' बॉलिवूडकडून भारताची इमेज 'विद्रूप' करण्यामागची कारणं तुम्हाला ठाऊक हवीतच!

बॉलिवूडकडून भारताची इमेज ‘विद्रूप’ करण्यामागची कारणं तुम्हाला ठाऊक हवीतच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

आपल्यापैकी कित्येकांनी हार्वर्ड असं लिहिलेलं जॅकेट, किंवा US polo चे टी शर्ट घातले असतील, Nike च्या ओरिजिनल शूजपासून थेट त्याच्या सेकंड कॉपीपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला भारतात मिळतात.

आज स्मार्टफोनच्या दुनियेतसुद्धा आयफोनची क्रेझ काही कमी होताना दिसत नाहीये. बर्गर म्हंटलं की आपल्यासमोर मॅकडोनाल्ड, बर्गर किंग येतं. जेव्हा स्टारबक्सनी सर्वप्रथम भारतात पाऊल ठेवलं होतं तेव्हा भारतीयांनी तिथे काय तोबा गर्दी केली होती ते आपण पाहिलं आहे.

 

american brands IM

 

इतकंच काय सिनेमात परग्रहावरून येणाऱ्या एलियन्सनासुद्धा अमेरिकेवरच हल्लाबोल करायचा असतो, यावरची व्हायरल झालेली शेकडो मीम्स तुम्ही पाहिली असतील.

याला म्हणतात सॉफ्ट पॉवर, आणि आज अमेरिका महासत्ता बनली आहे त्यामागे या सॉफ्ट पॉवरचासुद्धा खारीचा वाटा आहे. आज जगभरात कोणत्याही व्यक्तीला उच्च शिक्षणासाठी कुठे जायचंय असा प्रश्न विचारला तर तो पहिले अमेरिकेच नाव घेतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

तिथलं कल्चर, त्यांची लाईफस्टाईल याचा प्रभाव नकळतपणे साऱ्या जगावर पडला आहे, आणि हा प्रभाव पाडण्यात अमेरिकेने याच सॉफ्ट पॉवरचा पुरेपूर वापर केला आहे.

अमेरिकेला Most desirable country बनवण्यात सर्वात मोठा हात आहे तो हॉलीवूडचा. एलियन्सशी दोन हात करायचे असो किंवा देशावर आलेलं खूप मोठं संकट असो सर्वप्रथम अमेरिकन सुपरहीरोजच यांच्या मदतीला येतात.

 

independence day IM

 

हॉलीवूडच्या प्रत्येक सिनेमातून वॉशिंग्टन डिसीचं आणि व्हाईट हाऊसचं महत्व अधोरेखित करण्यात येतं आणि या सिनेमांमधूनच अमेरिकेचं सशक्त चित्रं साऱ्या जगासमोर उभं राहतं, पण आपल्याच देशाचं चित्रं कोण उभं करतं तर बॉलीवुड!

हो ही नाव ऐकून कदाचित हसू आलं असेल, पण आज आपण याविषयीच बोलणार आहोत. खरंतर भारतात बॉलिवूड, टॉलीवुड, मॉलिवुड, कॉलीवुड अशी वेगवेगळी वुड्स आहेत, पण आपण सध्या फक्त बॉलिवूडबद्दलच बोलूयात!

भारताचं सशक्त चित्रीकरण करण्यात बॉलिवूडला काहीच रस नाहीये हे आपल्या सिनेमातून कायम अधोरेखित होत आलं आहे. भारताच्या पहिल्या सुपरहीरो सिनेमात रा.वनमध्ये आपला भारतीय सुपरहीरो छम्मक छल्लो गाण्यावर थीरकतोय आणि केवळ फक्त स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी झगडतोय.

 

chammak challo IM

 

आणि तिथे स्पायडरमॅन, सुपरमॅन, बॅटमॅन हे साऱ्या जगाला वाचवण्यासाठी जीवाचा आकांत करत आहेत. खरंतर शक्तिमान हा भारताचा पहिला सुपरहीरो आहे पण त्याची गणती बॉलीवुडमध्ये आपण करणार नाही.

आपल्या देशाचा दूसरा सुपरहीरो क्रीश हा तर चक्क एका एलियनसोबतच नाचताना आणि रोमान्स करताना दाखवलाय, इथंच समजतं की भारतीय चित्रपटसृष्टी याकडे किती गांभीर्याने बघते ते!

हॉलीवूड सिनेमात पहिले जर्मनी रशिया हे त्यांचे शत्रू होते आणि आता चायना हा शत्रू आहे, पण बॉलिवूडमात्र चाँदनी चौक टू चायना प्रवास करण्यात धन्यता मानतो.

 

chandani chowk IM

 

याहीपलीकडे जाऊन एका मोठ्या मिशनवर असताना आपल्या देशाचा सैनिक हा शत्रूराष्ट्रातल्या एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि मग पुढे जे काय होतं ते आपण वीर-जारा, टायगर जिंदा है, एक था टायगर, राजीसारख्या सिनेमातून पाहिलंच असेल.

प्रश्न प्रेमाचा आणि धर्माचा नाहीये, प्रश्न आहे तो या सॉफ्ट पॉवर आणि सिनेमा या समीकरणाचा. हॉलीवूडच्या एकाही सिनेमात तुम्हाला हा असा अॅंगल कधीतरी बघायला मिळालाय का? नाही कारण त्यांनी त्यांच्या सुरक्षाव्यवस्था आणि सिस्टिमचं एक चित्रण लोकांसमोर आधीच मांडलं आहे.

“इराण हा आतंकवाद्यांचा अड्डा आहे” हे हॉलीवूड सिनेमातून स्पष्टपणे, कसलीही परवा न करता मांडलं जातं, आणि बॉलिवूड बजरंगी भाईजान सारख्या सिनेमातून काय दाखवतं तर एका निष्पाप मुलीला एक भारतीय माणूस एका कोठयावर नेऊन विकतो!

 

bajrangi bhaijaan IM

या अशा सिनेमातून बॉलिवूड भारताची प्रतिमा कशी बनवतीय आणि शत्रूराष्ट्रांची प्रतिमा कशी तयार करतंय याचा अंदाज येईल. बॉलिवूडच्या एका सिनेमात तर RAW आणि ISI चे एजंट एकमेकाच्या प्रेमात पडतात आणि आपल्याच देशाच्या विरोधात कारवाया करतात, याच सिनेमाच्या दुसऱ्या भागात पाकिस्तानला आतंकवादाशी दोन हात करताना दाखवलं जातं, राझीसारख्या सिनेमातून तर पाकिस्तान किती निरागस आहे असं चित्रण केलं जातं.

हे सगळे सिनेमे एंटरटेंमेंटच्या नावाखाली बॉक्स ऑफिसवर हीट ठरतात आणि आपला प्रेक्षक मसाला सिनेमा म्हणून असले सिनेमे एंजॉयसुद्धा करतो. त्यात काहीच चूक नाही, कारण टाळी ही कधीच एका हाताने वाजत नाही.

हॉलीवूड ज्यापद्धतीने त्यांच्या फिल्ममेकर्सच्या पाठीशी उभे राहतात, त्यांना आर्थिक सहाय्य पुरवतात, वेगवेगळ्या सुविधा, ग्रँट, incentives देतात तेवढं भारता सिनेसृष्टीला मिळत नाही.

भारतात एखाद्या ऐतिहासिक स्थळावर शूट करण्यासाठी परवानगी घेण्यातच फिल्ममेकर्सचे जोडे झिजतात. अमेरिकेतल्या NASA मध्ये अगदी सर्रासपणे शूटिंगसाठी हॉलीवूडला परमिशन मिळते, इतकंच नाही तर त्यांच्या साहित्य, स्पेससूट वापरायलासुद्धा परवानगी असते. ट्रान्सफॉर्मरसारखा बिग बजेट सिनेमा नासामधल्या ४ विविध ठिकाणी शूट झाला आहे.

 

hollywood nasa IM

 

भारतात हे शक्य आहे का? तर नाही, मिशन मंगलसारखा सिनेमा करताना फिल्ममेकर्सना इस्रोसारखा दिसणार एक सेट तयार करावा लागतो. जर भारतीय सिनेमातून देशाचं सशक्त चित्रण व्हावं अशी इच्छा असेल तर या गोष्टींचासुद्धा विचार आपल्या देशातल्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे.

भारतीय चित्रपटसृष्टी ही जगातल्या मोठ्या निर्मात्यांच्या इंडस्ट्रीपैकी एक आहे. २०१८ मध्ये भारतात तब्बल २०२२ सिनेमे तयार केले गेले, २०१७ मध्ये १९०७ सिनेमे बनले तर २०१६ मध्ये हा आकडा १८६० इतका होता. यावरून आपल्याला अंदाज येईल की भारतीय चित्रपटसृष्टि ही वेगाने वाढणारी इंडस्ट्री आहे, शिवाय याला आपण Recession proof industry सुद्धा म्हणू शकतो.

आज बॉलिवूडची ख्याती साऱ्या जगभर पसरलेली आहे. अफगाणिस्तानमधल्या एका सामाजिक मुद्द्यावर भाष्य करण्यासाठी भारतीय अभिनेत्याची गरज होती, मध्यंतरी बॉलिवूडचा रोमान्स किंग शाहरुख खान याला दुबईने त्यांचा अम्बॅसेडर म्हणून घोषित केलं.

आपले भूतपूर्व प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी असं वक्तव्य केलं होतं की “आफ्रिका, मिडल ईस्टमधली लोकं हे भारतीय सिनेमा बऱ्यापैकी फॉलो करतात!”

हॉलीवूड ही जशी अमेरिकेची सॉफ्ट पॉवर आहे तसंच बॉलिवूड ही भारताची सॉफ्ट पॉवर आहे, तिचा योग्य पद्धतीने वापर करून घेणं ही जबाबदारी जितकी कलाकारांची, निर्मात्यांची आहे तितकीच भारतीय सरकारचीसुद्धा आहे.

 

bollywood inmarathi

 

चायनाचे राज्यकर्ते हे सायन्स-फीक्शन सिनेमा बनवण्यासाठी त्यांच्याकडच्या निर्मात्यांना गळ घालतायत, लंडन ऑलिंपिक प्रमोट करण्यासाठी ब्रिटनने चक्क जेम्स बॉन्डला राजमहालात निमंत्रण दिलं होतं.

भारतही हे सगळं करू शकतो, गरज आहे ती सिनेमासारख्या सॉफ्ट पॉवरच्या योग्य वापराची आणि त्यासाठी मिळणाऱ्या आर्थिक तसेच मानसिक पाठबळाची!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?