'एक असाही मराठी माणूस जो भारतातील सर्वात जास्त शिकलेला व्यक्ती म्हणून ओळखला जातो!

एक असाही मराठी माणूस जो भारतातील सर्वात जास्त शिकलेला व्यक्ती म्हणून ओळखला जातो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ही गोष्ट खरी आहे आणि फारच कमी जणांना ठावूक आहे की भारतामध्ये एक असा महाराष्ट्राचा सुपुत्र होऊन गेला ज्याच्या नावावर भारतातील सर्वात जास्त शिकलेली व्यक्ती म्हणून Limca Book of Records मध्ये नोंद झाली होती.

तो मराठी माणूस म्हणजे – डॉ श्रीकांत जिचकर होय!

आज त्यांचा वाढदिवस…

 

shrikant-jichkar-marathipizza01
folomojo.com

 

अश्या या प्रतिभावंत व्यक्तीचे वयाच्या अवघ्या ४९ वर्षीच २००४ मध्ये नागपूरला एका कार अपघातात निधन झाले. आज डॉ. श्रीकांत जिचकर आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांच्या कर्तुत्वाच्या रूपाने आजही ते हयात आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.

डॉ श्रीकांत जिचकर यांनी ४० पेक्षा जास्त विद्यापीठांमधून २० पदव्या घेतल्या आहेत. श्रीकांत जिचकर यांनी जवळजवळ सर्वच परीक्षांमध्ये प्रथम श्रेणी मिळवली आहे आणि २८ सोन्याची पदके जिंकली आहेत.

सन १९७२ पासून १९९० पर्यंत त्यांनी प्रत्येक वर्षी दोनदा, असे मिळून एकूण ४२ विद्यापीठांच्या परीक्षा दिल्या.

 

shrikant-jichkar-marathipizza02
indiatimes.com

 

 • श्रीकांत जिचकार यांनी आपल्या करीयरची सुरुवात एका डॉक्टरच्या रुपात केली. त्यासाठी त्यांनी MBBS, MD ची पदवी घेतली.
 • त्याच्या नंतर त्यांनी कायद्याच्या शिक्षणासाठी LL.B., उच्च पोस्ट ग्रॅज्युएशन इन इंटरनॅशनल लॉ LL.M.ची पदवी घेतली.
 • मास्टर्स इन बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशन (प्रशासन) DBM,MBA ची पदवी घेतली.
 • पत्रकारीता क्षेत्रात B.Journ ची पदवी घेतली.

 

 • श्रीकांत जिचकर यांनी १० विषयांमध्ये मास्टर्सची पदवी मिळवली आहे-
 • M.A. (लोक प्रशासन);
 • M.A. (अर्थ शास्त्र);
 • M.A. (समाजशास्त्र);
 • M.A. (संस्कृत);
 • M.A. (इतिहास);
 • M.A. (इंग्लिश साहित्य);
 • M.A. (दर्शन साहित्य);
 • M.A. (राजनीती शास्त्र);
 • M.A. (प्राचीन भारतीय इतिहास,संस्कृती आणि पुरातत्व);
 • M.A. (मनोविज्ञान).

 

shrikant-jichkar-marathipizza03

 

 •  संस्कृत मध्ये D.Litt (डॉक्टर ऑफ लेटर्स) ची पदवी घेतली.
 • डॉ श्रीकांत जिचकर यांनी १९७८ मध्ये सिविल सर्विसेस परीक्षा दिली. ज्यामध्ये त्यांना IPS (इंडिअन पोलीस सेवा) विभाग मिळाले.

परंतु ते IPS मध्ये रुजू झाले नाहीत आणि पुन्हा त्यांनी १९८० मध्ये सिविल सर्विसेसची परीक्षा दिली. यावेळी त्यांना IAS (इंडिअन अॅडमिनीस्ट्रेटीव सर्विसेस) मिळाले.

डॉ जिचकर यांचे या नोकरी मध्येही जास्त काळ मन रमले नाही आणि ४ महिन्यानंतर त्यांनी या पदावरून राजीनामा देऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

 • सन १९८० मध्ये डॉ श्रीकांत जिचकर यांनी वयाच्या केवळ २५ व्या वर्षी MLA (आमदार) बनून सर्वात कमी वयाचा MLA बनण्याचा रेकॉर्ड बनवला. पुढे जाऊन डॉ जिचकर सरकारी मंत्री सुद्धा बनले. मंत्री असताना डॉ जिचकर १४ पेक्षा जास्त विभागांचे काम पाहत असत.

डॉ श्रीकांत यांना शिकण्याचा खूप छंद होता. त्यांच्याकडे जवळ ५२००० पेक्षा जास्त पुस्तकांची लायब्ररी होती. डॉ.श्रीकांत यांना गीता, उपनिषद, वेद-पुराण इत्यादी ग्रंथांचे खूप खोल ज्ञान होते.

श्रीकांत जिचकर केवळ एक पुस्तकी किडा होते असे नाही. अष्टपैलू प्रतिभेचे धनी असलेले डॉ.जिचकर एक पेंटर, प्रोफेशनल फोटोग्राफर, स्टेज एक्टर आणि शिक्षणतज्ज्ञ पण होते.

 

shrikant-jichkar-marathipizza04

 

आज संपूर्ण भारताला त्यांचा गर्व आहे की इतका ज्ञानी आणि प्रतिभावान व्यक्ती असून सुद्धा डॉ श्रीकांत जिचकर यांनी भारतालाच आपली कर्मभूमी बनवली आणि देशवासीयांची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता.

अश्या या महान व्यक्तिमत्वास भावपूर्ण नमन!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?