' स्विगी बॉयचा पगार किती? पॅकेज ऐकून तुम्हीही हा करियर ऑप्शन निवडाल

स्विगी बॉयचा पगार किती? पॅकेज ऐकून तुम्हीही हा करियर ऑप्शन निवडाल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

२०२० या वर्षापासून भारतात जीवनावश्यक वस्तू, जेवण ऑनलाईन ऑर्डर करून मागवण्याचं प्रमाण कित्येक पटींनी वाढलं आहे. सध्या उपलब्ध असलेले ऑनलाईन ऍप्लिकेशन्स हे आधी सुद्धा अस्तित्वात होते. पण, ‘लॉकडाऊन’ हा एक ऐतिहासिक काळ आपण जगलो आणि त्यानंतर आपल्या सर्वांचं आयुष्यच बदललं.

आज जर तुम्ही मेट्रो शहरात रहात असाल तर तुम्ही कित्येक दिवस घराबाहेर न पडता सहज राहू शकतात इतके ऑनलाईन ऑर्डर करण्याचे पर्याय दिवसागणिक आपल्यासमोर येत आहेत.

 

 

online shopping inmarathi'

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

‘डिलिव्हरी बॉय’ हा मार्केटचा हिरो ठरण्यात आणि ही एक इंडस्ट्री म्हणून नावारूपास येण्यास कोरोना कारणीभूत ठरला हे सगळेच मान्य करतील.

आज ‘स्विगी’ या जपानी कंपनीचा ‘डिलिव्हरी बॉय’ हा एखाद्या खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचारी इतकी कमाई करतो हे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. नोकरी करतांना मिळणाऱ्या सर्व सुविधा या ‘स्विगी’च्या ‘डिलिव्हरी बॉय’ला सुद्धा उपलब्ध असतात आणि म्हणूनच आज हजारो सुशिक्षित लोक पूर्ण वेळ किंवा ‘पार्ट टाईम’ या ‘स्विगी’ सोबत जोडले जात आहेत.

‘स्विगी’च्या माध्यमातून आपल्या घरी जेवण घेऊन येणाऱ्या व्यक्तीला किती पगार असतो ? इतर ऑनलाईन फूड ऑर्डर ऍप्लिकेशन पेक्षा स्विगी कोणत्या वेगळ्या सुविधा पुरवते? हे कुतूहल म्हणून जाणून घेऊयात. ‘स्विगी’ची जाहिरात करण्याचा यामागे कोणताही उद्देश नाहीये.

 

 

swiggy 1 im

 

डिलिव्हरी बॉय होण्यासाठी आवश्यक पात्रता

‘स्विगी’चा डिलिव्हरी बॉय होण्यासाठी ‘१० वी पास’ ही माफक शिक्षणाची अट ठेवण्यात आली आहे. तुमच्याजवळ अँड्रॉईड असलेला स्मार्टफोन असावा आणि मोबाईलमध्ये आलेला पत्ता, ऑर्डर हे वाचता आले पाहिजे हे अपेक्षित असतं.

 

swiggy 2 im

 

तुमच्याकडे स्वतःची गाडी असावी आणि तुमच्याकडे दुचाकी चालवण्याचा वाहन परवाना असावा या गोष्टी इतर आवश्यक पात्रता कंपनीने ठेवली आहे. स्वतःची गाडी नसेल, पण दुचाकी चालवण्याचा वाहन परवाना असेल तर स्विगी तुमच्यासाठी बाईक खरेदी करते आणि तुम्हाला मासिक हफ्त्याने उपलब्ध करून देते.

स्विगी मध्ये वेगळं काय आहे ?

भारतातील फार कमी कंपन्यांमध्ये होणारा ‘दर सात दिवसांनी पगार’ हे स्विगी मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी प्रमुख आकर्षणाचा मुद्दा आहे. तुम्ही जितक्या ठिकाणी फूड डिलिव्हरी करणार तितके अधिक पैसे तुम्हाला मिळणार असं सोपं गणित स्विगीने ठेवलं आहे.

सर्वसाधारणपणे एक डिलिव्हरी बॉय एका महिन्यात २० हजार रुपये पगार, टीप आणि इन्सेंटिव्हच्या स्वरूपात कमावतात अशी माहिती स्विगी सोबत काम करणाऱ्या व्यक्तींनी सांगितली आहे. ठराविक महिन्यात, सणांच्या दिवशी ‘डिलिव्हरी बॉय’ला जास्त कमाई करण्याची संधी देखील उपलब्ध करून दिली जाते.

‘डिलिव्हरी बॉय’चा पगार कसा मोजला जातो?

‘डिलिव्हरी बॉय’च्या प्रवासाचा खर्च कंपनी दोन भागात विभागत असते. तुमच्या जागेवरून हॉटेलपर्यंत केलेला प्रवास आणि तिथून ऑर्डर दिलेल्या ग्राहकापर्यंत केलेला प्रवास असे हे दोन भाग आहेत.

पहिल्या ४ किलोमीटर प्रवासासाठी ४ रुपये आणि नंतर प्रति किमी ६ रुपये अशी प्रवास खर्च काढण्याची पद्धत आहे. वेळेनुसार ‘डिलिव्हरी बॉय’ला पैसे देण्याचं ठरवलं असेल तर ती रक्कम १ रुपये प्रति मिनिट अशी ठरवली जाते.

 

giving money im

दोन्ही पद्धती वापरल्यास जी रक्कम जास्त आहे ती रक्कम ‘डिलिव्हरी बॉय’ला दिली जाते. इतकंच नाही तर हॉटेलमध्ये जर अन्न तयार नसेल आणि त्यासाठी जरी तुम्हाला थांबावं लागलं तर त्यासाठी सुद्धा स्विगी ‘डिलिव्हरी बॉय’ला १ रुपये प्रति मिनिटं या हिशोबाने पैसे देत असते.

डिलिव्हरी बॉय जेव्हा ग्राहकांना डिलिव्हरी देतो तेव्हा त्यांना स्विगी प्रत्येक डिलिव्हरी मागे ५ रुपये देत असते. त्याशिवाय, पाऊस सुरू असल्यास, एका रस्त्यावरील दोन ग्राहकांना एकाच वेळी डिलिव्हरी देत असतांना, रात्री उशीर झालेला असल्यास ‘डिलिव्हरी बॉय’ला अधिक २० रुपये प्रत्येक डिलिव्हरी मागे मिळत असतात. एक डिलिव्हरी ही साधारणपणे ३० ते १२० रुपये इतकी कमाई होत असते.

तुम्ही जर रोज ऍप्लिकेशन मध्ये ठरलेल्या वेळेवर लॉगिन करत असाल आणि एका आठवड्यात २ पेक्षा अधिक ऑर्डर रद्द करत नसाल तर तुमच्या शहरानुसार तुम्हाला ‘इन्सेंटिव्ह’ सुद्धा दिले जातात.

प्रत्येक दिवशी ८ ते १० डिलिव्हरीची संधी देऊन त्यांचं रोजचं उत्पन्न हे कमीत कमी ८४० रुपये असेल याची स्विगी नेहमी काळजी घेत असते. पार्ट टाईम साठी ही रक्कम प्रति दिवस ४२० रुपये इतकी ठरवलेली आहे.

तुमच्या भागातून ऑर्डर नसतील त्या दिवशी सुद्धा फुल टाईम काम करणाऱ्या व्यक्तीला ४०० रुपये प्रति दिवस आणि पार्ट टाईम व्यक्तीला २०० रुपये प्रति दिवस इतकी रक्कम दिली जाते.

 

swiggy 3 im

 

स्विगी मध्ये भरती कशी होते? कामाचे तास?

स्विगी मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींची संख्या मधल्या काही काळात मोठ्या पटीने वाढण्याचं अजून एक कारण म्हणजे ‘सोपी भरती पद्धत’. स्विगी सोबत काम करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरणे किंवा मुलाखतीला जाणे यापैकी काहीच करावं लागत नाही.

स्विगीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला केवळ तुम्ही कोणत्या शहरात किंवा उपनगरात काम करू इच्छितात तो पर्याय निवडावा लागतो. त्यासोबत तुमचं आधार कार्ड, बॅंक खात्याची माहिती आणि एक फोटो द्यावा लागतो. हे शक्य नसेल तर काही शहरांमध्ये स्विगीने मुलाखत केंद्र सुरू केले आहेत. या केंद्राला भेट देऊन आपले कागदपत्र जमा करून तुम्ही दुसऱ्या दिवशीपासून स्वीगीचे फुल टाईम किंवा पार्ट टाईम डिलिव्हरी बॉय सहजपणे बनू शकतात.

‘डिलिव्हरी बॉय’ला पूर्ण वेळ काम करतांना ९ तास आणि अर्धा वेळ काम करणाऱ्या व्यक्तींना ५ तास काम करणं हे अपेक्षित आहे. केवळ शनिवार आणि रविवारी काम करण्याची सोय सुद्धा स्विगीने दिली आहे.

 

swiggy 5 im

 

पारंपरिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या नोकऱ्यांच्या तुलनेत स्विगीची उजवी गोष्ट ही आहे की, ही नोकरी तुम्ही ठराविक काळापुरती देखील करू शकतात. कोणत्याही ‘नोटीस पिरेड’ शिवाय तुम्ही हे काम करणं थांबवू शकतात. विद्यार्थ्यांसाठी “शिकता शिकता काम करा” हा प्रकल्प सुरु केला आहे. बाहेरगावी शिकायला असलेल्या कित्येक विद्यार्थ्यांना स्विगीमुळे आपला खर्च भागवण्याचा पर्याय स्वीगीच्या माध्यमातून सध्या विद्यार्थ्यांना उपलब्ध झाला आहे.

काम करायला सुरुवात करण्याआधी तुम्हाला फक्त ‘स्विगी’ ऍप्लिकेशन कसं काम करतं? याचं प्रशिक्षण दिलं जातं. तुमच्या कागदपत्रांची सत्यता पडताळली जाते, पगाराची माहिती दिली जाते आणि तुमची इच्छा असेल तर त्वरित जॉईन करण्याची सोय सुद्धा स्वीगीने उपलब्ध करून दिली आहे.

ई-कॉमर्स क्षेत्राचे अभ्यासक असं सांगतात की, इतर उपलब्ध पर्यायांपैकी स्वीगीची ‘भरती पद्धत’ ही सर्वात सोयीस्कर आहे.

स्विगी सोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कंपनी ६ लाख रुपयांचा ‘अपघात विमा’ प्रदान करत असते. तुमची आणि तुमच्या परिवाराची आम्हाला काळजी आहे हे याद्वारे कंपनी आपल्या प्रत्येक डिलिव्हरी बॉयला सांगत असते.

 

swiggy logo inmarathi
eginsight.com

 

स्वीगी सोबत डिलिव्हरी बॉय होण्याचा अजून एक फायदा म्हणजे स्विगी कंपनीची कस्टमर केअर टीम आणि ‘डिलिव्हरी बॉय’ यांच्यात कोणताही बॉस नसतो.

स्विगी ‘डिलिव्हरी बॉय’ला मिळणारे फायदे लक्षात घेऊन कित्येक लोकांना ही नोकरी स्वीकारण्याची इच्छा होणे सहाजिक आहे. आपला निर्णय घेतांना प्रत्येकाने फक्त इतकं लक्षात घ्यावं की, ‘डिलिव्हरी बॉय’ला ऊन, पाऊस, थंडी या सर्व परिस्थितीत कामावर जावंच लागतं.

मेहनत करण्याची तुमची जितकी तयारी तितकी तुमची कमाई अधिक या सोप्या सूत्रावर ही इंडस्ट्री काम करत असते आणि असंख्य गरजू व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देत असते. इतर वेळी डोकेदुखी समजली जाणारी भारताची लोकसंख्या ही डिलिव्हरी बॉय साठी वरदान ठरते हे नक्की.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. कोणाचीही जाहिरात करणे हा त्यामागील उद्देश नाही. वाचकांची कोणताही निर्णय घेण्यापुर्वी अधिकृत संस्थेच्या वेबसाईटवरून माहिती तपासून घ्यावी.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?