' दीदींच्या अंत्यदर्शनाला मराठी कलाकार का नव्हते? हेमांगी कवीने केला खुलासा! – InMarathi

दीदींच्या अंत्यदर्शनाला मराठी कलाकार का नव्हते? हेमांगी कवीने केला खुलासा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

गानसरस्वती लता मंगेशकर यांचं रविवार, ६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुःखद निधन झालं. या बातमीने केवळ मनोरंजन सृष्टीतच नव्हे, तर संपूर्ण भारतावर शोककळा पसरली. आपल्या घरातलीच व्यक्ती जावी असे भाव प्रत्येकाच्या मनात होते. अनेकांनी दीदींच्या गाण्यांमधून, सोशल मीडियावर पोस्ट लिहून विविध माध्यमांनी दीदींना श्रद्धांजली वाहिली.

लता मंगेशकर यांच्यावर दादरच्या शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस राजकीय, मनोरंजन वर्तुळातील अनेक दिग्गज मंडळी दीदींचे अंतिम दर्शन घेण्यासाठी उपस्थित होती, पण या सगळ्यात मराठी कलाकार मात्र कुठेच दिसले नाहीत, नेमकं काय कारण होतं यामागे?

 

lata mangeshkar im 1

 

मराठी कलाकारांची अनुपस्थिती हा सध्या चर्चेचा मुद्दा झाला आहे. अंतिम दर्शनाला मराठी कलाकार न दिसल्यामुळे नेटकऱ्यांनीदेखील कलाकारांना ट्रोल केले आहे. मात्र खरी परिस्थिती मात्र काहीशी वेगळीच होती. नेटकऱ्यांच्या या ट्रोलिंगवर अभिनेत्री हेमांगी कवी हीने सडेतोड उत्तर देत, तिथे नेमकी काय परिस्थिती होती हे सांगितले आहे.

 

फेसबुकवरील एका पोस्टच्या कमेंटमध्ये अभिनेत्री हेमांगी कवीने म्हटले आहे, की ‘सरकारी protocols आड आले. मला gate मधून जाऊ दिलं नाही. खूप विनंती केली. मला या gate वरून त्या gate वर जा म्हणत राहिले. शेवटी एका Psi साहेबांना माझी दया आली आणि मला लपून लपून कसा बसा प्रवेश मिळवून दिला. Nandesh Umap मी आणि Abhijeet Kelkar 4 वाजल्यापासून तिथं होतो. शेवट पर्यंत आम्हांला विनंती करून ही दर्शन मिळत नव्हतं. संगीताचे खरे वारसदार गायक शान, शैलेंद्र सिंग, बेला शेंडे, कविता पौडवाल यांना ही मागे हटकलं जात होतं, तिथं माझी काय गत!’

पुढे तिने असे म्हटले आहे, की ‘आम्ही तिथे कुणी celebrity म्हणून गेलोच नव्हतो. एक निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होतो. आम्हांला ही शासकीय protocols कळत होते. म्हणून थांबून होतो. पण नंतर आम्हांला सांगितलं वेळ नाहीये आता जवळून दर्शन मिळणार नाही. अक्षरशः भांडून आम्ही शेवटचं दर्शन घेतलं! कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कुणी आलं नसावं!’

 

hemangi kavi im

 

लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेला आणि पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी भयंकर गर्दी होती त्यामुळे पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांवरही ताण आला होता. एकूणच तिथे नेमकं काय घडलं यावर हेमांगीने प्रकाश टाकला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?