' वेळ झाली मुहूर्ताची, बॉसला विनवण्या करूनही कटकट टळेना ‘वर्क फ्रॉम होम’ची – InMarathi

वेळ झाली मुहूर्ताची, बॉसला विनवण्या करूनही कटकट टळेना ‘वर्क फ्रॉम होम’ची

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

“मला सांगा. सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घरबसल्या मिळतं?” हे गाणं आठवतंय? पण आज प्रत्यक्षात ‘घरबसल्या’ काम करणाऱ्या आपल्याला नेमकं कसं वाटतंय? काही वर्षांपूर्वी म्हणजेच कोरोनापूर्व काळात जर कुणी आपल्याला घरून काम करायची कल्पना सांगितली असती तर “वाह! काय मजा!” अशी अननुभवी आणि उत्साही  प्रतिक्रिया आपण त्यावर दिली असती, पण आपल्याला कल्पनेत छान वाटणारे सगळेच अनुभव प्रत्यक्षात तितके भारी असतात का?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आजच्या घडीला खरोखरच वर्क फ्रॉम होम करणं आपल्या सगळ्यांनाच अंगवळणी पाडून घ्यावं लागलंय. “बरंय बाई, तुझं वर्क फ्रॉम होम आहे. आम्हाला आपलं जावं लागतंय रोज” इथपासून ते “काय कटकट आहे हे घरून काम करणं! किती तास काम करायचं? काही पर्सनल लाईफ म्हणून राहिलेलं नाही” अश्या दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया आपण देतोय आणि ऐकतोय.

अर्थात, वर्क फ्रॉम होमचे फायदे आहेतच. खात खात, हवं तसं बसून, नेहमीपेक्षा जरा उशीरा उठून पटकन आवरून लॅपटॉप उघडून बसलं की झालं. मध्ये मध्ये मिळणाऱ्या ब्रेक्समध्ये दुसरं काहीतरी करता येतं किंवा घरात लक्ष देता येतं. अगदी हवं तसं काम करता येतं, पण याच वर्क फ्रॉम होममुळे अनेकांच्या बाबतीत एरव्हीपेक्षा कामाचा ताण, कामाचे तास फार वाढलेत.

आपण सुट्टीला म्हणून जरी कुठे गेलो तरी काम काही आपला पिच्छा सोडत नाहीये. एका नवरीच्या बाबतीत तर या वर्क फ्रॉम होम पद्धतीने कहरच केला. लग्नाच्या दिवशी मुहूर्त जवळ आलेला असतानादेखील या नव्या नवरीचं वर्क फ्रॉम होम काही संपायचं नाव घेत नाहीये असा एक मजेशीर व्हिडियो सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

 

bride im 1

 

एकीकडे ही नवरी आपल्या आयुष्यातल्या या अतिशय आनंददायी सोहळ्याची तयारी करत होती, तर दुसरीकडे तिला सतत ऑफिसमधून कामाच्या संदर्भात फोन येत होते. ही दुहेरी कसरत करताना तिची भयंकर तारंबळ उडत होती.

डोक्यावर अक्षता पडायला अवघी काही मिनिटं बाकी असताना ही नवरी साजशृंगार करत होती, तेव्हाही तिचं ऑफिसमधलं काम काही संपत नव्हतं.

या व्हिडियोत ही नवरी मेकअप करताना दिसतेय आणि त्याचवेळी आपला लॅपटॉप घेऊन फोनवर तिच्या ऑफिसमधल्या सिनियरशी कामाच्या संदर्भात बोलतानाही दिसतेय.

 

bride im

 

“अरे कुणीतरी सांगा यांना माझं लग्न आहे” असं ती वैतागून म्हणतेय. केवळ कामासंदर्भात बोलण्यावरच हे थांबलेलं नाही तर लग्नासारख्या इतक्या महत्त्वाच्या प्रसंगीसुद्धा तिला तिच्या सिनियरकडून काहीतरी काम सांगण्यात येतं.

मुहूर्ताला अवघी काही मिनिटं आहेत आणि आपल्याला ऑफिसमधून काम सांगितलं गेलंय अशी स्वतःच्या बाबतीत कल्पना करा. किती राग येईल! माझ्या आयुष्यातली ही किती महत्त्वाची घटना आहे हे बॉसला कसं कळत नाहीये असा प्रश्न सहाजिकच पडेल. या व्हिडियोत ही नवरी त्यामुळे अर्थातच थोडी वैतागून सांगून टाकते, “सर आज माझं लग्न आहे आणि हे काम मी नाही करू शकत.”

या नवरीची मेकअप आर्टिस्ट सोना कौर हिने आपल्या ऑफिशियल इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडियो पोस्ट केला आहे. अवघ्या १२-१३ दिवसांत हा व्हिडियो ५० लाखांहून अधिक लोकांनी पाहिलाय आणि त्याला ६ लाखांहून अधिक लाईक्स मिळालेत.

हा व्हिडियो पाहून अगदी लग्नाच्या दिवशीही नवरी काम करतेय म्हणून अनेकांनी तिचं कौतुक केलंय. तर या वर्क फ्रॉम होमचा आपल्यालाही कसा त्रास होतोय हे अनेकांनी कमेंट्समध्ये लिहिलंय. तिने लग्नाच्या दिवशीही ऑफिसला रजा टाकली नव्हती की काय असंही काही लोकांना वाटतंय तर अनेकांनी कमेंट्समधून ‘तिला सुट्टी द्या’ अशी तिच्या बॉसला विनंती केलीये.

सोशल मीडियाने जग किती जवळ आणलंय याचा पुन्हा पुन्हा प्रत्यय आपल्याला येतो तो आपल्यापासून इतक्या दूर असलेल्या अनोळखी माणसांशीही आपण भावनिकदृष्ट्या किती पटकन जोडले जातो जातोय यातून. हा व्हिडियो तसा मजेशीर असला तरी या नवरीसाठी खरंच वाईट वाटतंय.

हा कोरोना माणसांना अजून काय काय बघायला लावणारे देव जाणे! आता आपल्याच स्वतःच्या लग्नात, हनिमूनला आपल्यावर अशी वेळ येऊ नये एवढंच म्हणायचं बाकी राहिलंय. बरेच फायदे देऊ केलेल्या या वर्क फ्रॉम होमने आणि वरिष्ठांनी थोडं प्रसंगावधान राखावं म्हणजे झालं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?