' “…तर ११ फेब्रुवारीला पृथ्वीचा विनाश होईल” काय आहे नासाची भविष्यवाणी? – InMarathi

“…तर ११ फेब्रुवारीला पृथ्वीचा विनाश होईल” काय आहे नासाची भविष्यवाणी?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पृथ्वीच्या अंत जवळ येत चाललाय असं आपण आजवर अनेक वेळा ऐकलंय. असं म्हटलं जातं की फार फार वर्षांपूर्वी नॉस्ट्राडॅमस या भविष्यवेत्याने काही अजब भाकितं वर्तवली होती. आश्चर्य म्हणजे त्यातली काही खरीदेखील झाली होती.

पृथ्वीचा विनाश होणार आहे असंही या नॉस्ट्राडॅमसने म्हटलं होतं. अनिश्चितता म्हणजे काय हे गेली दोन वर्षे आपण पुरेपूर अनुभवलंय.

 

nostradamus IM

 

सबंध मानवजात एका महाभयंकर आजाराच्या विळख्यात अडकणार आहे याचे पूर्वसंकेत कुणालाही अजिबातच नव्हते. पण एखादी आपत्ती यायची असते तेव्हा ती येतेच. सर्वार्थाने अपरिमित नुकसान करते. त्यामुळे कधीतरी पृथ्वीचाही अंत होईल हे नक्की.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

उत्पत्ती, स्थिती, लय या निसर्गाच्या तीन अवस्था आहेत आणि अनंत काळ त्या तशाच राहणार आहेत. भाकितांवर विश्वास ठेवायला अर्थातच आपल्याकडे काही पुरावा नसतो.

त्यामुळे अशी भाकीत आपल्यातले अनेकजण हसण्यावारीही नेतात. “अमक्या अमक्या वर्षी होणार होता पृथ्वीचा अंत, कुठे काय झालं!”, अशी विधानं आपण अनेकांकडून आजवर ऐकली असतील. पण जर ‘नासा’ सारख्या एका मोठ्या, जगभर नावाजलेल्या संस्थेनेच पृथ्वीच्या विनाशाची शक्यता वर्तवली असेल तर?

११ फेब्रुवारीला एक लघुग्रह पृथ्वीवर पडला तर कदाचित त्यामुळे पृथ्वीचा विनाश होऊ शकतो. जाणून घेऊ नासाच्या शास्त्रज्ञांचं नेमकं म्हणणं. ११ फेब्रुवारीला एक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे.

 

asteroids IM

 

अवकाशातील अनेक लघुग्रह दररोज पृथ्वीच्या जवळून जात असतात. त्यातले अनेक लघुग्रह समुद्रात पडतात. पण समुद्राऐवजी जर जमिनीवर एखादा महाकाय लघुग्रह पडला तर मोठा विध्वंस होऊ शकतो. असाच काहीसा संकेत नासाच्या शास्त्रज्ञांनी जगाला दिला आहे.

१३८९७१ (2001 CB21) असं नाव देण्यात आलेला एक प्रचंड विशाल लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल आणि दुर्दैवाने जर त्याची पृथ्वीशी टक्कर झाली तर पृथ्वीचा विनाश होऊ शकतो.

पृथ्वीच्या दिशेने वेगाने सरकणारा हा संभाव्य धोकादायक लघुग्रह एम्पायर स्टेट बिल्डींगपेक्षाही मोठा असल्याचं नासाने म्हटलंय. या लघुग्रहाची रुंदी ४२६५ फूट आहे.

नासाचं असं म्हणणं आहे की, “पृथ्वी सूर्याभोवती ज्या प्रदक्षिणा घालते त्याच्या ४.६ मिलियन मैलांच्या भ्रमण कक्षेत ४६० फुटांपेक्षा जास्त आकाराचे जे जे लघुग्रह आहेत त्यांची गणना संभाव्य धोकादायक लघुग्रहांच्या यादीत केली गेली आहे.

asteroids 2 IM

 

अश्या लघुग्रहांच्या मार्गक्रमणात अगदी एका मिनिटाचा जरी बदल झाला तरी त्यांच्यामुळे पृथ्वीवर आपत्ती कोसळू शकते.” १३८९७१ (2001 CB21) हा लघुग्रह ११ फेब्रुवारीला पृथ्वीपासून ३ मिलियन मैलांवरून जाईल. नासाने या लघुग्रहाला पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणाऱ्या लघुग्रहांच्या यादीत नाव स्थान दिलंय.

हा लघुग्रह २१ फेब्रुवारी १९००ला सगळ्यात पहिल्यांदा दिसला होता. तेव्हापासून दरवर्षी तो सूर्यमालेच्या जवळून जातो. १८ फेब्रुवारी २०२१ ला हा लघुग्रह शेवटचा दिसला होता. त्यापूर्वी २०११ आणि २०१९ सालीसुद्धा हा लघुग्रह दिसला होता.

असं सांगण्यात आलंय की, ११ फेब्रुवारी नंतर २४ एप्रिलला हा लघुग्रह पुन्हा पृथ्वीच्या जवळून जाईल. नासाने दिलेल्या माहितीनुसार त्यानंतर २०२४ च्या जानेवारी, जून आणि डिसेंबरमध्ये हा लघुग्रह दिसेल.

 

asteroids IM 2

 

११ ऑक्टोबर २१९४ पर्यंत हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाईल असं नासाच्या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या लघुग्रहांच्या मार्गक्रमणात थोडा जरी बदल झाला तरी पृथ्वीचा विनाश अटळ आहे. काही दिवसांपूर्वीच २४ जानेवारीला सुमारे ६२३ फूट रुंदीचा असाच एक भलामोठा लघुग्रह पृथ्वीपासून ४.४ मिलियन मैलांच्या अंतरावरून गेला होता.

‘Asteroid 2017 XC62’ हे या लघुग्रहाचं नाव होतं. ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’च्या दुप्पटीपेक्षाही जास्त आकाराचा हा लघुग्रह होता. पृथ्वीच्या कक्षेजवळून जे काही जातं त्याला नासाने ‘नियर अर्थ ऑब्जेक्ट’ (एनइओ) असं नाव दिलं आहे.

 

statue of liberty inmarathi
Reader’s Digest

 

अश्या हजारो एनइओज् पैकी कुठले एनइओज् पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकतात आणि कुठले नाही यावर ते देखरेख ठेवत आहेत. दरम्यान, नासाने इतक्यातच त्यांचं पहिलंवहिलं ‘डबल ऍस्ट्रेरॉईड रिडायरेक्शन टेस्ट’ (डीएआरटी) मिशन लाँच केलंय.

भविष्यवेत्यांनी भाकितं वर्तवणं आणि शास्त्रज्ञांनी संभाव्य धोक्यांची पूर्वसूचना देणं यात नक्कीच कमालीचा फरक आहे.

ते धोके सांगण्यामागे शास्त्रज्ञांकडे सबळ पुरावे असतात आणि धोका टाळता यावा म्हणून ते प्रयत्नशीलही असतात. नासाच्या शास्त्रज्ञांच्या बाबतीत हे नि:संशय खरं असणार. ११ फेब्रुवारीला असं काही विपरीत घडू नये इतकीच आशा आपण ठेवू शकतो.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?