' १९३८ च्या कुंभमेळ्यात सुरक्षेसाठी वापरलेली ही युक्ती यंदाच्या निवडणुकांमध्ये पुन्हा दिसणार – InMarathi

१९३८ च्या कुंभमेळ्यात सुरक्षेसाठी वापरलेली ही युक्ती यंदाच्या निवडणुकांमध्ये पुन्हा दिसणार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमुळे सत्ताधारी आणि विरोधीपक्ष यांच्यामध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. फेब्रुवारी मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकी वेध संपूर्ण उत्तरप्रदेशातील जनतेला लागले आहेत. परंतु निवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यासाठी युपी पोलीस सज्ज आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

याच पार्श्वभूमीवर १८३४ च्या कुंभमेळ्यात गर्दीचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी तसेच १९७० च्या सुमारास झालेल्या डकैती विरोधी कारवाईसाठी उपयुक्त ठरलेल्या रेडिओ टेलिफोनी सिस्टीमचा वापर करण्याचा निर्णय युपी पोलीसांनी घेतला आहे.

 

radio im

 

युपी पोलीस यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकी मध्ये रेडिओ टेलिफोनी सिस्टीमचा वापर करणार आहे. यासाठी हाय वेव्ह , वेरी हाय वेव्ह आणि अल्ट्रा हाय वेव्ह अशा तीन लहरींवर काम करणाऱ्या रेडिओ टेलिफोनी यंत्रणा किमान ४५६ मतदान केंद्रावर तैनात केल्या जातील. त्यामुळे सेल्युलर नेटवर्क नसलेल्या ठिकाणी सुद्धा मतदान पक्ष आणि सुरक्षा दलांना एकमेकांच्या संपर्कात राहणे शक्य आहे. या यंत्रणेमुळे मोबाईल मध्ये कमी नेटवर्क असल्यास किंवा नेटवर्क नसलेल्या ठिकाणी सुद्धा संपर्क करता येतो.

या यंत्रणेचा वापर करून, तैनात केलेले कर्मचारी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील नियंत्रण कक्षाला निवडणूक कार्यवाहीबद्दल दक्ष ठेवतील. तसेच एखादी घटना घडल्यास त्यांना आधीच सूचना देऊन सतर्क करतील.

 

elections inmarathi
asiadialogue.com

” रेडिओ टेलिफोनी सिस्टीम ही फक्त जुनीच नाही… तर जगभरातील पाळत ठेवण्यासाठी तसेच पोलिसिंग एजन्सीद्वारे संवाद साधण्यासाठी वापरली जाणारी , योग्य चाचपणी केलेली आणि अत्यंत विश्वासार्ह पद्धत आहे,” राज्य पोलिसातील एका अधिकाऱ्याने आपले मत व्यक्त केले.
वायरलेस टेलिफोनी युनिटच्या एका माजी कर्मचाऱ्याने उघड केले की यूपीकडे सद्या अत्यंत मजबूत प्रणाली आहे.

 

keral police inmarathi

 

“UP चौथ्या पिढीतील मायक्रोप्रोसेसर आधारित वैशिष्ट्यीकृत रेडिओ संच वापरतो. याचा अर्थ वापरकर्त्याकडे कॉलर ओळखणे, ग्रिड जॅमिंग दूर करणे, ग्रीड शिस्त राखणे इत्यादी सुविधा आहेत. यामध्ये निवडक कॉल करणे शक्य आहे . तसेच ग्रुप मध्ये किंवा विशिष्ट वापरकर्ता संदेश पाठवू किंवा ऐकू शकतो. ”

अधिकाऱ्यांच्या मते, पीलीभीत, लखीमपूर खेरी, महाराजगंज, सिद्धार्थनगर, बहराइच, बलरामपूर, श्रावस्ती, ललितपूर, मेरठ, चंदौली आणि सोनभद्र अशा मोक्याच्या ठिकाणी रेडिओ टेलिफोनीची भूमिका महत्त्वाची आहे.

याबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही यंत्रणा संवाद स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांची गुरुकिल्ली आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स सुरू झाल्याने फेरफार करण्याची संधी शून्यावर आली आहे. मात्र अशा स्थितीत वीजपुरवठा खंडित होणे किंवा मतदानात अडथळे येण्याइतपत अन्य कोणतीही समस्या असली तरी त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

 

india.com

गोवा, उत्तर प्रदेश या राज्यांच्या निवडणूका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने प्रचार करून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आधीच ओमिक्रोन, कोरोनाचे सावट टळलले नाही त्यामुळे आपणच सर्वानींच जबाबदारीने वागले पाहिजे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?