' केवळ बॉलिवूडचे नव्हे ‘क्रिप्टो’चे सुद्धा शहेनशहा; कमावतायेत करोडो रुपये… – InMarathi

केवळ बॉलिवूडचे नव्हे ‘क्रिप्टो’चे सुद्धा शहेनशहा; कमावतायेत करोडो रुपये…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकत्याच जाहीर झालेल्या युनियन बजेटमधली सर्वात मोठी घोषणा म्हणजे crypto currency वर लागणारा कर. या बजेटमधल्या तरतुदीनुसार यापुढे भारतात crypto currency transaction वर टॅक्स भरावा लागणार आहे.

एकाअर्थी ही गोष्ट चांगलीसुद्धा आहे आणि वाईटसुद्धा, जे लोकं crypto मध्ये खेळतात त्यांच्यासाठी ही बाब थोडी चिंताजनक असली तरी भारतीय ईकोनॉमीने या चलनाची दखल घेतली आहे ही बाब तशी समाधानकारक आहे.

 

crypto currency IM

 

तुमच्या आमच्यासारखे सामान्य लोकं crypto currency मध्ये ट्रेड करायचं शक्यतो धाडस करत नाहीत, पण तरी ज्यांची नुकसान सहन करायची तयारी असते ते यामध्ये गुंतवणूक करतात, एकंदरच यामध्ये असलेले संभाव्य धोके बघता सहसा कुणी याच्या वाटेला जात नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

तरी आता काही smart investment apps च्या मदतीने यामध्ये गुंतवणूक करणं सोप्पं झालं असलं तरी सर्रास सगळेच लोकं यात गुंतवणूक करत नाही. पण तुम्हाला माहितीये का की अमिताभ बच्चन ज्यांना चित्रपटसृष्टिचा शेहेनशाह म्हंटलं जातं ते या crypto market चेसुद्धा बादशाह आहेत.

आज त्याचविषयी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत, की crypto currency मध्ये बच्चन यांची नेमकी किती गुंतवणूक आहे?

ईकोनॉमिक टाइम्सच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे अमिताभ आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन या दोघांनी मिळून सिंगापूरच्या Meridian Tech Pte या कंपनीत तब्बल १.६ कोटी एवढी गुंतवणूक केली होती, आणि केवळ अडीच वर्षांतच त्यांना यातून ११२ करोड रुपये इतका नफा झाला.

 

amitabh bachchan 2 IM

 

ही एक रिसर्च कंपनी असून ही कंपनी फायनान्स सेक्टरमध्ये काम करते आणि मायक्रो लेंडिंगसारख्या सुविधादेखील पुरवते.

याबरोबरच २०१३ मध्ये अमिताभ यांनी justdial मध्येदेखील गुंतवणूक केली, तेव्हा त्यांनी ६ लाखाच्या आसपास त्यांनी यात गुंतवणूक केली होती आणि अवघ्या ४ महिन्यात त्यांनी यामधून ७ कोटीचा फायदा मिळवला होता.

अमिताभ हे justdial चे brand ambassador सुद्धा आहेत, त्यामुळे त्यांच्या या गुंतवणुकीमुळे त्यांच्या कंपनीला चांगला फायदासुद्धा झाला.

 

amitabh JD IM

खरंतर crypto currency शी ओळख होऊन आता दशकभर उलटून गेलं आहे. ही currency म्हणजे कॉम्प्युटरच्या माध्यमातून निर्माण केलेलं एक आभासी चलन, या चलन नित्यनियमाच्या वापरात नसलं तरी आर्थिक देवणघेणावाणीसाठी याची खूप मदत होते.

२००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या इंजिनियरने सर्वप्रथम बीटकॉईन ही संकल्पना अंमलात आणली होती. आणि यानंतर काही वर्षांतच वेगवेगळ्या crypto currency या कॉम्प्युटर विश्वात निर्माण झाल्या.

crypto currency च्या माध्यमातून केलेले व्यवहार हे गोपनीय असतात आणि बँक अकाऊंटशी याचा काहीच थेट संबंध नसतो. गेली काही वर्षं कोणतंही बंधन किंवा कर या चलनावर लागत नसल्याने या चलनाची उलाढाल अब्जावधी रुपयांत पोचली आहे.

 

crypto currency transaction IM

 

आता नवीन बजेटनुसार या currency मध्ये होणाऱ्या व्यवहारांवर कर लागणार आहे. त्यामुळे यामधून होणारे गैरव्यवहार आणि इतर गुन्हे यावर थोडंफार बंधन येईल अशी आशा आहे!

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?