' सर्वसामान्य लोकांना भारीचे ड्रेसेस मिळवून देणारा, एका तरुणाचा लयभारी उपक्रम… – InMarathi

सर्वसामान्य लोकांना भारीचे ड्रेसेस मिळवून देणारा, एका तरुणाचा लयभारी उपक्रम…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण नेहमी गरजूंना मदत करतो. ती मदत काहीवेळा खाऊच्या रूपात असते, कधी पैशांच्या रूपात असते तर कधी कपड्यांच्या रूपात असते.

गरजूंना मदत करण्याच्या भावनेतूनच पूर्वी माणुसकीची भिंत हा उपक्रम सगळीकडेच राबवला गेला, पण शेवटी या उपक्रमाचं काय झालं ते वेगळं सांगायची गरज नाही. लोकांनी या भिंतीपाशी द्यायचे म्हणून फाटके कपडे आणून टाकले. शेवटी शेवटी तर घरातला कचरा आणून टाकायला सुरुवात केली.

हे झालं महाराष्ट्रात. पण केरळमधल्या एका तरुणालाही गरजूंना मदत करावीशी वाटली. थोडा विचार केल्यावर त्याने चालू केली ड्रेस बँक! आश्चर्य वाटलं ना? ज्यांनी पहिल्यांदा संकल्पना ऐकली त्यांनाही असंच वाटलं होतं, पण नासर थुथा या अनिवासी भारतीयाने ड्रेस बँकेचं स्वप्न नुसतं बघितलं नाही तर ते सत्यात उतरवलं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

नासर थुथा आणि त्याची ड्रेस बँक…

पेरिंथलमन्ना या केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातल्या गावचा नासर थुथा सौदी अरेबियातल्या एका सुपरमार्केटमध्ये काम करत होता. २०१३ ला तो भारतात परत आला. ४४ वर्षांचा नासर टॅक्सी चालवायला लागला, मात्र त्याच्या परोपकारी स्वभावामुळे त्याला भारतातलं दुःख बघवत नव्हतं.

लोकांना लग्न करताना लग्नात घालायचा एक ड्रेसही नाही हे बघून त्याला आयडिया सुचली ती म्हणजे ड्रेस बँक! ज्यांना स्वतःच्या लग्नात घातलेले कपडे परत वापरायचे नाहीत त्यांनी ते नासरकडे जमा करायचे आणि तेच कपडे नासरने गरजूंना त्यांच्या लग्नात घालण्यासाठी म्हणून द्यायचे.

 

dress bank im5

 

ही त्याला मार्च २०२० मध्ये सुचलेली कल्पना. १०० ड्रेसवरून सुरु झालेला हा प्रवास केवळ वर्षभरात आता १००० ड्रेसेसपर्यंत आला आहे.

नासरने सोशल मीडियाद्वारे लोकांना आवाहन केलं होतं की, “तुम्ही तुमच्या लग्नात घातलेले कपडे पुन्हा घालत नाही किंवा १-२ वेळेला घातले असतील तरीही आम्ही ते घेऊ. असे कपडे आमच्यापर्यंत पोहोचावा.”

ड्रेस बँकबद्दल आणखी थोडी माहिती

 

dress bank im

 

नासरने केलेल्या आवाहनाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला त्याला त्याच्या घरच्यांनी आणि मित्रमंडळींनी कपडे दान करून मदत केली. त्यानंतर त्याला सोशल मीडियावर केलेल्या आवाहनामुळे भरपूर फायदा झाला. अनेक लोकांनी वधूचे कपडे त्याला दान केले.

हे कपडे नासर आणि त्याच्या मित्रांनी परिसरातल्या गरजूंना दान करण्यास सुरुवात केली. सध्या नासरची ही ड्रेस बँक मंगळवारी आणि रविवारी उघडी असते, पण “मी तुम्हाला मदत करता यावी म्हणून टॅक्सी स्टॅण्डवर जात नाही. जवळच असतो. तुम्हाला केव्हाही ड्रेस हवा असेल तर सांगा. मी फक्त एक फोन कॉल लांब आहे”, असं नासर सांगतो.

 

dress bank im2

 

ड्रेस बँकसाठी नासरला आता बऱ्याच ठिकाणाहून वधूचे ड्रेस मिळत आहेत. याबाबत नासर म्हणाला, “आम्हाला मिळणारे कपडे तसे बघायला गेलं तर नवीनच आहेत. कारण ते फक्त काही तासांसाठीच वापरले आहेत,  पण आम्ही ते कोणालाही देण्याआधी ड्रायक्लिन करून मगच देतो. कोणत्याही कुटुंबाला आम्ही कपडे दिले की वापरल्यावर परत करा असं सांगत नाही. मात्र काहीजण आपणहून कपडे परत करतात.”

नासरकडे सध्या हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा धर्मांच्या वधूसाठी जवळजवळ १००० ड्रेस आहेत. त्यांना आता इतर राज्यातूनच नव्हे तर एनआरआयकडूनही मदत मिळत आहे.

नासरसारख्या लोकांची सध्या समाजाला गरज आहे. कदाचित नासरसारखे लोक या जगात असतीलही, मात्र ते समोर येत नाहीत. नासरला त्यासाठी सोशल मीडियाचा खूप फायदा झाला.

 

dress bank im4

 

या ड्रेस बँकमध्ये फक्त वधूचेच कपडे मिळतात का? तर हो. वराच्या कपड्यांसाठी नासरकडे अजून तशी मागणी आलेली नाही. त्यामुळे त्याच्याकडे म्हणावा तसा वरच्या कपड्यांचा संग्रह नाह, मात्र वधूच्या कपड्यांचा संग्रह खूप मोठा आहे. येत्या काळातही नासरच्या ड्रेस बँकसारख्या अनोख्या संकल्पना अस्तित्वात येतील आणि त्या खूप प्रसिद्धी पावतील यात शंका नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?