' सासू-सासरे काँग्रेसचे, सुनबाई भाजपच्या, भारताच्या पहिल्या महिला वित्तमंत्र्यांबद्दल...

सासू-सासरे काँग्रेसचे, सुनबाई भाजपच्या, भारताच्या पहिल्या महिला वित्तमंत्र्यांबद्दल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

माणसाने घेतलेल्या शिक्षणाचं खऱ्या अर्थाने चीज होतं जेव्हा कुणाच्याही प्रभावाखाली न येता त्याची स्वतःची काही स्वतंत्र मतं तयार होतात आणि शेवटपर्यंत आपल्या मतांना बौद्धिक फुटपट्टीवर तासून तो ती समोरच्याला पटवून देऊ शकतो. अशी माणसं विरळा असतात आणि म्हणूनच मोठी! फार समर्थपणे मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या अशा व्यक्तींच्या मोठेपणाची मूळं बऱ्याचदा त्यांच्या जडणघडणीत दडलेली असल्याचं पाहायला मिळतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आपल्या ध्येय्यावर पूर्णतः लक्ष केंद्रित केलेली ही माणसं अनेक आव्हानांना सामोरी जाणून त्यांच्या ध्येय्यापर्यंत पोहोचलेली असतात. आपल्या देशाच्या पहिल्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या बाबतीतही असंच म्हणावं लागेल. निर्मला सीतारामन नेहमीच एक कणखर व्यक्तिमत्त्व म्हणून समोर येतात. मग ते संसदेत त्यांनी रोखठोकपणे वेळोवेळी केलेले युक्तिवाद असोत की त्यांचं मुलाखतींमधलं स्पष्ट बोलणं.

 

Nirmala-Sitharaman-InMarathi

 

१९७०-७१ मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी अर्थ खातं त्यांच्याकडे ठेवलं होतं. मात्र निर्मला सीतारामन या खऱ्या अर्थाने पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. राजकारणात येण्याची मनापासून इच्छा असणाऱ्या अनेक महिलांना त्या निश्चितच प्रभावित करत असतील. केवळ भारतातच नाही तर आता देशविदेशातही त्यांचा नावलौकीत होत आहे.

भारतीयांना निर्मलाजींविषयी वाटणारा अभिमान त्यामुळे अधिकच दुणावत आहे. आज १ तारखेला आपलं बजेट पास होतंय. त्यानिमित्ताने जाणून घेऊया निर्मला सीतारामन यांच्याविषयी.

मदुराईतल्या एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या निर्मला सीतारामन यांचे वडील नारायण सीतारामन हे रेल्वेत कर्मचारी होते तर त्यांची आई सावित्री सीतारामन या गृहिणी होत्या. निर्मला सीतारामन यांनी आपले शालेय शिक्षण मद्रास आणि तिरुचिरापल्ली इथून पूर्ण केले.

तिरुचिरापल्लीच्या ‘सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालया’तून त्यांनी अर्थशास्त्र या विषयात बी. ए.ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थात जेएनयूमधून १९८४ साली आपलं पद्व्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर एम. फील. पूर्ण केलं.

 

jnu inmarathi 7

 

‘इंडो-युरोपियन टेक्सटाईल ट्रेड’ या विषयात त्यांनी पीएचडी केली. त्या ‘लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स’च्या माजी विद्यार्थीनीदेखील आहेत. जेएनयूमध्ये शिकत असताना पती परकाला प्रभाकर यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि ओळखीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं. १९८६ साली लग्न झाल्यानंतर त्या आपल्या नवऱ्यासोबत लंडनमध्ये राहायला गेल्या.

आपल्याला आश्चर्य वाटेल पण आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अत्यंत विश्वासू माणसांपैकी एक म्हणवल्या जाणाऱ्या निर्मलाजींनी कधीकाळी लंडनमध्ये असताना रिजेंट स्ट्रीटवरच्या एका होम डेकॉरच्या दुकानात अगदी सेल्स पर्सनचं कामसुद्धा केलं होतं. त्यानंतर काही काळ त्या बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसशी कामानिमित्त संलग्न राहिल्या.

 

bbc inmarathi

 

१९९० च्या दशकाच्या सुरुवातीला त्या भारतात परतल्या आणि शिक्षणतज्ञ झाल्या. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी हैद्राबादच्या ‘सेंटर फॉर पब्लिक पॉलिसी स्टडीज’च्या उपसंचालिका म्हणून काम केले. हैद्राबादमध्ये एक शाळा सुरू करूनही त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचं कार्य केलं.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत ‘एनडीए’ म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वेळी त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य झाल्या. निर्मलाजींचे सासू सासरे काँग्रेस पक्षात होते. निर्मलाजींच्या सासूबाई काँग्रेस आमदार होत्या तर सासरे काँग्रेसचे माजी मंत्री होते. असं असूनही २००८ साली ‘भारतीय जनता पक्षा’तून निर्मला सीतारामन यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला हे विशेष.

 

bjp inmarathi

 

अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीतच त्या सुषमा स्वराज यांच्यानंतर पार्टीच्या दुसऱ्या महिला प्रवक्त्या झाल्या. २०१४ साली भारतीय जनता पक्षात त्या राज्य वित्त मंत्री झाल्या. २०१७ साली त्या देशाच्या सुरक्षा मंत्री झाल्या तर २०१९ मध्ये त्या केंद्रीय वित्त मंत्री झाल्या. भारत-फ्रान्स दरम्यान जे ‘राफेल एअरक्राफ्ट डील’ झालं होतं त्यावेळी विरोधी पक्षाकडून मोदी सरकारवर भ्रष्टाचार केल्याचे आरोप केले गेले होते.

एक सुरक्षा मंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी तेव्हा मोदी सरकारची बाजू फार हिरीरीने मांडली. राफेल डीलसंदर्भात संसदेत जो वाद झाला होता त्यासंदर्भात जानेवारी २०१९ मध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी “पंतप्रधान मोदींनी आपलं समर्थन करायला एका महिलेची नेमणूक केली आहे”, असं विधान निर्मला सीतारामन यांच्याबद्दल केलं होतं. आपल्यावर अशा टीकेचा काहीही परिणाम होऊ न देता आपल्या पार्टीची बाजू लढवत निर्मलाजी घट्ट पाय रोवून उभ्या आहेत.

 

nirmala sitaraman inmarathi

निर्मला सीतारामन यांचे पती परकाला सीतारामन हे फार मोठे अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांची मुलगी वांगमयी परकला हिला वाचन-लेखनात रुची आहे. एका वृत्तपत्रासाठी ती ‘फीचर रायटर’ म्हणून काम करते. इतक्या मोठ्या पदावर असलेल्या निर्मला सीतारामन यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने काम करणं कुणीही शिकण्यासारखं आहे. पण त्याबरोबरीनेच त्यांच्या कार्यातून झळकणारा देशाभिमानही आपणही आपल्यात खोलवर रुजवला पाहिजे.

मागच्या वर्षीपासून देशाच्या बजेटमध्ये एक नवा प्रयोग झाला आहे तो प्रयोग म्हणजे बजेटचे सादरीकरण डिजिटल रूपात, यावर्षीच्या बजेटला आज सकाळीच सुरवात झाली आहे. आता पर्यंत बजेट कायम कागदोपत्री असल्याचे मात्र गेल्या वर्षीपासून टॅबलेट द्वारे याचे सादरीकरण होते. विशेष म्हणजे हा टॅबलेट देखील संपूर्ण स्वदेशी आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?