' फारसे कोणाला माहित नसलेले आयफोनचे ४ सिक्रेट फीचर्स....तुम्हाला माहित आहेत का?

फारसे कोणाला माहित नसलेले आयफोनचे ४ सिक्रेट फीचर्स….तुम्हाला माहित आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्ही आयफोन वापरत आहात आणि तरीही तुम्हाला आयफोनच्या काही सिक्रेट फीचर्सबद्दल माहित नसेल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. हे सिक्रेट फीचर्स तुम्हाला माहित नसतील, तर त्यात वाईट वाटून घेण्यासारखे काही कारण नाही, कारण अर्ध्यापेक्षा जास्त आयफोन युजर्सना या सिक्रेट फीचर्स बद्दल माहिती नसते. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे सिक्रेट फीचर्स आणि त्यातून कोणत्या अविश्वसनीय गोष्टी केल्या जाऊ शकतात.

 

कीबोर्डला ट्रॅकपॅडमध्ये बदलणे

iphone-hidden-features-marathipizza01
pocketmeta.com

जर टाईप करताना काही चुकी झाली, तर तुम्ही आयफोनमध्ये कीबोर्ड लगेच ट्रॅकपॅडमध्ये बदलून, चुकीचे अक्षरे सहज सुधारू शकता. कीबोर्डला ट्रॅकपॅडमध्ये बदलण्यासाठी कीबोर्डवर प्रेस करा, त्यानंतर एक कर्सर येईल, या कर्सरच्या माध्यमातून तुम्ही तो शब्द डिलीट करू शकता किंवा त्यात बदल करू शकता.

 

फ्लॅशलाईटचा ब्राईटनेस कंट्रोल करणे

iphone-hidden-features-marathipizza02
ios.gadgethacks.com

आयफोनमध्ये फ्लॅशलाईटचा ब्राईटनेस कंट्रोल करण्यासाठी ऑप्शन आहे. तुम्ही जेव्हा फ्लॅशलाईटच्या आयकॉन वर क्लिक कराल तेव्हा तुमच्यासमोर ब्राईट लाइट, मीडियम लाइट आणि लो लाइटचा ऑप्शन येईल. यापैकी तुम्हाला हवा तो ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही फ्लॅशलाईटचा ब्राईटनेस कमी जास्त करू शकता.

 

कॅल्क्यूलेटर मिस्टेक सुधारणे

iphone-hidden-features-marathipizza03
says.com

प्रत्येक स्मार्टफोनमध्ये कॅल्क्यूलेटर असतोच. पण प्रत्येक कॅल्क्यूलेटर मध्ये आयफोन सारखी युजर फ्रेंडली फॅसिलीटी नसते. तुम्ही जर आधी कधी स्मार्टफोन मधील कॅल्क्यूलेटर वापरला असेल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की, कॅल्क्यूलेट करताना एखादी जरी चूक झाली तरी सगळं गणित कट करून नव्याने सुरुवात करायला लागते. आयफोनने मात्र हीच गैरसोय टाळण्यासाठी आपल्या कॅल्क्यूलेटर मध्ये बॅकस्पेसचा ऑप्शन दिलाय. यासाठी तुम्हाला केवळ राईट किंवा लेफ्ट स्वाईप करायचं आहे.

 

रेड नोटिफिकेशन बंद करणे

iphone-hidden-features-marathipizza04
osxdaily.com

जर तुम्ही वारंवार तुमच्या आयफोन वर येणाऱ्या रेड नोटीफिकेशन ने कंटाळला असाल तर हा ऑप्शन खास तुमच्यासाठी आहे. सेटिंग ऑप्शन मध्ये जाऊन नोटीफिकेशन निवडा, तेथे अॅप्पलीकेशनची लिस्ट येईल, त्यातील रेड बॅज्ड ऑप्शन टर्न ऑफ करा.

आहेत की नाही कामाच्या गोष्टी!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?