' इन्कम टॅक्सवाल्यांनी कारवर आणली जप्ती, तरीही रेकॉर्डिंगला जाऊन दीदींनी मिळवल्या टाळ्या – InMarathi

इन्कम टॅक्सवाल्यांनी कारवर आणली जप्ती, तरीही रेकॉर्डिंगला जाऊन दीदींनी मिळवल्या टाळ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लतादीदी गेल्या आणि संगीतक्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला. खरंतर लतादीदी गेल्या त्या शरीराने; कारण देह नश्वर असतो. मात्र त्यांचा आवाज, त्यांची गीतं आणि गानकोकिळा लता मंगेशकर हे नाव या गोष्टी अजरामर आहेत.

लतादीदी त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून कायमच या जगात असणार आहेत. अर्थात, यासाठी त्यांना दैवी देणगी म्हणून मिळालेला जादुई आवाज फक्त कारणीभूत नाही. त्यांची चिकाटी, मेहनत, आणि गाण्याप्रती, संगीताप्रती असलेली श्रध्दा हीदेखील याची फार महत्त्वाची कारणं ठरतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

देवाने भरभरून दिलं, दैवी देणगी मिळाली, तरी ती योग्यरित्या वापरता येणं महत्त्वाचं असतं. या दैवी देणगीची लोकांना ओळख व्हावी, नाव, पैसा, प्रसिद्धी आणि मानसन्मान मिळावा, यासाठी समर्पणाची सुद्धा गरज असते. लतादीदींकडे ते समर्पण होतं. अनेक उदाहरणांवरून हे अगदी सहजपणे दिसून येतं. त्यातलंच एक हे उदाहरण!

त्यांची गाडी जप्त झाली होती, परिस्थिती तशी गंभीर होती, पण तरीही त्यांचं गाणं आणि रेकॉर्डिंगप्रती असलेलं समर्पण चक्क त्याही दिवशी दिसून आलं. नेमकं काय घडलं होतं, लतादीदींचा काय अनुभव होता, चला आज जाणून घेऊयात.

दीदी नेहमीप्रमाणे बाहेर पडत होत्या पण…

 

lata didi singing im2

 

एका सकाळची, साधारण ८.३०-९ वाजले असतील अशी ती वेळ होती. दीदी सकाळी आवरून, तयारी करून रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओमध्ये जाणार होत्या. त्या निघणार इतक्यात दोन माणसं त्यांच्या घरी आली. आगंतुक पाहुण्यांसारखे येऊन उभे राहिलेले हे दोघे जण कोण आहेत, याची लता दीदींना कल्पना नव्हती.

त्या दोघांनी मात्र तर इनकम टॅक्स डिपार्टमेंटमधून आले असल्याचं सांगितलं. इनकम टॅक्स न भरल्याबद्दल लता मंगेशकर यांच्यावर कारवाई करण्यासाठी ते दोघेही आले होते. लता दीदींना मात्र त्याविषयी काहीच माहित नव्हतं. एवढंच नाही, तर नेमका काय खटला त्यांच्यावर आहे, याविषयीसुद्धा त्या अनभिज्ञ होत्या.

लता दीदींवर कारवाई कारण्याच्या उद्देशाने आलेले ते दोघेही त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते. ‘तुम्ही एखादी महागडी गोष्ट आम्हाला लिखित स्वरूपात लिहून द्या’ या मतावर ते ठाम होते.

गाडीवर जप्ती…

लता दीदींनी यासगळ्याबद्दल त्यांना काहीच कल्पना नसल्याचं सांगितलं होतं. मात्र ते दोघेही मागे हटायलाच तयार नसल्याने, दीदींना यावरील उपाय काय याविषयी त्यांना विचारलं. एखाद्या किंमती वस्तूवर जप्ती आणावी लागेल, आणि दीदींना तसं लिखित स्वरूपात द्यावं लागेल असा पर्याय त्या दोघांनी सांगितला.

हे ऐकल्यावर लता दीदींनी एका कागदावर त्यांच्या कारविषयी लिहून दिलं आणि त्यावर सही सुद्धा केली. मात्र हे करत असताना, “रेकॉर्डिंगला जाण्यासाठी मला गाडी लागणार आहे, त्यामुळे मला आत्ता ती घेऊन जाऊ द्या” अशी विनंतीदेखील केली. लिखित पुरावा हाती असल्यामुळे त्यांनीदेखील गाडी घेऊन जाण्याची परवानगी दीदींना दिली आणि त्याच गाडीत बसून लताजी रेकॉर्डिंगला निघून गेल्या.

रेकॉर्डिंगनंतर कौतुक आणि वाहवा…

 

lata didi im

 

शंकर जयकिशन यांचं रेकॉर्डिंग पूर्ण करण्यासाठी दीदी त्यादिवशी गेल्या होत्या. रेकॉर्डिंग आणि लताजींचं गाणं इतकं अप्रतिम झालं, की तिथे उपस्थित असणारे सगळेजण उभे राहिले. दीदींचं सगळ्यांनीच कौतुक केलं. हार, फुलं, पेढे अशा वस्तू देऊन त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी सगळ्यांनीच पुढाकार घेतला.

‘याआधी इतकं उत्तम गाणं झालं नव्हतं, अव्वल दर्जाचं रेकॉर्डिंग झालं’ अशी दाद शंकर जयकिशन यांनी सुद्धा दिली.

स्टुडिओला पोचण्याआधीच एका कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला असूनही, त्याचा काडीमात्रही परिणाम दीदींच्या गाण्यावर झाला नाही.

रेकॉर्डिंगला आल्यावर त्यांच्या मनात फक्त आणि फक्त गाण्याचे आणि कामाचे विचार सुरु होते. त्यांची कलेप्रती असलेली श्रद्धा आणि समर्पण भाव यांचं दर्शन घडवण्यासाठी हे उदाहरण पुरेसं आहे, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये.

तुम्हालाही लता दीदींच्या कामाप्रती, कलेप्रती आणि गाण्याप्रती असलेल्या श्रद्धेचे असेच काही किस्से माहित असतील, तर ते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?