' ज्यावरून एवढं राजकारण तापलंय, त्या वाईनचे आरोग्यासाठी असलेले फायदे जाणून घ्या – InMarathi

ज्यावरून एवढं राजकारण तापलंय, त्या वाईनचे आरोग्यासाठी असलेले फायदे जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आज सगळीकडे लोक सर्रासपणे मद्यपान करत असले तरी आपल्या समाजात दारू पिणे ही गोष्ट चुकीचीच समजली जाते. दारूच्या व्यसनापायी लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची अनेक उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला पाहतो. पण तरीही रोजच्या आयुष्यातल्या ताणापासून सुटका करून घ्यायला कित्येकांची पावलं बारकडे वळतात. दारू पिण्याचे गंभीर परिणाम होतात हे निश्चित…

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आज अनेकजण योग्य प्रमाणात दारू पिणं पसंत करतात. बऱ्याच जणांना त्यात काही आक्षेपार्ह वाटत नाही. काही काही ठिकाणी समारंभांमध्ये शॅम्पेन उडवली जाते. त्यामुळे दारूकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन पूर्वी जितका कठोर होता तसा तो आता राहिलेला नाही. वस्तूत: जरी ती दारूच असली तरी कित्येकजण ‘बियर’, ‘वाईन’ला दारू म्हणणंही नाकारतात. हीच वाईन दुकानांमध्ये आता सहज उपलब्ध होणार अशी बातमी कळल्यावर वादाला तोंड फुटलं नसतं तर ते नवलंच होतं.

 

beer 4 inmarathi

या निर्णयामुळे अनेक तळीरामांच्या आनंदाला पारावर राहिला नसेलही, मात्र इतर अनेकांना हा निर्णय पटलेला नाही. वाईनची विक्री इतकी सहज व्हायला लागली तर व्यसनाधीनांच्या संख्येत बरीच जास्त वाढ होण्याचाही धोका उद्भवू शकतो. परिस्थिती नेमकी कशी असेल ते येणारा काळच ठरवेल. पण वाईन प्यायल्यामुळे चक्क कोरोनाचाच धोका कमी होत असेल तर? ओळखीतल्या कुणा ना कुणालातरी कोरोना झाल्याचं सारखं कानांवर पडतंय. योग्य प्रमाणात वाईन प्यायल्यामुळे या महाभयंकर आजारापासून आपलं रक्षण होऊ शकतं असा दिलासा वाईनचं सेवन करणाऱ्या सगळ्यांना संशोधकांनी दिलाय.

काही संशोधकांनी चीनमधल्या ‘शेनझेन कांगनिंग हॉस्पिटल’ येथे एक रिसर्च केला. ‘फ्रंटियर्स इन न्यूट्रिशन’ या जर्नलमध्ये हा रिसर्च प्रसिद्ध झाला. सुमारे ५ लाख यू. के. नागरिकांवर हा अभ्यास केला गेला होता. त्यातल्या साधारण १६,५५९ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. अल्कोहोल सेवनाचा आणि कोरोनाचा संसर्ग आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर यांच्यातला सहसंबंध तपासण्यासाठी हा रिसर्च केला गेला होता.

या नागरिकांपैकी ज्यांनी दिवसाला १ ते २ ग्लास रेड वाईन प्यायली होती त्यांना कोविड होण्याचा धोका इतरांपेक्षा १० ते १७ टक्के कमी असल्याचं आढळून आलं. व्हाईट वाईन आणि शॅम्पेन प्यायलेल्यांनाही कोरोना होण्याचा धोका कमी असल्याचं समोर आलं.

 

red wine inmarathi

 

ज्यांनी आठवड्यातून ५ किंवा त्यापेक्षा कमी व्हाईट वाईन प्यायली होती त्यांना हा धोका ७ ते ८ टक्के कमी असल्याचं आढळलं. पण ज्यांनी बियर, सिडर, स्पिरिट्स यांचं सांगितलं गेलं होतं त्याच्या दुप्पटीने सेवन केलं त्यांना कोविडचा संसर्ग होण्याचा धोका फार जास्त असल्याचं दिसून आलं. दारू न पिणाऱ्यांच्या तुलनेत त्यांना कोरोनाची लागण होण्याचा धोका २८ टक्क्यांपेक्षा जास्त होता. या व्यतिरिक्त ज्यांनी आठवड्यातून ५ किंवा त्यापेक्षा जास्त हार्ड अल्कोहोल ड्रिंक्सचं सेवन केलं होतं त्यांनाही कोरोना होण्याचा धोका जास्त होता.

संशोधकांच्या असं लक्षात आलं की अल्कोहोल सेवनाचा कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या दराशी काही संबंध नाही. अश्या प्रकारच्या अभ्यासातून केवळ सहसंबंध कळतो. नेमका कार्यकारणभाव नाही. त्यामुळे रेड वाईनमुळे कोरोना होण्याचा धोका का कमी होतो याचं कारण संशोधकांना अद्याप खात्रीने देता येणार नाही.

रेड वाईन प्यायलेल्या ज्यांचा ज्यांचा अभ्यास केला गेला ते कदाचित स्वतःला सुदृढ ठेवण्यासाठी भरपूर व्यायाम करणे, पोषक आहार घेणे अशी काळजी घेत असतील, त्या सगळ्यांचं वॅक्सीन घेऊन झालेलं असू शकतं. त्यामुळेही त्यांना हा धोका कमी होऊ शकतो. पण रेड वाईनमध्ये असलेल्या पॉलिफेनॉलच्या अधिक मात्रेमुळे कोरोना होण्याचा धोका कमी होत असावा असं संशोधकांचं म्हणणं आहे.

कोरोना होण्याचा धोका कमी होण्याच्या बरोबरीनेच रेड वाईन पिण्याचे इतरही फायदे आहे. त्यामुळे रक्तदाब कमी व्हायला मदत होते. सूज येण्याचं प्रमाण कमी होतं. शरीरातल्या पेशी मारल्या जाणं ज्या प्रथिनांमुळे रोखलं जातं ती प्रथिनं शरीरात सक्रिय करायलाही रेड वाईनचा उपयोग होतो.

 

high BP InMarathi

 

“अल्कोहोल सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणांमांचे लिखित पुरावे आजवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध केले गेलेले आहेत. पण निरीक्षणातून असं समोर आलेलं आहे की अल्कोहोल सेवन आणि आजार यांच्यातला सहसंबंध बऱ्याचदा सरळसरळ जोडता येत नाही. अल्कोहोलच्या कमी किंवा मर्यादित सेवनामुळे आजारांचा धोका नसतो. पण अल्कोहोलचं अतिरिक्त सेवन अपायकारण असतं.

बऱ्याच अभ्यासांमधून असं निदर्शनास आलंय की जे लोक कमी किंवा मर्यादित प्रमाणात दारूचं सेवन करतात ते दारू न पिणाऱ्यांपेक्षा अधिक काळ जगतात.”, क्सि-जियान दाई आणि याँगजुंग वॅन्ग या लेखकांनी असं म्हटलं.

आपल्या अभ्यासातल्या मर्यादा संशोधक मान्य करतात. मूलतः यु. के. मधल्या सुमारे ५ लाख लोकांचं स्वास्थ्य आणि जीवनशैली यांची माहिती गोळा करण्यासाठी २००६ पासून एक बायोबॅन्क स्टडी केला गेला होता. मात्र पँडेमिकपूर्वी लोकांची दारू पिण्याची सवय कशी होती यावरून वेगळा डेटा तयार करण्यात आला. त्यावर नव्याने अभ्यास केला गेला. पँडेमिक दरम्यान लोकांच्या दारू पिण्याच्या सवयीत जे बदल झालेले असतील ते यात समाविष्ट झालेले नाहीत. संशोधकांकडून यावर पुढे अभ्यास केला जाणार आहे.

 

drink in alcohol InMarathi

 

आपण गेली २ वर्षे सातत्याने कोरोनाशी झुंजतोय. पण वाईनसारख्या पेयामुळे आपल्याला कोरोना होण्याचा धोका कमी होत असेल यावर चटकन विश्वास बसत नाही. हा अभ्यास आणि दुकानांमधून वाईन विक्री करण्याचा नुकताच जाहीर केला गेलेला निर्णय या दोन्ही गोष्टी एकत्र येण्याचे जे परिणाम होतील ते समाजाच्या कितपत पथ्यावर पडतील हे नक्कीच पाहण्याजोगं ठरेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

 

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?