' ‘स्वाईप राईट’ करत परफेक्ट डेट मिळवून देणारं टिंडर इतकं प्रसिद्ध झालं कसं? – InMarathi

‘स्वाईप राईट’ करत परफेक्ट डेट मिळवून देणारं टिंडर इतकं प्रसिद्ध झालं कसं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आई-वडिलांनी घरातील इतर मोठ्या आणि अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने आणि सहमतीने मुलांची लग्नं ठरवणं, आई-वडिलांनी निवडलेल्या व्यक्तीलाच आयुष्यभराचा जोडीदार म्हणून मान्य करणं, हा काळ आता राहिलेला नाही.

आजही कांदेपोह्याचे कार्यक्रम, लग्न ठरवण्याच्या बैठका आणि इतर तत्सम गोष्टी होत असल्या, तरीही मुलामुलींनी आपल्या पसंतीने आपला जोडीदार निवडणं आणि पालकांनी सुद्धा त्यांच्या पसंतीला होकार देणं या गोष्टी अगदी सामान्यपणे घडू लागल्या आहेत.

आताचा काळ तर स्वतःच स्वतःचा जोडीदार निवडणं, डेटिंग, लिव्ह इन अशा सगळ्या नव्या संस्कृतीचा सुद्धा आहे. मुलींना अधिक प्रमाणात मिळू लागलेलं स्वातंत्र्य, मुली स्वावलंबी होणं, ही याची काही कारणं म्हणता येतील.

याशिवाय संपर्क माध्यमं अतिशय वेगवान आणि सोयीस्कर झालेली असणं आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव या गोष्टी सुद्धा याला कारणीभूत आहेत असं म्हणायला हवं.

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे डेटिंग साईट्ससारखे पर्यायही तरुणांकडे उपलब्ध आहेत. ओकेक्युपिड, बम्बल, टिंडर अशी डेटिंग ऍप्स आता अनेक तरुणांच्या जीवनाचा भाग बनली आहेत. टिंडर हे ऍप कसं बनवलं गेलं आणि कसं सगळ्यांचं लाडकं ठरत गेलं, ते आज जाणून घेऊयात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

टिंडर खास आहे

 

tinder app im

 

डेटिंग ऍप्समध्ये सर्वाधिक पसंती मिळाली, सर्वात हिट आणि तरुणांचं लाडकं ठरलं, ते म्हणजे टिंडर. तरुणाईला या ऍपने खास भुरळ पाडली. नवीन मित्रमैत्रिणी शोधायला आणि मुख्य म्हणजे कॅज्युअल डेटिंगपासून सिरीयस रिलेशनशिपपर्यंत सगळ्या गोष्टींसाठी जोडीदार शोधायचा, म्हणजे टिंडर ऍप मदतीला धावून येतं.

कुणाला फार काही सिरीयस नको असतं म्हणून, तर कुणाला सिरीयस नातं हवं असलं, तरी वधुवरसूचक मंडळातून मिळणारं, शो-पीससारखं डिस्प्ले केलेलं नातं नको असतं म्हणून या टिंडरचा पर्याय निवडला जातो.

वापरायला सुद्धा सोपं

टिंडर अँड्रॉइड मोबाईलवर उपलब्ध आहे. त्यामुळे त्याचा वापर करणं फार सोपं आहे. याशिवाय फेसबुकच्या अकाउंटने टिंडरवर अकाउंट बनवण्याचा पर्याय उपलब्ध असल्यामुळे, सगळी माहिती त्या ऍपवर जाणं सुद्धा अगदीच सोपं आहे.

टिंडरचा वापर करून आजूबाजूच्या परिसरातील व्यक्ती शोधणं आणि आवडत्या व्यक्तींना राईट स्वाईप करणं यासाठी फार डोकं चालवण्याची सुद्धा गरज भासत नाही. दोघांनी एकमेकांना राईट स्वाईप केलं की झालं, इतका सहजसोपे वापर असल्यामुळे तरुणांची पहिली पसंती टिंडरला मिळत गेली.

खास सुविधा असणारी मेम्बरशिप

 

tinder app im1

 

टिंडरवर १२ तासांमध्ये एखादी व्यक्ती १०० जणांना राईट स्वाईप म्हणजेच लाईक करू शकते. एवढे सगळे पर्याय थेट एका क्लिकवर आणून ठेवणारं टिंडर लोकांचं आवडतं झालं. एवढंच नाही, तर याहून काही खास सुविधा तुम्हाला हव्या असतील तर त्याचेही पर्याय टिंडरने उपलब्ध करून दिले आहेत.

टिंडर प्लस किंवा टिंडर गोल्ड अशा मेम्बरशिपचा वापर केल्यास कितीही व्यक्तींना राईट स्वाईप करण्याची मुभा तुम्हाला मिळते. बूस्ट आणि सुपरलाईक सारखे काही इतर पर्याय युझरसाठी खुले होतात.

अर्थातच या सुविधा फुकट मिळत नाहीत. त्यासाठी पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागते; पण म्हणतात ना ‘प्यार कें वास्ते हर चीज जायज हैं’, त्याप्रमाणे यासाठी पैसे खर्च करण्याची तयारी सुद्धा हल्लीची तरुणाई दाखवते.

थोडे पैसे खर्च करून, आयुष्याचा जोडीदार मिळणार असेल, तर टिंडरचा वापर करायला हरकत नाही, असं म्हणणारी मंडळी सुद्धा मग या ऍपची चाहती झाली, असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही.

असा झाला प्रवास…

 

tinder app im2

 

प्रेमाचा प्रवास जसा सुरस, मजेदार, मनोरंजक, आंबटगोड वगैरे म्हणावा असा असतो, तसाच काहीसा टिंडरचा प्रवास होता असं म्हणायला हवं.

२०१२ साली सीन रॅड यांनी टिंडरची निर्मिती केली. जोनाथन बदिन आणि जस्टीन मॅटीन हे त्यांचे सहकारी होते. पहिल्या नजरेतील प्रेम, पहिली डेट, त्यातली गंमत, या सगळ्यासाठी एक ऍप तयार झालं आणि पहिल्या दोन वर्षांतच त्याच्या वापरला वेग आला.

 

tinder app im3

 

एक मिलियनहून अधिक लोकांनी त्याचा वापर करायला सुरुवात केली. भारतातही टिंडरचा वापर करणरे तरुण मोठ्या प्रमाणावर दिसू लागले. पहिल्या दोन वर्षांतच एवढी प्रगती करणाऱ्या टिंडचं प्रगतीपुस्तक तसं गुलाबी आणि प्रेमळच होतं.

अवघ्या दीड वर्षांच्या कालावधीत ५०% नियमित वापरकर्ते, ७५ % मंडळी दर आठवड्याला टिंडर वापरणारी आणि तब्बल ८५ टक्के मंडळी महिन्याभरात किमान एकदा ऍपवर चक्कर टाकणारी होती. ही आकडेवारी नक्कीच सुखावह ठरली. मिस यूएसए जेमी अँडरसन हिने टिंडरची वाट धरल्यानंतर, तब्बल ४००% या गतीने टिंडरचे वापरकर्ते वाढू लागले.

या दमदार प्रवासाची सुरुवात खरं तर अवघ्या ३०० जणांच्या गटापासून झाली होती. मात्र अवघ्या आठवड्यभरातच १००० डाऊनलोड्सचा आकडा पूर्ण करत टिंडरने धडाक्यात सुरुवात केली. ऑ

नलाईन डेटिंगसाठीची ही संकल्पना लोकांना फारच आवडू लागल्याची ही पहिली पोचपावती होती. त्यानंतर मात्र टिंडरने कधीच मागे वळून पाहिलं नाही. अनेक प्रेमपुजारी या कुटुंबाचा भाग होत गेले आणि जगभरात टिंडरचा पसारा वाढतच गेला.

घरबसल्या जोड्या जुळवून देणाऱ्या या ऍपच्या प्रवासाची आणि प्रसिद्धीची कहाणी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?