' ३४८ कोटी वर्षांपूर्वी सर्वप्रथम “या ठिकाणी” जीवसृष्टी निर्माण झाली… – InMarathi

३४८ कोटी वर्षांपूर्वी सर्वप्रथम “या ठिकाणी” जीवसृष्टी निर्माण झाली…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विज्ञानाची झपाट्याने प्रगती होत असतांना “सृष्टीची उत्पत्ती नेमकी कुठे आणि कधी झाली?” हा प्रश्न मात्र अजूनही कुतुहलच आहे. कित्येक संशोधन आजवर या विषयावर करून झाले आहेत की, विधात्याने हे जग निर्माण करून आपल्याला वापरण्यासाठी दिलं आहे हे खरं आहे. पण, त्याने सुरुवात कुठून केली असावी? आणि का?

विज्ञानाने या प्रश्नावर प्रकाश टाकण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे. ३४८ कोटी वर्षांपूर्वी पश्चिम ऑस्ट्रेलिया येथील ‘पिलबारा’ या भागात सर्वप्रथम एक जिवाणू सापडला होता असं एक सत्य नुकतंच समोर आलं आहे.

 

pilbara IM

 

‘पहिला जिवाणू हा पाण्याच्या छोट्या डबक्यात सापडला की समुद्राच्या तळाशी?’ हा या संशोधनाचा मूळ विषय होता. यापूर्वी संबंधित शास्त्रज्ञांचं असं मत होतं की, मानवाची उत्क्रांती ही ५८ लाख वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेत झाली होती.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या नवीन समोर आलेलं संशोधन हे सांगत आहे की, या आधी जगाने मान्य केलेल्या पहिल्या जिवात्म्याच्या निर्मितीच्या वर्षांपेक्षा आधी म्हणजे ३४८ कोटी वर्ष आधी ‘पिलबारा’ येथे पहिला जीवात्मा अस्तित्वात आला होता.

कोट्यावधी रुपयांचं संशोधन मूल्य खर्च करून केलेल्या या संशोधनातून नेमकं काय साध्य झालं असावं? ते जाणून घेऊयात.

पहिला जीवात्मा कधी पृथ्वीवर आढळला? यावर नुकतीच ‘डिजॉकीक’ या नेचर कम्युनिकेशनच्या लेखकाने माहिती समोर आणली आहे. त्याआधी आपल्या सर्वांना माहीत असलेला ‘चार्ल्स डार्विन’ यांचा सृष्टीच्या उत्क्रांतीचा सिद्धांत हे जग मान्य करत आलं आहे.

 

charles darwin IM

 

सर डार्विन यांच्या सिद्धांतानुसार, पहिला जीव हा समुद्राच्या पाण्याखाली तयार झाला होता. हा सिद्धांत मान्य असतांनाही पहिला जिवाणू हा जमिनीवर निर्माण झालेला असावा असं काही शास्त्रज्ञांचं मत होतं.

डिजॉकीक यांनी आपल्या लेखात म्हंटलं आहे की, “पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये प्राचीन काळापासून आढळण्यात येणारा उष्ण वसंत ऋतू लक्षात घेता तिथे जिवाणू निर्माण होणे आणि त्याला आवश्यक असलेली ऊब मिळाली असावी याची शक्यता जास्त आहे.”

पश्चिम ऑस्ट्रेलिया येथील पिलबारा येथे आढळलेल्या जिवाणूंच्या पुराव्यामुळे मंगळ ग्रहावर जगण्याची शक्यता पडताळण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे. कारण, मंगळावर सुद्धा उष्ण वसंत ऋतू असल्याची माहिती ही यापूर्वी घडलेल्या संशोधनात समोर आली आहे.

mars IM

 

जर पृथ्वीवर उष्ण वसंत ऋतूमध्ये जीव जतन केला जाऊ शकतो तर अवकाशातील ग्रहांवर सुद्धा हे घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पृथ्वीवर जीव सृष्टीचं निर्माण कधी झालं? यावर ऑकलंड विद्यापीठाने सुद्धा आपलं संशोधन केलं आहे. त्यांनी केलेल्या भूगर्भ शास्त्राच्या अभ्यासात ‘गिस्राईट’ हे खनिज सापडलं होतं. उकळलेल्या पाण्याने तयार होणारं आणि सिलिकाचं प्रमाण असलेलं ‘गिस्राईट’ हे केवळ उष्ण वसंतऋतूमध्ये तयार होत असतं.

‘गिस्राईट’चा शोध हा ४ लाख वर्षांपूर्वी लागला आहे अशी माहिती आजवर उपलब्ध होती . पण, पश्चिम ऑस्ट्रेलिया भागातील पिलबारा येथे ‘गिस्राईट’ आणि कृत्रिम पद्धतीने तयार होऊ शकणारे खडक सापडल्याने तिथे जीव सृष्टी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पिलबारा येथील जीवसृष्टीची असल्याची दाट शक्यता असण्याचं अजून एक कारण म्हणजे तिथे सापडलेलं कापडाचे अवशेष जे की फुग्याच्या आकाराच्या दगडांमध्ये व्यवस्थित जतन करून ठेवण्यात आले आहेत.

 

pilbara 2 IM

 

ऑस्ट्रेलियाच्या जीवविज्ञान शाखेचे प्राध्यापक मार्टिन वैन यांनी सुद्धा हा दावा केला आहे की, “पिलबारा मधील जिवाणू अवशेष हे पृथ्वीच्या इतिहासाची इथून सुरुवात झाली आहे याची साक्ष देतात. मंगळावर सापडलेले अवशेष आणि पिलबारा येथे सापडलेले अवशेष हे एकाच काळातील आहेत असं आमच्या संशोधनात समोर आलं आहे. त्यामुळे जीवसृष्टी ही इथून निर्माण झाली असावी.”

पिलबारा ही जागा भौगोलिक दृष्ट्या इंग्लंड देशापेक्षा सुद्धा मोठी आहे. पण, तिथली लोकसंख्या ही केवळ ६१,००० इतकीच असल्याने ही जागा पृथ्वीवरील सर्वात जास्त विखुरलेली जागा असल्याचं मानलं जातं.

तिथे निर्माण झालेले लोहयुक्त खडक बघण्यासाठी आता पर्यटक मोठ्या संख्येने तिथे जात आहेत. ज्याप्रकारे हे खडक जतन करून ठेवले आहेत ते नक्कीच नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे असंच जाणकारांना जाणवत आहे.

 

pilbara 3 IM

 

२०१९ मध्ये नासा येथील शास्त्रज्ञांनी पिलबारा येथील शोध लावलेल्या लाल खडकांमुळे आणि जमिनीखाली दडलेल्या स्वच्छ पाण्यामुळे जीवसृष्टीची इथे शक्यता वर्तवली जात आहे. ‘जगातील सर्वात जुने दगड असलेली जागा’ म्हणून सुद्धा पिलबारा ही जागा सध्या चर्चेत आहे.

जीवसृष्टीची निर्मिती कुठे झाली? हे सिद्ध होईपर्यंत आणि सिद्ध झाल्यानंतरही पिलबारा ही जागा लोकप्रिय असेल असा दावा ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन विभागाने सुद्धा केला आहे.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?