' जगभरातील दिग्गज नेत्यांच्या भाऊगर्दीत YouTube वर सुपरहिट कोण?

जगभरातील दिग्गज नेत्यांच्या भाऊगर्दीत YouTube वर सुपरहिट कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजकाल एक वाक्य हमखास ऐकले जात ते म्हणजे ‘अरे माझं चॅनेल जरा subscribe कर ना’, मित्रमंडळी, नातेवाईक वर्षभरातून एकदाही एकमेकांचे तोंड बघणार नाहीत मात्र चॅनेल subscribe करण्यासाठी आवर्जून फोने मेसेजेस पाठवत असतात. आजच्या स्मार्ट जमान्यात माणसांना एकमेकांशी संवाद साधायला वेळ मिळत नाही मात्र या गोष्टीसाठी आवर्जून बोलणे होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

YouTube चॅनल आजच्या जमान्यात एक लोकांच्या छंदाचं आवडत माध्यम झाले आहे, आपल्या अंगातील पाककौशल्य असो किंवा कलागुण असलेली लोक YouTube च्या माध्यमातून काही दिवसात हिट ठरतात.

आज घरात कोणतेही नवी रेसिपी करायची म्हंटली की घरातील गृहिणी हक्काने मधुरा रेसिपीचे व्हिडिओ बघतात. बॉलीवूडमध्ये नशीब काढण्यासाठी अभिनेते मंडळींना उभं आयुष्य घालवाव लागते तिथे अगदी सामान्य माणूस YouTube वर काही दिवसात फेमस होऊन जातात.

 

youtube inmarathi

 

जिथे सामान्य माणूस हिट होऊन जातो तिथे देशाचे पंतप्रधान कसे मागे पडतील? आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी YouTube वर चॅनेलवर हिट ठरले आहेत. आज त्यांचे तब्बल १ कोटी फॉलोवर्स झाले आहेत, विशेष म्हणजे जगभरातील नेत्यांमध्ये ते पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी १ कोटींचा टप्पा पार केला आहे.

 

 

YouTube चॅनेलची सुरवात :

ज्याकाळात नुकतेच मोबाईल फोन येऊ लागले होते त्याकाळात मोदींनी आपले पहिले YouTube चॅनल सुरु केले. २६ ऑक्टोबर २००७ साली नरेंद्र मोदींनी YouTube चॅनेल सुरु केले. मात्र आपला पहिला व्हिडिओ तब्बल ४ वर्षानंतर म्हणजे २०११ साली आपला पहिला व्हिडिओ अपलोड केला होता जो गुजरातमध्ये सादर केलेल्या बजेटबद्दल होता.

मोदींच्या चॅनेलवर अनेक व्हिडिओ आहेत मात्र सर्वाधिक लोकांची पसंती मिळाली आहे ती दिव्यांग व्यक्तीसोबतच्या भेटीची, या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती मोदींशी संवाद साधते आणि त्यानंतर मोदींचे आशीर्वाद घेते. १९ फेब्रुवारी २०१९ साली हा व्हिडिओ टाकण्यात आला होता ज्याला सर्वाधिक म्हणजे ७ करोड लोकांनी बघितला आणि ११ लाख लोकांनी तो लाईक पण केला.

 

 

जगभरातील नेत्यांना किती पसंती?

आज भारताबद्दलची प्रतिमा इतर देशात उंचावली तर आहेच मात्र इतर देशातील नेते देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर फेमस आहेत. मोदींच्या खालोखाल ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोल्सनरो आहेत त्यांचे ३६ लाख फॉलोवर आहेत. तिसऱ्या नंबरवर आहेत मेक्सिको देशाचे राष्ट्राध्यक्ष एंड्रेज मॅन्युएल लोपेज ओब्रादोर ज्यांचे ३०.७ लाख इतके फॉलोवर आहेत. त्यानंतर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो आणि यानंतर बलाढ्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा नंबर लागतो.

 

brazil im

 

भारतातली इतर नेत्यांना कितपत पसंती

२०२४ च्या निवडणुकणांसाठी मोदींना टक्कर देऊ शकणारा नेता नाही अशी एकूणच चर्चा सुरु आहे मात्र असे असले तरी भारतातील नेते डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये मागे नाहीत. आज काँग्रेसचे राहुल गांधी मोदींनंतर मोठ्या प्रमाणवर लोकप्रिय आहेत त्यांचे ५.२५ लाख फॉलोवर आहेत त्यानंतर शशी थरूर आणि ओवेसींचा नंबर लागतो.

 

rahul inmarathi

आज एकूणच देशात मोदींच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर जनता एकत्र आली आहे. आज कोणत्याही  सोशल मीडियावर आपण गेलो की त्यावर मोदींची थट्टा करणारे मिम्स फिरत असतात. जगभरातील नेत्यांमध्ये मोदींनी जरी नंबर पटकवला असला तरी त्यांना देशात विरोध होतच आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?