' छोटी पान टपरी ते आज ३०० कोटींचं साम्राज्य, चार भावांचा अद्भुत प्रवास – InMarathi

छोटी पान टपरी ते आज ३०० कोटींचं साम्राज्य, चार भावांचा अद्भुत प्रवास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गुजरातमधील अमरेली शहरामध्ये १९८९ साली रस्त्याचे सुशोभीकरण करायचे काम सुरू होते. त्यावेळी महापालिकेने रस्त्याच्या कडेला असलेली अनेक छोटी-मोठी दुकाने आणि स्टॉल तोडून टाकली. यामुळे अनेक कुटुंबांचे स्वप्ने आणि त्यांचे उदरनिर्वाहाचे असलेले साधन उध्वस्त झाले.

या सुशोभीकरणामुळे अनेक दुकान तुटली होती, गरीब आणि सर्वसामान्य लोकांच सगळं काही हिरावून गेलं होतं तरीही एक आशा शिल्लक होती, थोडं धाडस आणि काहीतरी मोठं करण्याची तहान अजूनही काही लोकांच्या मनात होती. या सुशोभीकरणामुळे अनेक लोकांचे नुकसान झाले होते, त्यामुळे आता पश्चाताप करत बसणे या लोकांसाठी काहीही फायद्याचे नव्हते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

अतिक्रमण झालेल्या दुकानांमध्ये भूपत यांचं देखील दुकान होतं. हे कुटुंब गावात शेती करून आपला उदरनिर्वाह करत असे, मात्र गावात शिक्षणाची चांगली सोय नसल्याने घरातील मोठ्या भावाने आपल्या गावाच्या शेजारच्या अमरेली शहरात जाण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून त्यांची चार मुले दिनेश, जगदीश, भूपत आणि संजीव चांगले अभ्यास करू शकतील आणि त्यांना नोकरी मिळेल आणि कुटुंबाला चांगले जीवन जगता येईल.

चांगल्या आयुष्याच्या शोधात भुपत कुटुंब १९८७ साली अमरेली येथे आले होते. इथे आल्यानंतर सगळ्यात मोठी अडचण होती ती कामाची. अशा परिस्थितीत मोठा भाऊ दिनेश याने शहरातील बसस्थानकाजवळ पानाचे दुकान उघडण्याची युक्ती सुचवली.

 

sheetal icecream im2

 

ही अशी जागा होती, जिथे खरेदीदारांची कमतरता नव्हती, त्यामुळे चांगले पैसे मिळण्याची शक्यता होती. सर्वांच्या सल्ल्याने त्यांनी एक छोटेसे पान आणि कोल्ड्रिंकचे दुकान उघडले. दिनेश अर्धा दिवस दुकान सांभाळत आणि उर्वरित दिवस इतर भाऊ दुकान सांभाळत असत.

हळूहळू दुकानातून चांगले उत्पन्न येऊ लागले आणि सर्व भावांचे शिक्षणही व्यवस्थित चालू लागले. सर्व काही सुरळीत चालले होते, पण नंतर महापालिकेने अतिक्रमणाच्या कामात त्यांचे दुकान फोडले.

हार न मानता चार भावांनी नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बसस्थानकाजवळ ५×५ फुटचे छोटेसे दुकान घेतले. आधीच्या दुकानातील माल तसाच होता, फक्त दुकान नवीन होते.

 

sheetal icecream im

 

साल १९९३ मध्ये, जन्माष्टमीच्या उत्सवात आपल्या दुकानावर आईसक्रीम विकण्याची नामी युक्ती या चार भावंडाना सुचली. हे आईस्क्रीमच्या व्यवसायाकडे त्यांचे पहिले पाऊल होते. आपण गुजरातमध्ये असल्याने जन्माष्टमीचा उत्सव जोरात चालणार याची त्यांना कल्पना होती.

पहिल्या वर्षी त्यांच्या दुकानातील सगळ्या गोष्टी विकल्या गेल्या. त्यानंतर काही दिवस त्यांनी छोट्या कंपनीकडून आईस्क्रीम घेऊन विकायला सुरुवात केली. आईस्क्रीम विकता विकता चारही भाऊ आईस्क्रीम बनवायला देखील शिकले होते.

याच क्षेत्रात हळूहळू छोटे छोटे पाऊल टाकत त्यांनी १९९६ पर्यंत स्वतः आईस्क्रीम बनवून विकायला सुरुवात केली आणि ‘शीतल आईस्क्रीम कंपनी’ उभी राहिली.

त्यांची उत्पादने हळूहळू लोकप्रिय होऊ लागली आणि ग्राहक वाढत जाऊ लागले. १९९८ मध्ये त्यांनी श्री शीतल इंडस्ट्रीजसोबत भागीदारीत काम करण्यास सुरुवात केली.

 

sheetal icecream im1

 

एका मुलाखतीत भूपत सांगतात की, “वाढता व्यवसाय (शीतल आईस्क्रीम) पाहता, कंपनी स्थापन करण्याची गरज वाटू लागली आणि मग आम्ही ‘गुजरात औद्योगिक विकास महामंडळ (GIDC)’ मध्ये एक युनिट स्थापन केले. आम्ही येथे १५० लिटरचा दूध प्रक्रिया प्रकल्प उभारला.”

कंपनीने नवीन डेअरी उत्पादने लाँच केली आणि २०१२ मध्ये कंपनीचे नाव बदलून ‘शीतल कूल प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ असे करण्यात आले.

भूपत सांगतात, की तोपर्यंत त्याच्या कंपनीने दूध आणि दुधापासून बनवलेले इतर पदार्थ जसे, की दही, ताक, लस्सी विकायला सुरुवात केली होती.

२०१५ मध्ये फ्रोझन फूड, पिझ्झा, पराठा, स्नॅक्स इत्यादींमध्येही त्याने हात आजमावला. सन २०१६ पर्यंत, कंपनीने नमकीन (स्वादिष्ट स्नॅक्स) च्या नवीन प्रकारासह बाजारात प्रवेश केला आणि पुढच्या वर्षी २०१७ मध्ये, ती शीतल कूल प्रॉडक्ट्स लिमिटेड या पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये सूचीबद्ध झाली.

 

sheetal icecream im4

 

आज कंपनी (शीतल आईस्क्रीम) दररोज २ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करते. येथे १५०० कर्मचारी काम करतात, त्यापैकी ८०० महिला आहेत. आज कंपनी ५०० हून अधिक उत्पादने विकत आहे. शीतल उत्पादन क्षेत्रातील सर्वात मोठी नोकरदार असल्याचा भूपत दावा करतात.

भूपत कुटुंबाची पुढची पिढीदेखील आता या व्यवसायात उतरली आहे. वयाच्या फक्त २१ व्या वर्षी भूपत यांच्या पुढच्या पिढीने व्यवसायाची सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?