' गंगुूबाईने दिलेली लोकप्रियता, मग बॉडी शेमिंगचा त्रास; ती सध्या काय करते? – InMarathi

गंगुूबाईने दिलेली लोकप्रियता, मग बॉडी शेमिंगचा त्रास; ती सध्या काय करते?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही महिन्यांपूर्वी, बिग बॉस १३ मधील स्पर्धक शहनाज गीलने कमी केलेले वजन हा विषय खूप चर्चेत होता. या अभिनेत्रीने लॉकडाऊनच्या काळात तिचे वजन कमी करून सर्वांना आश्चर्यचकित केले होते आणि आता पुन्हा एकदा टीव्ही जगतातील अशाच एका लहान कलाकाराचे बॉडी ट्रांसफॉर्मेशन चर्चेचा विषय बनले आहे.

या १९ वर्षीय कलाकाराचे नाव आहे सलोनी डॅनी.

 

saloni im

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

कॉमेडी सर्कस मधील ‘गंगूबाईची’ भूमिका साकारून सलोनीने प्रसिद्धी मिळवलेली होती. सलोनी तिच्या कॉमेडीमधील परफेक्ट टायमिंगसाठी ओळखली जाते. मात्र, सध्या सलोनी तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चर्चेत आहे.

सलोनीच्या बदललेल्या लूकचे फोटो सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती खूपच फिट आणि ग्लैमरस दिसत आहे. सलोनी आता इतकी बदलली आहे की तिला एका दृष्टीक्षेपात ओळखणेही कठीण झाले आहे आणि विशेष म्हणजे ती याआधी एवढी फिट कधीही नव्हती. कित्येक वेळा तर लोकांनी तिला तिच्या वाढलेल्या वजनामुळे ट्रोल देखील केले आहे.

सलोनीने वयाच्या अवघ्या ३ ऱ्या वर्षी टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवले होते. सलोनीच्या म्हणण्यानुसार, लोक तिला तिच्या वाढलेल्या वजनामुळे नेहमीच टोमणे मारायचे किंवा चिडवायचे तसेच अनेकांनी तिची खिल्ली पण उडवली होती.

अर्थात लहानग्या  सलोनीचे कौतुकही झाले होते. गंगुबाई हे पात्र रंगवणारी सलोनी मंचावर आली की भल्याभल्या सेलिब्रिटींनाही ती आवडायची. छोटीशी गंगुबाई खोड्या करून सर्वांनाच हसवायची.

 

gangubai im

 

एका कार्यक्रमातून तिने जरी पदार्पण केले असले तरी तिची वाढती लोकप्रियता लक्षात घेत अनेक रिअॅलिटी शोमध्येही तिला पाहूणी म्हणून बोलवण्यात आले होते. मराठमोळ्या ठसक्यातून जेंव्हा ती करमणूकीची सुरुवात करायची तेव्हा ‘ही मुलगी चित्रपटसृष्टीत नाव कमावणार’ ही प्रतिक्रिया अनेकांकडून ऐकू यायची.

लहानपणी हे गोंडस रुप, खट्याळपणा, उत्तम अभिनय यांचे कौतुक जाले असले तरी जसे वय वाढू लागले तसे तिला तिच्या वाढत्या वजनावरून ट्रोल केले जाऊ लागले.

काही दिवसांनंतर हळूहळू तिला तिला तिच्याच लठ्ठपणाची लाज वाटू लागली आणि मग तिने स्वतःला फिट ठेवण्याचा निर्णय घेतला,

 

saloni 1 im

 

एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, लॉकडाऊनमध्ये सलोनीने तिचे वजन २२ किलोने कमी केले. लठ्ठपणावर विनोद करून कंटाळलेल्या सलोनीने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल बोलताना सलोनी म्हणाली ”जेव्हा लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा मी घरी खूप खायचे, दिवभर मला काही न काही खायला लागायचे. माझी आई मला घरी मोमोज, बटर चिकन, केक आणि याचप्रमाणे इतर अनेक पदार्थ बनवून द्यायची. परंतु एके दिवशी मी माझ्या लॅपटॉपवर शो पाहत होतो. अचानक शो बघता-बघता लॅपटॉपची स्क्रीन लॉक झाल्याने स्क्रीनवर माझा चेहरा दिसत होता आणि मी त्या स्क्रीनमध्ये खुप जाड दिसत होते.

त्यावेळी तिचे वजन ८० किलोपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर तिने ठरवले की आता फिट व्हायचे आणि यासाठी तिने वर्कआउटसह डाएट प्लॅन फॉलो करायला सुरुवात केला.

आता तिचे वजन ५८ किलो असून लॉकडाऊनमध्ये मी तिने तब्बल २२ किलोने कमी केले.

 

saloni 2 im

काही लोकांकरिता लॉकडाऊन कंटाळवाणा असला तरी माझ्यासाठी लॉकडाऊन हे वरदान ठरले आहे, कारण त्यामुळे मी बाहेर जाऊन जंक फूड खाऊ शकले नाही. असे तिने सांगितले.

तिच्या हातावर अजुनही गंगूबाईचा टॅटू आहे. प्रेक्षक तिला आजही गंगूबाई म्हणूनच ओळखतात. भविष्यातही लोकांनी मला गंगूबाई म्हणून ओळखावे अशी तिची इच्छा आहे’

सलोनी डॅनीने केवळ टेलिव्हिजन वरच नाही तर हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. सलोनी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती दररोज तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते आणि हे फोटो पाहून गेल्या काही महिन्यांत तिच्यात झालेले बदल लोकांना दिसत आहे.

सलोनीचा जन्म १९ जून २००१ रोजी सांगली, महाराष्ट्र येथे झाला होता. शाहरुख खानच्या ‘क्या आप पांचवी पास से तेज हैं’ या शोच्या प्रोमोमध्येही सलोनीने काम केले आहे. तसेच सलोनीने २०१५ मध्ये ‘मैं तेरा हूं’ या व्हिडिओ सीरिजमध्येही काम केले आहे.

 

saloni 3 im

 

सलोनीने टेढी-मेढी फैमिली, बड़े भैया की दुल्हनिया, नमूने आणि ये जादू है जिन्न का यांसारख्या मालिकांमध्येही काम केले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?