' इकडे राणे-पुत्र अटकेत तर तिकडे संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत EDच्या ताब्यात!

इकडे राणे-पुत्र अटकेत तर तिकडे संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत EDच्या ताब्यात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यापासून सरकारच्या कामापेक्षा सरकारमधील मंत्रीच कायमच कुठल्या ना कुठल्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसून येतात. त्यात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरु असतेच, अगदी कोरोना काळातील मदत असो किंवा महाराष्ट्रात आलेल्या वादळातील मदत असो…

 

 

दोन सरकारमधील वाद अधूनमधून होत असतोच, कालच नितेश राणे यांना अटक करण्यात आली, संतोष परब या व्यक्तीवर हल्ला केल्या प्रकरणी त्यांना ४ फेब्रुवारी पर्यंत त्यांना तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. तर इकडे संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणवले जाणारे प्रवीण राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे नेमकं काय आहे प्रकरण जाणून घेऊयात…

 

nitesh rane inmarathi

 

महाविकास आघाडी सरकारच्या मागे ईडीची पीडा काही केल्या कमी होईना, शिवसनेचे आमदार प्रताप नाईक असो किंवा संजय राऊत असो या नेत्यांची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात  ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. आता संजय राऊत यांचे खास असलेले प्रवीण राऊत यांना मनी लौंड्रीन्ग प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

 

pratap sarnaik and uddhav thackarey inmarathi

 

कोण आहेत प्रवीण राऊत?

प्रवीण राऊत हे व्यावसायीक आहेत, प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या पत्नींच्या नावाने भागीदारीत एक कंपनी आहे, जिच्यावर ईडीने कारवाई केली आहे. प्रवीण राऊत यांचा सफाळे येथे रिअल इस्टेटचा व्यवसायाय आहे. गोरेगावमधील भूखंडाच्या एफएसआयमध्ये गैरव्यवहार केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  १ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे.

प्रवीण राऊत यांना मंगळवारी मुंबईमधील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलवले होते, चौकशी दरम्यान त्यांनी सहकार्य न केल्याने ईडीने त्यांना अटक केली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली गेली आहे असे ईडीचे म्हणणे आहे.

 

raut im

 

प्रवीण राऊत यांनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला गोरेगावमधील सिद्धार्थ नगर भागातील पत्राचाळीच्या भूखंडामध्ये म्हाडा अधिकारांच्या वतीने हा घोटाळा केला आहे. गुरुआशिष या कंपनीला काही वर्षांपूर्वी या पत्राचाळीचा पुर्नविकास करायचा होता. मात्र चाळीतील लोकांच्या परवानगीशिवाय हा व्यवहार करण्यात आला.

 

patrachawl im

 

मागच्याच वर्षी संजय राऊत यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. प्रवीण राऊत यांच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नीला ५५ लाखांचे इंटरेस्ट फ्री लोन दिले होते. यावर त्यांच्या पत्नीने असे स्पष्टीकरण दिले होते की दादर परिसरात एक फ्लॅट घेण्यासाठी हे कर्ज घेतले होते, त्यानंतर चौकशी दरम्यान दोघांच्या पत्नींच्या नावे अवनी कन्स्ट्रक्शन ही कंपनी आहे.

ईडीने संजय राऊत यांच्या पत्नीला चौकशी साठी बोलावले म्हणून संजय राऊत चांगलेच खवळले होते. ईडी मुद्दाम महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास देत आहे, तसेच या षडयंत्रामागे भाजपचा हात आहे असा आरोप देखील त्यांनी केला होता.

 

sanjy im

महविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील वाद काही कमी होत नाही असे दिसून येत आहे. एकीकडे किरीट सोमय्या महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या मागे हात धुवून लागले असतात. मात्र महाविकास आघडी सरकारमधील नेते याकडे फारसे लक्ष देत नाहीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?