' ED आणि भाजपचं साटंलोटं आहेच…? ED डायरेक्टर आता निवडणुकीच्या रिंगणात… – InMarathi

ED आणि भाजपचं साटंलोटं आहेच…? ED डायरेक्टर आता निवडणुकीच्या रिंगणात…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘मोदी सरकार’ सत्तेत आल्यापासून काही शक्यता नेहमीच कानावर पडत असतात. पहिली म्हणजे, भाजपने निवडणूक जिंकली तर “ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाला असावा.” दुसरी म्हणजे, सर्वोच्च न्यायालयात जरी एखाद्या महत्वपूर्ण प्रकरणाची सुनावणी सुरू असेल आणि त्याचा निकाल जर सरकारकडून लागला म्हणजे, “भाजप सरकारचा तिकडे सुद्धा हस्तक्षेप असेल.”

कोणत्याच घोटाळ्याची माहिती आजकाल ऐकायला येत नाही याचा अर्थ काही लोक असा काढतात की, “भाजपाने इलेक्ट्रॉनिक मीडियावरसुद्धा आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे.” सध्या नेहमीच कानावर पडणारी अजून एक शक्यता ही आहे की, लोकांची झोप उडवणारी ‘ईडी’ ही एक स्वायत्त संस्था नसून भाजपाच्या इशाऱ्यावर चालणारी ही भाजपाचीच एक संस्था आहे जी की विरोधी पक्षातील लोकांचे अर्थकारण चव्हाट्यावर आणण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

 

ed im

 

प्रत्येक राज्यातील नेमकी विरोधी पक्षातील नेत्यांवर होणारी ईडीची होणारी चौकशी हा संशय प्रत्येकवेळी अधिकच गडद करत गेली. आता तरी अशी एक बातमी समोर आली आहे की ईडीचे ‘राजेश्वर सिंग’ हे एक उच्च अधिकारी ईडीचा राजीनामा राजीनामा देऊन भाजपामध्ये सामील होणार आहेत.

 

 

भाजपा समर्थकांना सुद्धा या बातमीनंतर ईडी आणि भाजपा यांचं काय साटंलोटं आहे ? हा प्रश्न पडला असेल. उत्तरप्रदेश मध्ये १० वर्ष पोलीस आणि नंतर १४ वर्ष ईडीची सेवा केल्यानंतर ‘राजेश्वर सिंग’ यांना भाजपामध्ये प्रवेश करावा असं का वाटलं असेल ? उपलब्ध माहितीतून जाणून घेऊयात.

 

raj im 2

राजेश्वर सिंग यांनी २००७ मध्ये पासून ईडीचा पदभार सांभाळला होता. १४ वर्षांच्या ईडीच्या सेवेनंतर ते सध्या ‘जॉईंट डायरेक्टर ऑफ इन्फोर्समेंट डायरेक्टरेट’ या पदावर कार्यरत होते.

नुकतंच त्यांनी केंद्र सरकारकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि तो त्वरित मंजूर देखील झाला ही आश्चर्याची गोष्ट आहे. ईडी मध्ये कार्यरत असतांना त्यांनी ‘2जी स्कॅम’, ‘ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर डील’, ‘एअरसेल मॅक्सिम’ या बहुचर्चित प्रकरणांची चौकशी केली होती.

उत्तरप्रदेश विभागाचा पदभार संभाळल्यावर त्यांनी तिथल्या खाणीत होणारे आर्थिक घोटाळे, ‘मेमोरियल स्कॅम’, ‘गोमती नदी आर्थिक घोटाळा’ सारख्या प्रकरणांचा निकाल लावला आणि सरकारी तिजोरीत जवळपास चार हजार कोटी रुपये वळते केले होते.

ईडी मध्ये रुजू होण्या आधी राजेश्वर सिंग यांनी १९९७ मध्ये पोलीस खात्यात काम केलं होतं. पोलीसमध्ये काम करतांना त्यांनी आपल्या कामाची छाप सोडली होती. महिला सक्षमीकरण आणि बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी उचललेली पावलं याचं उत्तरप्रदेशच्या जनतेने आणि मीडियाने नेहमीच कौतुक केलं आहे.

 

raj im 1

 

निर्दोष असलेल्या बाल संशयितांना जेलमध्ये ठेवू नये, तरुणांना व्यसनाच्या आहारी जाऊ देऊ नये आणि कुख्यात गुन्हेगारांचा इन्काऊंटर करणे या त्यांच्या काही लोकप्रिय कारवाया होत्या. राजेश्वर सिंग यांची पत्नी लक्ष्मी सिंग या सध्या ‘जनरल ऑफ पोलीस लखनऊ रेंज’ या पदावर कार्यरत आहेत. राजेश्वर सिंग यांच्या परिवारातील कित्येक सदस्य हे उत्तरप्रदेश राजकारण आणि केंद्र सरकारमध्ये सध्या कार्यरत आहेत.

राजकारणात प्रवेश करण्याचं कारण विचारल्यावर राजेश्वर सिंग यांनी ही प्रतिक्रिया दिली की, “जनसेवा करणं ही मला सर्वात जास्त आनंद देणारी गोष्ट आहे. देशसेवा करण्यासाठी सक्रिय राजकारणात येण्याशिवाय पर्याय नाहीये. पोलिस असतांना पण मी हाच प्रयत्न केला की, लोकांचा पोलीस खात्यावरचा विश्वास वाढेल. राजकारणात येऊन सुद्धा माझा हाच प्रयत्न असेल.”

उत्तरप्रदेश मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता सध्या भाजपाने आपला गट मजबूत करण्याचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवलं आहे. राजेश्वर सिंग यांच्या आधी कानपुरचे पोलीस कमिशनर ‘असीम अरुण’ यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी मुदतपूर्व सेवानिवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता. ‘असीम अरुण’ यांचा राजीनामा केंद्र सरकार स्वीकारेल क? असा प्रश्न त्यावेळी खूप चर्चेत होता. पण, त्यांचा राजीनामा सुद्धा मान्य झाला आणि ते सध्या उत्तरप्रदेश मध्ये भाजपाचे ‘प्रचारक’ म्हणून काम बघत आहेत.

 

bjp inmarathi

 

राजेश्वर सिंग यांनी मुदतपूर्व सेवानिवृत्त होऊ देण्यासाठी सोशल मीडियावर एक पत्र लिहून केंद्र सरकारबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली होती. राजेश्वर सिंग यांनी आपल्या पत्रात माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा आणि उत्तरप्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार व्यक्त केले आहेत.

 

narendra modi amit shah inmarathi

 

राजेश्वर सिंग हे लवकरच भाजपा मध्ये सामील होणार आहेत आणि त्यांचं जन्मस्थान असलेल्या ‘सुल्तानपूर’ जिल्ह्यातून निवडणूक लढवणार आहेत असे स्पष्ट संकेत सध्या मिळत आहेत.

राजेश्वर सिंग यांचा जन्म सुल्तानपूर जिल्ह्यातील पखरुली या गावात झाला होता. आपलं शालेय शिक्षण आणि बी.टेक. पदवी आणि पीएचडी चं शिक्षण त्यांनी उत्तरप्रदेश मधून पूर्ण केलं होतं. पीएचडी करतांना पोलीस, मानवाधिकार आणि सामाजिक न्याय हे त्यांचे विषय होते.

 

sultanpur im

 

राजेश्वर सिंग यांच्यावर जेव्हा ईडीच्या लखनऊ क्षेत्राच्या ‘जॉईंट डायरेक्टर’ पदाची जबाबदारी सोपविण्यात आली तेव्हाच त्यांचा संपर्क केंद्र सरकारमधील मोठ्या राजकीय नेत्यांसोबत संपर्क होऊ लागला आणि तिथून त्यांचा राजकारणाचा मार्ग सुकर झाला.

” भारताला विश्वशक्ती बनवण्याची इच्छा असलेल्या भाजपा मध्ये मी जात आहे आणि हा हेतू साध्य करण्यासाठी मला माझं योगदान द्यायचं आहे” असं राजेश्वर सिंग यांनी नुकतंच ट्विट करून सांगितलं आहे.

ईडी आणि भाजपा यांच्यात असलेलं हे अदृश्य नातं आपल्याकडे अजून किती सरकारी अधिकाऱ्यांना आकर्षित करेल हे बघणं येत्या काळात औत्सुक्याचं ठरणार आहे हे नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?