' रेहमानसोबत तब्बल ८ तास उभं राहून केलं रेकॉर्डिंग आणि अजरामर झालं हे दीदींचं गाणं!

रेहमानसोबत तब्बल ८ तास उभं राहून केलं रेकॉर्डिंग आणि अजरामर झालं हे दीदींचं गाणं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही सिनेमे आपल्या हृदयात घर करतात. त्यापैकीच एक म्हणजे ‘रंग दे बसंती’! या सिनेमाचं नाव ऐकल्यावर ‘मस्ती की पाठशाला’, ‘खलबली’, ‘रंग दे बसंती’ ही गाणी आपण गुणगुणायला लागतो. मात्र या नाचायला भाग पाडणाऱ्या गाण्यांसोबत ‘लुका छुपी बहोत हुई’ हे गाणं आपल्याला रडवतं.

 

rang de basanti im

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

‘रंग दे बसंती’ या सिनेमात आमिर खान, सोहा अली खान, शर्मन जोशी, आर. माधवन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. माधवनच्या भूमिकेचं नाव अजय असतं आणि तो पायलट असतो. एका अपघातात अजय जेव्हा स्वर्गवासी होतो तेव्हा ‘लुका छुपी बहोत हुई’ हे गाणं वाजतं. प्रसून जोशी यांनी लिहिलेल्या या गाण्याला ए. आर. रेहमान यांनी संगीत दिलेलं आहे. त्याचबरोबर लता मंगेशकर आणि ए. आर. रेहमान यांनी हे गाणं गायलेलं आहे.

‘लुका छुपी’ हे गाणं सिनेमा पूर्ण शूट झाल्यावर रेकॉर्ड केलं होतं. त्यामुळे हे गाणं सिनेमात घ्यावं की नाही याबद्दल त्यांना शंका होती. मात्र शेवटी हे गाणं सिनेमात घेतलं आणि गाणं घेतलं हे फार उत्तम झालं असं म्हणायला काही हरकत नाही.

 

luka chupi im

 

या गाण्याच्या बाबतीतला किस्सा राकेश मेहरांनी सांगितला होता. त्यांनी या गाण्यासाठी लतादीदींशी बऱ्याच वेळा चर्चा केली होती. पण काही ठरत नव्हतं. तरीही काही महिन्यांनी पुन्हा एकदा फोन केल्यावर लतादीदी तयार झाल्या आणि म्हणाल्या, “मला गाणं पाठव”. त्यावर मेहरा म्हणाले की, “तुम्हाला तर रेहमान सर माहित आहेत. ते अजूनही रचना तयार करत असून प्रसून जोशी अजूनही लिहित आहेत.” यावर लतादीदी म्हणाल्या, “असंही होतं आजकाल?” मेहरा म्हणाले की, “हो असंही होतं.”

चेन्नईमध्ये १५ नोव्हेंबरला गाणं रेकॉर्ड होणार होतं. ए. आर. रेहमान यांचा स्टुडिओ चेन्नईत असल्यामुळे लतादीदींनी कळवलं की त्या ९-१० तारखेलाच चेन्नईत येतील. मेहरा यांना वाटलं की लतादीदींचं काहीतरी काम असेल म्हणून त्या ४-५ दिवस आधी आल्या. पण त्यांना नंतर समजलं की त्या गाण्याची रिहर्सल करण्यासाठी आल्या होत्या.

 

lata didi singing im

 

त्यानंतर सलग ४-५ दिवस लतादीदी रिहर्सल करण्यासाठी दररोज स्टुडिओमध्ये जात होत्या. तेव्हा त्या ७७ वर्षांच्या होत्या. “इतर गायक येतात आणि काही कळायच्या आत त्यांचं गाणं रेकॉर्ड करून निघूनही जातात. त्यामुळेच रिहर्सलला एवढं महत्त्व देणाऱ्या गायकाबरोबर काम करण्याची सवय नव्हती”, असंही मेहरा यांनी मुलाखती दरम्यान सांगितले.

याच घटनेबाबत सांगताना ते पुढं म्हणाले की, “रेकॉर्डिंगच्या दिवशी तर आम्ही एकाच खोलीत होतो. लतादीदी माईकसमोर उभ्या राहिल्या आणि त्यांनी सलग ८ तास गाणं गायलं.

वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या लतादीदी सलग ८ तास माईकमोर उभ्या होत्या. एवढंच नव्हे तर प्रत्येक ओळ, गाण्यातील प्रत्येक हरकत त्यांनी समजूून घेतली, वेळप्रसंगी ए आर रेहमान यांच्या सुचना ऐकल्या, त्यानुसार बदल केले.

 

lata mangeshkar im

 

सर्वांच्याच एकत्रित प्रयत्नातून ही अजरामर कलाकृती साकारली गेली. आज इतकी वर्ष उलटूनही हे गाणं पुन्हा पुन्हा एकलं जातं. गाण्यातील शब्द, सूर तितकेच जीवंत वाटतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?