' कंगना आणि १६ स्पर्धक: नवा कॉपीकॅट TV शो सुरु होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात – InMarathi

कंगना आणि १६ स्पर्धक: नवा कॉपीकॅट TV शो सुरु होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गेली अनेक वर्षं बिग बॉस हा अमेरिकन बिग ब्रदरचा भारतीय अवतार भारतीय प्रेक्षकांत लोकप्रिय आहे. एका घरात तीन साडे तीन महिने कलाक्षेत्रातील मंडळी एकत्र रहातात, काही टास्क खेळतात आणि ज्याचं मनोधैर्य कणखर तो या शो चा विजेता बनतो.

 

big boss inmarathi

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

याच धर्तीवरचा आणखीन एक नविन रिॲलिटी शो येऊ घातलाय. या शोची निर्माती आहे एकता कपूर. तिच्या स्वत:च्या अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि एमएक्स प्लेयरवर हा शो प्रसारीत होणार आहे. या शोची सूत्रधार असणार आहे बॉलिवुडची पिस्तूल रानी कंगना राणौत!

कंगना ही तिच्या बेधडक वागण्या बोलण्यासठी ओळखली जाते. कोणाचीही भिती न बाळगता ती सरळ आरोप करते. टिकेला सामोरं जावं लागलं तरिही बेहत्तर पण ती आपलं मत ठामपणे मांडते. या शोचं स्वरुप पहाता कंगना ही संचालक म्हणून योग्य निवड आहे याची चुणुक तिनं शो लॉन्च होतानाच दिली.

 

 

kangana im

 

उपस्थित पत्रकारांनी तिला विचारलं की हा शो म्हणजे बिग बॉसची नक्कल वाटत नाही का? यावर तिनं उत्तर दिलं की ”आपण सर्वच क्षेत्रात बी इंडियनचा नारा देत आहोत तर मनोरंजन क्षेत्रात का मागे? आम्हाला कोणत्याही परकीय संकल्पनेची गरज नाही, हा शो अस्सल भारतीय आहे, कोणाचीही नक्कल नाही. तुम्ही शो बघाल तेंव्हा तुमच्या लक्षात येईल.

काय आहे गेम लॉक अप

या नविन शो चं नाव असणार आहे,”लॉक अप” आणि याची टॅग लाईन आहे,” बदमाश जेल, अत्याचार खेल”. टॅगलाईनवरुनच या शोमधे काय घडेल? याचा अंदाज येत आहे. या शोच्या घोषणेपासूनच तो चर्चेत आला आहे.

 

kangna ranout im

 

आधी बिग बॉसची कॉपी म्हणून हा शो चर्चेत आला आणि मग होस्टच्या भुमिकेत असलेल्या कंगनावरून वादंग निर्माण झाला. आता स्पर्धक नावं समोर आल्यानंतर नवा वाद समोर आला आहे.

या शोमध्ये साधारण १६ स्पर्धक सहभागी असणार आहेत जे जवळपास ७२ दिवस म्हणजे दोन सव्वा दोन महिने एका जेलमधे बंद असतील. या जेलची जेलर आहे कंगना! या शोविषयी गुप्तता पाळली गेली असल्यानं यामधे नेमकं काय घडणार आहे? हे अद्याप समोर आलेलं नाही.

यात सहभागी स्पर्धकांबाबतही अत्यंत गुप्तता पाळण्यात आली आहे. मात्र संभावित सात नावं समोर आलेली आहेत.

यापैकी पहिलं नाव आहे, पूनम पांडे! मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे तिच्या बोल्ड विधानांमुळे आणि व्हिडिओमुळे नेहमी चर्चेत असते. अशी ही हिट ॲण्ड हॉट अभिनेत्री कंगनाच्या जेलमधे बंद केली जाणार आहे.

 

poonam pandey 2

 

रोहमन शॉली

 

rohaman im

 

याची एमकेव ओळख म्हणजे हा सुश्मिता सेनचा माजी प्रियकर! दोघे लिव्ह इन मध्ये रहात होते आणि अलिकडेच विभक्त झालेले आहेत.

बिग बॉस स्कॅम: जेंव्हा टिव्ही ‘शो’च्या नावाखाली ९ महिला सापळ्यात अडकल्या होत्या

कट्टर फॅन्सना देखील उल्लू बनवणारी ‘बिग बॉस’ची ही ८ सिक्रेट्स…

ओम स्वामी

 

om swami im

 

अध्यात्मिक गुरु ओम स्वामी जे बेस्ट सेलिंग लेखक आणि ब्लॅक लोटस ॲपचे संस्थापक आहेत ते कंगनाच्या शोमधे सहभागी होण्यासाठि हिमाचलमधील आपला आश्रम सोडून येणार आहेत.

बसीर अली

 

baseer ali im

 

ॲस ऑफ स्पेस, रोडीज, स्प्लिटस व्हिला अशा शोजमधून सहभागी झालेला अली आता कंगनाच्या जेलमधे दाखल होण्यास तयार आहे.

या नावांव्यतिरिक्त बिग बॉस १५ चे सहभागी इशान सेहेगल आणि प्रतीक सहेजपाल हे देखिल लॉकपमधे जाणार असल्याच्या बातम्या आहेत.

बिग बॉसमधील चर्चा आणि वादंग कमी म्हणून की काय पण आता एकता कपूरने हा नवा बेत आखला आहे. मुळातच एकता कपूर आणि अल्ट बालाजी हा तिचा प्लॅटफॉर्म अश्लिल, बेधडक कन्टेन्टसाठी प्रसिद्ध असताना आता नवा कोणता गोंधळ प्रेक्षकांना पहायला मिळणार हे येणारा काळच ठरवेल.

 

alt balaji im

 

अर्थात या सगळ्या शक्यता आहेत, मात्र एकंदरित अतरंगी, वादग्रस्त स्पर्धक आणि त्याहूनही वादग्रस्त कंगनासारखी होस्ट यांमुळे या शोमध्ये नेमकं काय घडणार? टिव्ही जगतात पुन्हा वादळं निर्माण होणार का? या वादळाचे तडाखे नेमके कुणाकुणाला सोसावे लागणार? हा औत्सुक्याचा विषय आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?