तिची प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे.

शर्लिनने या ट्विटवर प्रतिक्रिया देत अजब प्रश्न विचारला आहे. ”मिसेस वाड्रा आपण संविधानाचा हवाला देत जे विधान केलंत त्यात बिकीनीचा उल्लेख केला. तर मला आपल्याला विचारायचे आहे की यानियमानुसार विद्यार्थिनींनी बिकीनी घातली तर चालेल का?”.

एवढा प्रश्न विचारून ती थांबली नाही. उलट ”बिकीनी घालण्यास परवानगी असेल तर कोणता प्रकार चालेल? चालत असेल तर कोणती? मायक्रो बिकीनी, सी थ्रु बिकीनी, माझ्याकडे तर खूप साऱ्या आहेत. आणि मला त्या आपल्याला द्यायला आवडतील”. असा अजब सवालही तिने केला आहे.

 

tweet 1 im

 

एकीकडे हिजाबवरून वादंग सुरु असताना दुसरीकडे आता राजकारणी आणि अभिनेत्री यांच्यात रंगलेले हे शीतयुद्ध नेमके कोणते वळण घेणार? हे येणारा काळ ठरवेल.

एका विद्यालयात सुरु झालेल्या या वादामुळे हिंदू मुस्लिम धार्मिक तेढ निर्माण होत आहे. हा प्रश्न सोडवण्याऐवजी त्यात आपल्या खळबळजनक विधानांनी विषय भडकवण्याचे काम सेलिब्रिटी करत असल्याने या वादात आणखी कोण उडी घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?