' ८०,००० पगार आणि वर्षातून फक्त दोनवेळाच काम, पण….काम तर जाणून घ्या – InMarathi

८०,००० पगार आणि वर्षातून फक्त दोनवेळाच काम, पण….काम तर जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजच्या काळात नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती तो करत असलेल्या नोकरीमध्ये समाधानी नसतो. काहींना पगार कमी वाटतो, तर काहींना कामाचा ताण जास्त वाटतो. छोटी कंपनी असो वा मोठी, प्रत्येक व्यक्तीला आपल्या नोकरीतून थोडा तरी आराम हवा असतो. कदाचित तुमच्या बाबतीतही असेच घडत असेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अनेकवेळा असे घडते, की इतरांचे काम आपल्याला सोपे वाटते आणि आपले काम त्यांच्यापेक्षा करायला सोपे असले तरी आपल्याला आपले काम खूप अवघड वाटते, पण आज आम्ही तुम्हाला अशाच एका नोकरीबद्दल सांगत आहोत, ज्याबद्दल ऐकल्यानंतर तुम्हाला तुमची नोकरी हमखास चांगली वाटेल.

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान वायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस २००० फूट उंचीवर हार्नेस घेऊन चढताना दिसत आहे आणि त्यानंतर रेडिओ स्टेशन टॉवरचा बल्ब देखील बदलत आहे.

 

tower im1

 

हा व्हिडीओ खूप रोमांचक आणि भीतीदायक आहे. हा व्हिडिओ पाहून कोणतंही माणूस हे काम करण्याची कल्पनाही करायला कचरेल, परंतु पोटाची खळगी भरण्यासाठी काही ना काही तर करावे लागेलच.

या रेडिओ टॉवरवर लावलेला बल्ब बदलण्यासाठी या कामगारांना साधारणपणे १७०० ते २००० फूट उंचीवर जावे लागते. काही ठिकाणी ही उंची ढगांवरही असू शकते. अशा स्थितीत काम करण्याची कल्पना करणे खूपच भयावह आहे. सध्यातरी हे काम करण्यासाठी गिर्यारोहक आणि टॉवर तंत्रज्ञांना प्राथमिकता दिली जाते.

ही कामे करणारी व्यक्ती टॉवरवरील इतर उपकरणांची देखभाल, चाचणी आणि दुरुस्तीसाठी देखील जबाबदार असतात. सुरक्षिततेसाठी ते हार्नेस घालतात, कारण रेडिओ टॉवरवरून पडल्यास कोणाचाही जीव जाऊ शकतो. अशा परिस्थितीत कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी सर्व सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

 

tower im

 

रेडिओ टॉवरच्या उंचीशिवाय त्यावर काम करणाऱ्या कामगारांना जोरदार वाऱ्यासह इतरप्रकारच्या हवामानाचा देखील सामना करावा लागतो.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर सगळ्यांना वेड लावत आहे. त्यामुळे तो वेगाने व्हायरल होत आहे, तसेच आतापर्यंत व्हिडिओला ७.९ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सुमारे ६ लाख युजर्सनी या व्हिडिओला लाईक केले आहे. तर, बरेच यूजर्स कमेंट करत होते, की ते असे धोकादायक काम जीवनात कधीच करणार नाहीत.

 

तसेच या लोकांना ४-५ महिन्यातून एकदाच तो लाइट बल्ब बदलण्यासाठी उंच टॉवरवर चढावे लागते, यासाठी त्यांना १० ते २० हजार डॉलर मिळतात. लाइट बल्ब बदलण्यासाठी टॉवरच्या शीर्षस्थानी चढण्यासाठी कमीत कमी २ तास लागतात आणि विशेष म्हणजे एवढ्या उंचीवर कधी कधी वाऱ्याचा वेग १०० किमी प्रतितास एवढा असतो. त्यामुळे हे काम खूप जोखमीचे आहे.

तुम्हाला हे काम करायला आवडेल का यांवर आपले अभिप्राय नक्की कळवा…!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?