' शिया मुस्लिम खरंच अन्नात थुंकून ते वाढायचे का? वाद घालण्यापुर्वी हे सत्य जाणून घ्या – InMarathi

शिया मुस्लिम खरंच अन्नात थुंकून ते वाढायचे का? वाद घालण्यापुर्वी हे सत्य जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

रविवारी लता दीदींनी अखेरचा श्वास घेतला. गानकोकिळा, गानसम्राज्ञी म्हणून ओळखली जाणारी ही दैवी देणगी असणारी गायिका भारताची शान होती. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित लता मंगेशकर यांचं निधन हा राष्ट्रीय दुखवट्याचा भाग ठरलं. पण एका बाजूला हा दुखवटा सुरु असताना दुसरीकडे मात्र काही निराळेच मुद्दे चर्चेत आले.

 

 

lata mangeshkar im 2

 

लतादीदींच्या मृत्यूनंतरही राजकारण आणि धार्मिक मुद्दे चर्चिले गेले. यात दोन विषय फारच आघाडीवर आहेत. एक म्हणजे लता दीदींचं स्मारक आणि दुसरी म्हणजे शाहरुखने केलेली कृती!

 

shahrukh spit featured IM

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

अनेक उलटसुलट चर्चा, तर्क-वितर्क यांना उधाण आलं. या सगळ्याचा परिपाक म्हणून चर्चेत आला तो आणखी एक मुद्दा, शिया मुसलमान आणि अन्न वाढण्याआधी त्यांनी अन्नात थुंकणं. पण यामागचं नेमकं सत्य काय आहे? खरंच शिया मुसलमान अन्नात थुंकून, मग अन्न वाढायचे का? चला जाणून घेऊयात…

चर्चा नेमकी काय असते?

अन्नात थुंकणं, हा खरोखरंच एक किळसवाणा आणि नकोसा असलेला प्रकार ठरतो, यात शंकाच नाही. मुसलमान धर्माच्या बाबतीत याच विषयाबद्दलचा एक मुद्दा अनेकदा चर्चेत असतो. अनेकांच्या मते, मुस्लिमधर्मीय व्यक्ती अन्न वाढण्याआधी त्यात थुंकतात. एवढंच नाही तर याविषयी असंही म्हटलं जातं की इतर धर्मातील व्यक्तींना अन्न वाढायचं असेल, त्याचवेळी हे असं कृत्य त्यांच्याकडून केलं जातं.

 

muslim im

 

या म्हणण्याला दुजोरा देणारे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. शाहरुखचा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून जशा चर्चा रंगल्या तशाच चर्चा हे असे व्हिडिओ पाहून सुद्धा रंगतात, हे वेगळं सांगायला नको. मात्र शाहरुखच्या त्या व्हिडिओमध्ये सुद्धा जे दिसलं ते पूर्ण सत्य नसल्याचं आपण पाहिलं आहे. त्यामुळे असे हे व्हायरल होणारे इतरही व्हिडिओ नेहमीच योग्य किंवा विश्वास ठेवण्यालायक असतात असं नव्हे.

एवढंच नाही, तर मौलवींच्या नावाने सुद्धा या अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या, ऐकवल्या, पढवल्या जातात. आता जिथे समोर दिसणारा व्हिडिओ सुद्धा अर्धसत्य असू शकतो, तिथे ऐकीव गोष्टींबद्दल वेगळे सांगणे न लगे.

मग नेमकं सत्य काय?

याविषयी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केलात, अगदी मौलवी किंवा धर्मातील प्रतिष्ठित, धर्माचे अभ्यासक असणाऱ्या व्यक्तींशी चर्चा केलीत, तर तुमच्या असं लक्षात येईल की शिया मुसलमानांनी अन्नामध्ये थुंकणं ही केवळ एक ऐकीव घटना आहे. ना कुणी प्रत्यक्षात असं घडताना पाहिलंय, ना कुठल्याही पुस्तकात, वा धर्मग्रंथात असा काही उल्लेख आढळतो.

आता या सगळ्या ऐकीव गोष्टींवर कितपत विश्वास ठेवायचा, याचा विचार त्या-त्या व्यक्तीने सद्सद्विवेक बुद्धीने करायला हवा.

अशाही दंतकथा…

असं म्हटलं जातं, की एका बादशहाने शिया मुसलमानांना आचारी म्हणून कामावर ठेवलं होतं. दिवसभर अन्न शिजवण्याचं काम करणाऱ्या आचाऱ्यांना आराम मिळेनासा झाला. मग त्यांनी काही ना काही कारणं काढून काम टाळायला सुरुवात केली. एवढ सगळं घडूनही, बादशाह मात्र बधला नाही.

 

mughal im

 

मग शेवटी या प्रकाराला वैतागून आचाऱ्यांनी सन्नाटा थुंकायला सुरुवात केली. या अशी गोष्ट घडू नये, म्हणून बादशहाने त्यांना या त्रासदायक आणि दिवसभराच्या कामावरून हटवलं आणि जमिनी संभाळण्याचं काम दिलं.

आता या बादशाहचं नावंही कुणाला ठाऊक नाही, आणि या शिया मुस्लिमांना शिक्षा का झाली नाही याबद्दल सुद्धा कुणालाही काहीही माहित नाही. ही दंतकथा सुद्धा फक्त ऐकली आणि ऐकवली जाते.

अशीच अजून एक कथा आहे, इस्लाम धर्मसंस्थापक मुहम्मद पैगंबर यांच्या उपस्थितीत शिया मंडळींनी एक मेजवानीचा कार्यक्रम ठेवला होता. यावेळी अन्नात थुंकून ते अन्न वाढण्यात आलं होतं. तिथून पुढे ही प्रथा सुरु झाली. आता धर्मसंस्थापक उपस्थित असताना जे घडलं, ती प्रथा पडणं साहजिक आहे असं कुणीही म्हणेल.

अहो पण मंडळी, जर इस्लाम धर्माचा नीट अभ्यास केला, तर असं लक्षात येईल, की शिया आणि सुन्नी हे विभाजनच मुहम्मद पैगंबराच्या मृत्यूनंतर अस्तित्वात आलं आहे. मग शियांनी कुठली मेजवानी ठेवली होती?

थोडक्यात सांगायचं झालं तर, शिया अन्नात थुंकून अन्न खायला घालतात किंवा असं करत होते या म्हणण्याला दुजोरा देणारा कुठलाही लेखी किंवा दृश्य पुरावा अस्तित्वात नाही, आहेत त्या केवळ ऐकीव गोष्टी… ऐकीव गोष्टींना खतपाणी घालायला वेळ लागत नाही, असं म्हटलं तरी ते चुकीचं नाही. बाकी प्रत्येक जण सुज्ञ आहेच.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?