' जिथे बायको, बहीण, मुलीच्या शरीराचा सौदा होतो; भारतातल्या ८ बदनाम वस्त्या! – InMarathi

जिथे बायको, बहीण, मुलीच्या शरीराचा सौदा होतो; भारतातल्या ८ बदनाम वस्त्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

धंदा हा शब्द कानावर पडला, की भारतीय व्यक्तीला केवळ सामान्य व्यवसाय/बिझनेस आठवत नाही, तर वेश्याव्यवसाय डोळ्यासमोर येतो. एक असा व्यवसाय जिथे समाजातील मुलीबाळींचा, स्त्रियांचा सौदा केला जातो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पुरुषांच्या वासनांध भावना शमवण्यासाठी स्त्री आपला देह विकते. ही देहविक्री कधी मनापासून केली जाते, तर कधी मनाविरुद्ध! मात्र या दलदलीत मनाविरुद्ध जरी प्रवेश झाला असला, तरी या स्त्रिया त्याच दलदलीचा कायमचा भाग होऊन जातात.

त्यांची वस्ती, त्यांच्या जागा निराळ्या असतात. समाजातील सामान्य लोकांमध्ये कधीच त्यांची उठबस होत नाही. त्यांच्या या वस्तीला ‘रेड लाईट एरिया’चा टॅग लागला, की न जाणे किती माता, बहिणी आणि अगदी अर्धांगिनींचा सुद्धा सौदा केला जातो. त्यामुळेच या वस्त्या देशात बदनाम आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अशाच काही वस्त्यांविषयी थोडंसं, काही माहित असलेलं, काही माहित नसलेलं…

१. सोनागाची, कलकत्ता

 

red light area im

 

भारतातील सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम असणं हा मान जसा कलकत्त्याकडे आहे, तसंच आशिया खंडातील सगळ्यात मोठा रेड लाईट एरिया असणं हा धब्बा सुद्धा आहे.

११००० हून अधिक सेक्स वर्कर्स राहत असलेला हा भाग, म्हणजे एक वेगळंच जग आहे. ‘बॉर्न इंटू ब्रॉथल्स’ या डॉक्युमेंट्रीमधून इथे जन्माला येणाऱ्या मुलांचं भयावह वास्तव पाहायला मिळतं.

२. मिरगुंज, प्रयागराज

 

red light area im1

 

उत्तरप्रदेश सारख्या मोठ्या राज्यात, देहविक्रीच्या व्यवसायाचं साम्राज्य पाहायला मिळालं नाही, तरच ते नवल ठरेल. मिरगुंज हा रेड लाईट एरिया म्हणजे मानवी तस्करी आणि जबरदस्तीने करून घेतला जाणारा वेश्या व्यवसाय याचं मोठं उदाहरण आहे. ही वस्ती पर्यटकांसाठी सुद्धा धोकादायक मानली जाते.

३. जी बी रोड, दिल्ली

 

red light area im2

 

दिल्लीमधील ही वस्ती म्हणजे एक आश्चर्य मानलं जातं. तळमजल्यावर वाहनांचे स्पेअर पार्ट्स आणि मशिनरी यांची दुकानं, आणि वरच्या मजल्यांवर सर्रास सुरु असलेला वेश्याव्यसाय असं याचं स्वरूप आहे. या भागतील रस्त्यारस्त्यांवर शेकड्यांनी वेश्यागृहं पाहायला मिळतील.

४. कामाठीपुरा, मुंबई

 

red light area im

 

मुंबईमधील कामाठीपुरा ही वस्ती माहित नाही, अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा रेड लाईट एरिया म्हणून हा भाग ओळखला जातो.

एका बाजूला महिलांकडून चालवण्यात येणारी बिडीची इंडस्ट्री तर दुसरीकडे महिलांचं सर्वस्व उध्वस्त करणारी वेश्यावस्ती, अशी कामाठीपुराची ओळख आहे. ऐंशीच्या दशकात अंडरवर्ल्डचा सुद्धा इथे थेट संबंध होता. दाऊद इब्राहिमसारखे गॅंगस्टर्स इथे अनेकदा येत असत असं म्हटलं जातं.

५. बुधवार पेठ, पुणे

 

red light area im4

 

विद्येचं माहेरघर मानलं जाणारं पुणे शहर, दुर्दैवाने देहविक्रीच्या व्यवसायातही मागे राहिलं नाही. देशातील तिसऱ्या क्रमांकाचा रेड लाईट एरिया ही बुधवार पेठेची ओळख आहे.

पाच हजारांहून अधिक सेक्स वर्कर्स इथे आहेत. अर्थात हा भाग इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि पुस्तकं यांचंदेखील मोठं केंद्र मानला जातो.

६. इतवारी, नागपूर

नागपूरमधील इतवारी हा भाग वेश्याव्यवसायासह गुन्हेगारी विश्व म्हणूनही कुविख्यात आहे. या भागाला गंगा यमुना म्हटलं जातं, हा काहीसा विरोधाभास म्हणायला हवा.

७. शिवदासपूर, वाराणसी

 

red light area im3

 

वाराणसी म्हटलं, की आधी हिंदू मंदिरं, पवित्र गंगा, उत्तरप्रदेशातील प्राचीन हिंदू संस्कृती या आणि अशा सकारात्मक गोष्टी आठवतात. मात्र याच वाराणसीमध्ये सुद्धा वेश्याव्यसायाने मोठ्या प्रमाणावर पाय रोवलेले आहेत.

वर्षानुवर्षं शिवदासपूर हे गाव इथे वसलेलं आहे. इथल्या घराघरातून वेश्याव्यवसाय चालतो. हा रेड लाईट एरिया एक स्वस्त रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो.

८. चतुर्भुजस्थान, मुजफ्फरपूर

पूर्वापार काळापासून एका बाजूला मंदिरं आणि दुसरीकडे वेश्यागृहं अशीच या भागाची ओळख बनली आहे. हे पाहायला, ऐकायला, काहीसं विचित्र वाटत असलं, तरी या भागातील कटू सत्य आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?