' स्वसंरक्षणासाठी शिकल्या पिस्तूल, मृदू- रेशमी आवाजामागच्या कणखर लतादीदी! – InMarathi

स्वसंरक्षणासाठी शिकल्या पिस्तूल, मृदू- रेशमी आवाजामागच्या कणखर लतादीदी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर काल आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याची बातमी कळताच संपूर्ण भारतातले त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले. ‘नाम गम जायेगा, चेहरा ये बदल जायेगा, मेरी आवाज ही पहचान है…’ या त्यांच्या गाण्याची ओळी काल ऐकून सगळ्यांचेच डोळे पाणावले.

अगदी लहान वयात घरची जबाबदारी लतादीदींवर पडली. त्यांचं शालेय शिक्षण सुरु झालं, पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी शाळा सोडली. त्यामागचं कारणही तसं गमतीशीरच होतं. शाळेच्या दुसऱ्या दिवशी त्या सात- आठ महिन्याच्या आशाला घेऊन शाळेत गेल्या होत्या. इतक्या लहान वयाच्या मुलांना शाळेत प्रवेश नाही, असं गुरुजींनी सांगितल्यानंतर त्या आशाताईंना घेऊन तडक घरी आल्या, त्यानंतर कधीच त्या पुन्हा शाळेत गेल्या नाहीत.

 

lata didi im

 

संपूर्ण घराची, भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर होती. भावंडांना घेऊन त्या अनेक ठिकाणी फिरत असत. या सगळ्यात ‘सुरक्षा’ हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता.

लतादीदींच्या आवाजासाठी संपूर्ण जग वेडं आहेच, पण रियाजापलीकडे अनेक गोष्टींची त्यांना आवड होती. त्या उत्तम फोटोग्राफी करायच्या. त्याशिवाय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोल्हापुरातील पन्हाळ्यावर राहत असताना त्या ‘पिस्तूल’ शिकल्या होत्या.

 

lata mangeshkar IM

 

ज्येष्ठ रंगकर्मी, दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी लता दीदींना पिस्तूल चालवायला शिकवली होती. ‘स्वसंरक्षण’ फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी पिस्तूल चालवायला लतादीदींनी शिकावं या मताचे ते होते. म्हणूनच त्यांनी दीदींना पिस्तूल चालवायला शिकवली, पण दीदींना कधीच ती पिस्तूल चालवायची नव्हती, आणि सुदैवाने ती वेळही आली नाही.

हा किस्सा प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी एका कार्यक्रमात सांगितला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?