' शाहरुखच्या कृत्याबद्दल एक राष्ट्रप्रेमी मुस्लिम काय म्हणतोय - विचारात पाडणारा लेख

शाहरुखच्या कृत्याबद्दल एक राष्ट्रप्रेमी मुस्लिम काय म्हणतोय – विचारात पाडणारा लेख

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : इमरान शेख

===

लता मंगेशकर यांनी आंबेडकरांच एकही गाणं गायलं नाही म्हणून आम्ही श्रद्धांजली वाहणार नाही अश्या आशयाच्या पोस्ट/कमेंट वाचून जसं तुमचं डोकं चक्रावतं प्रसंगी रागही येतो.

कसा कुणाच्या मनात कुणाबद्दल इतका द्वेष असू शकतो या विचाराने अक्षरशः वेड लागायची पाळी येते तीच अवस्था आमची (निदान माझी तरी) “शाहरुख लताजींच्या अंत्यदर्शनावेळी थुंकला ह्या कंमेंट्स वाचून हसावं की रडावं?? राग काढावा तर नेमका कुणावर?? स्पष्टीकरण द्यावं तरी कसं???खूपच कन्फ्यूजन होतं खरं तर.

 

shahrukh praying IM

 

आम्ही सुन्नी मुसलमान…. लहान असतांना आमच्यातली काही कट्टर टाळकी (आमचं घर सोडून जवळपास सगळीच) कायम आम्हाला सांगायची की शिया लोकं घरी येणाऱ्या पाहुण्यांना थुंकून पाणी देतात, तेंव्हा कधीही त्यांच्याशी मैत्री करू नये, त्यांच्या घरी ही जाऊ नये.

आणि आम्हाला कायम प्रश्न पडायचा की का असं करत असतील ते? काय मिळत असेल त्यांना असं करून? आणि त्या वेळी आम्हाला ते उत्तर काही सापडलेच नाही.
कॉलेजला असतांना औरंगाबाद ला माझा प्रथमच ह्या जमातीशी (शिया) संबंध आला.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

त्यानंतर माझं कम्प्लीशन झाल्यावर मी जे पहिलं क्लिनिक जॉईन केलं ते एका शिया ट्रस्टचं होतं त्या निमित्ताने जवळपास पाच ते सात वर्ष माझा त्यांच्याशी खूप जवळून संबंध आला, खूप चांगला एक मित्र भेटला (भावासारखा) त्याची आई मला मुलगाच मानायची, बऱ्याचवेळी त्यांच्या घरी त्यांच्या फॅमिली कार्यक्रमात जाणं व्हायचं आणि तिथे मला हे समजलं की एक खोटी गोष्ट घाणेरड्या पद्धतीने आपल्याला सांगण्यात आलीये, त्याला मी एक दोनदा विचारलं ही की आमच्याकडे असं शिकवले जाते ते का म्हणून.

 

shia sunni IM

 

तो फक्त हसला आणि म्हणाला तुम्ही आमच्या जवळच येऊ नये म्हणून असेल कदाचित..नंतर मी खूप खोलात जाऊन हे स्टडी केलं तेंव्हा असं लक्षात आलं की, आपण जे विष पेरतोय आपल्या जमातीच्या मुलांमध्ये उद्या जाऊन ह्यांनी त्याची शहानीशा करूच नये, तसं झालं तर आपल्या कित्येक खोट्या गोष्टी उघड पडतील!

आपण आजवर जे काही सांगत आलोय ते किती खोटं होतं हे कधी यांना समजूच नये… हा त्या मागील हेतू होता..असं काही सांगा की किळस वाटून हे कधी त्यांच्या जवळ जाणारच नाही आणि आपलं पितळ कधीच उघडं पडणार नाही….पण कर्मा उलटून येत असतो मित्रांनो, नियती खूपच क्रूर असते, ती कुणालाच सोडत नाही.

खरं समोर येउन राहतं त्याला कुणीही आडवू शकत नाही..आणि झालं ही तसंच, खरं समोर आलं होतं. त्या दिवशी खूप लाज वाटली स्वतःचीच, आणि तेंव्हा पासूनच यांचा (आपले असूनही) तिरस्कार वाटायला लागला, मन उडत गेलं त्यांच्या इतर गोष्टी देखील नकोश्या वाटू लागल्या. माझ्यासारखे असे बरेच आहेत जे धर्मा पासून कट्टरतेपासून दूर गेले /जात आहेत.

तर मित्रांनो हा खेळ आमच्यासाठी नवा नाही…. ज्या खेळात आज तुम्हाला खूप मजा येतेय तो खेळ आमचा बघून झालाय, शिया अल्पसंख्यांक आणि सुन्नी बहुसंख्य त्यामुळे हे काय आपलं वाकडं करणार?? हा तो अहंकार होता (माज म्हणा हवं तर…. काहीही घाणेरडे आरोप करा यांच्यावर काय फरक पडणार?? पण फरक पडतो मित्रांनो (विधात्याला हा माज मान्य नाही… ही गुर्मी ही मस्ती त्याला मान्य नाही )

 

shia vs sunni namaz IM

 

तुम्ही ह्या खेळात नकळत सामील असाल तर वेळीच बाहेर पडा.. आणि जर का जाणूनबुजून करत असाल तर फार मोठं पाप करताय ही गोष्ट ध्यानात ठेवा. आज मजा वाटतेय पण खरं काय ते जेंव्हा तुमच्या मुलांच्या समोर येईल तेंव्हा ते असच थुकतील तुमच्यावर ज्या थुंकण्याच्या खोट्या कहाण्या आज तुम्ही त्यांना ऐकवताय… कारण आम्ही असच थुकलंय आमच्या लोकांवर खोटं शिकवल्या बद्दल.

आणखीन एक सांगतो माझ्या इथल्या सर्व मित्रांना (तुम्ही खूप प्रेम करता माझ्यावर, मोठ्या भावासारखं मानता, कित्येक जणं मला दादा म्हणतात) भावांनो आपण किती चांगले आहोत हे सिद्ध करण्यासाठी समोरचा किती वाईट किती नीच आहे हे कधीच सांगावं लागत नाही.

सॅमसंग किती छान फोन आहे हे सिद्ध करण्यासाठी कंपनीला नोकिया किती वाईट आहे हे सांगावं लागलं नाही… अँड्रॉइड सिस्टिम जशी सॅमसंग ने ऍडऑप्ट केली तशी ती नोकियाला जमली नाही… हे युजर्स च्याच लक्षात आलं आणि नोकिया आपोआपच शर्यतीतून बाहेर पडला.

 

samsung vs nokia IM

 

हात जोडून सांगायचा विषय इतकाच की तुमच्यातला चांगुलपणा बघून आम्ही तुमच्याकडे खेचल्या गेलोय. कट्टर पणाची ती घाण झालीये आमची बघून, आता परत तीच इकडे ही दाखवून आम्हाला कॉन्फयुज नका करू. खुपच गोची होते आमच्या सारख्यांची मग.. इकडे आड तिकडे विहीर 😢

शाहरुख थुंकला, हबीब थुंकला, सामनापूरचे वडा पाव वाले चाचा थुंकतात, हे सगळेच थुंकतात, यांच्या कडे जाऊ नये ह्यांच्या हॉटेलात खाऊ नये, हे बास करा मित्रांनो मित्रांनो शाहरुख या ठिकाणी थूंकला नाही तर दुआचा भाग म्हणून फुंकर मारली हे लक्षात घ्या.

दुआ झाल्यावर आम्ही देखील आमच्या मुलांच्या डोक्यावर हाथ ठेवतो आणि फूकतो, जेणेकरून मी जी दुआ वाचलीये ती त्याला ही मिळो. आशीर्वाद देण्याची पद्धत म्हणा हवं तर.

 

shahrukh khan 3 IM

 

ज्या गोष्टी चुकीच्या आहेत इकडे त्यांना आम्ही (मी स्वतः तरी) तुमच्या सोबत मिळून विरोधच करीन नव्हे करत आलोय, पण कृपा करून खोट्या गोष्टी पसरवू नका (माहीत नसतील तर माहीत करून घ्या) आणि जर जाणूनबुजून करत असताल तर जसं मी वर म्हणलंय त्या प्रमाणे “कर्मा” कुणालाच सोडत नसतोय.

नियती सूड उगवतेच…शेवटी कसं आहे आती केलं की माती झाल्याशिवाय राहत नाही….

#नियतीचा_नियम_सगळ्यांना_सारखाच

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?