' नाश्ता आणि जेवणाच्या योग्य वेळा कोणत्या ते जाणून घ्या, या वेळा टाळल्यात तर… – InMarathi

नाश्ता आणि जेवणाच्या योग्य वेळा कोणत्या ते जाणून घ्या, या वेळा टाळल्यात तर…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अन्नाचा केवळ आपल्या शारीरिक आरोग्यावरच नाही तर मन आणि प्रकृतीवरही परिणाम होत असतो. जे मनात येईल ते खा… ही सवय आरोग्याला अतिशय हानीकारक ठरू शकते. तसेच तुम्ही काय खाता, काय पिता, किती खाता, या सगळ्या गोष्टी देखील तुमच्या आरोग्यावर परिणाम करतात.

शरीराला हानिकारक आहार घेतल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. एवढेच नाही तर तुम्ही आहार कोणत्या वेळी घेत आहात, हेही महत्त्वाचे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

जर तुम्हाला तुमच्या अन्नातून पूर्ण पोषण मिळावे असे वाटत असेल तर तुम्ही योग्य वेळी अन्न घेतले पाहिजे.

 

food IM

 

अशा परिस्थितीत आहाराशी संबंधित काही नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे. तसेच डॉक्टरदेखील उत्तम आरोग्यासाठी खाण्यासाठीचे काही नियमांचे पालन करण्याची सक्ती करतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अन्न खाण्याच्या पद्धतीबाबत बेफिकीर राहणे म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण देणे होय. आपल्याला सगळेच जण सांगतात की, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाइतकाच सकाळचा नाश्तासुद्धा महत्वाचा असतो.

आपल्या दुपारपर्यंतच्या पोटाचा आधार म्हणजे नाश्ता. सायन्स फिक्शन लिहिणारे रॉबर्ट ए हेनलेन यांनी सांगितलं होतं की, ‘जगाचा अंत होत असेल तरी सुद्धा त्यामध्ये नाश्ता केल्याशिवाय सहभागी होऊ नका’.

 

robert IM

 

रॉबर्ट एकदम बरोबर बोलले होते. सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभराची सुद्धा ऊर्जा देऊन जातो. नाश्ता म्हणजे जेवण जे रात्रीच्या ८ तासांच्या झोपेनंतर केले जाते.

या शब्दाचा जन्म ‘disner’ या इंग्रजी शब्दातून झाला आहे. ज्याचा अर्थ ‘ब्रेक अ फास्ट’ म्हणजे उपवास सोडणं. १५ व्या शतकात हा शब्द इंग्रजी भाषेत समाविष्ट करण्यात आला.

फूड इनसाईटच्या एका सर्वेनुसार, बऱ्याच लोकांना नाश्ता करण्याचे फायदे माहित नाहीत. बरेच लोक सकाळी नाश्ता करत नाहीत. दिवसभरात एकदाच पोटभर जेवण करून घेतात. पण आता लोकांनी समजून घ्यायला हवं की, नाश्ता करण्याची सुद्धा एक योग्य वेळ असते.

breakfast IM

 

टोटल हेल्थ या वेबसाइटच्या माहितीनुसार, रात्रीच्या जेवणानंतर जवळपास ९ ते १० तासांच्या आत नाश्ता करायला पाहिजे. आहार तज्ज्ञांच्या मते, ‘सकाळी उठल्यानंतर अर्धा तासांच्या आत पोटात काहीना काही पौष्टीक पदार्थ गेला पाहिजे. त्यानंतर दोन तासांच्या आतमध्ये पूर्ण नाश्ता करायला पाहिजे.

अमेरिकेतून संपूर्ण जगाला सल्ला देणाऱ्या वेबसाइटच्या संस्थापक किम लार्सन यांच्या म्हणण्याप्रमाणे, ‘सकाळी उठल्यानंतर जितक्या लवकर तुम्ही नाश्ता कराल तितका तुमचा मेटाबोलिझम चांगला होईल. आपण खाल्लेल्या अन्नाचं पचनसुद्धा व्यवस्थित होईल.

● कोणत्या वेळी नाश्ता करू नये?

सकाळी १० वाजल्यानंतर नाश्ता करणं योग्य नाही. हा ब्रंच आहे म्हणजे नाश्ता आणि दुपारच्या जेवणाचा मिश्रित प्रकार. आपल्या नाश्त्यामध्ये प्रथिनं आणि फळांचा समावेश असला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे उशिरा नाश्ता केल्याने दुपारच्या जेवणाची वेळ बदलते किंवा कधी कधी टळते सुद्धा.

सकाळचा नाश्ता न केल्यामुळे आपल्या ‘हंगर हॉर्मोन्स’मध्ये (हंगर हार्मोन्स म्हणजे ज्या हार्मोन्समुळे आपल्याला भूक लागते) (Hunger Hormones) गोंधळ किंवा गडबड होते. त्यामुळे दिवसाच्या सुरुवातीलाच नाश्ता करणं खूप महत्त्वाचे असते.

 

hunger harmone IM

 

नाश्ता न केल्यास आपण एकाच वेळी आवश्यकतेपेक्षा जास्त खातो. सकाळी उठल्यानंतर १ तासाच्या आत नाश्ता केलाच पाहिजे. होय, रात्रभर झोपल्यानंतर आपण लवकरात लवकर काहीतरी खाणे आवश्यक आहे जेणेकरुन शरीराला त्यातून ऊर्जा मिळू शकेल आणि अवयव त्यांचे कार्य योग्यरित्या करू शकतील.

● नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या वेळेचा समतोल

दुपारचे जेवण ११ ते १:३० च्या दरम्यानच करायला हवे. सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणामध्ये चार ते पाच तासांचे अंतर हवे. सूर्यास्तावेळी अन्न खाऊ नये कारण याचा पचन व्यवस्थेवर खूप वाईट परिणाम होतो.

● रात्री ९ नंतर जेवण करू नये

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, आपल्यापैकी बहुतेकांना रात्रीचे जेवण योग्य वेळी करता येत नाही. तथापि, याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रात्रीचे जेवण संध्याकाळी ६ ते ७ च्या दरम्यान करावे.

आयुर्वेदानुसार रात्रीच्या जेवणानंतर तीन तासानंतर झोपायला पाहिजे.

 

aayurved inmarathi

 

जर तुम्ही रात्रीचे जेवण रात्री ८ वाजता किंवा नंतर केले असेल तर तुम्ही हलके अन्न जसे की सूप इत्यादी खावे. जर आपण या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवले तर आपल्याला उत्तम आरोग्या लाभेल.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?