तुमच्याही घरात पैसे देणारा मनी प्लांट आहे? मग त्यामागची रंजक गोष्ट तुम्हाला माहित असलीच पाहिजे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपल्यापैकी अनेकांच्या घरात एक वनस्पती छोट्या बॉटल किंवा कुंडीत असते. जिला लोक बऱ्याचदा दुसऱ्यांच्या घरातून आणून आपल्या इथे लावतात.
ही वनस्पती सूर्याच्या प्रकाशापासून लांब राहून सुद्धा खूप वेळेपर्यंत हिरवी आणि टवटवीत दिसते.
हो तुम्ही बरोबर ओळखलंत, येथे आम्ही मनी प्लांट विषयीच सांगत आहोत.

मनी प्लांट एक अशी वनस्पती आहे, जी घरात ह्या विश्वासाने लावली जाते की, ही वनस्पती घरात पैश्याची कमी नाही होऊ देणार. ही वनस्पती लावल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येईल.
पण तुम्हाला माहित आहे का, मनी प्लांटला पैसे आणि समृद्धीच्या भरभराटीशी जोडण्यामागे एक गोष्ट आहे? चला ती गोष्ट जाणून घेऊया.
मनी प्लांटशी जोडलेली ही प्रसिद्ध लोककथा तैवानमध्ये भरपूर प्रसिद्ध आहे.
तैवानमध्ये एक गरीब शेतकरी होता. खूप कष्ट करूनसुद्धा त्याची काही प्रगती होत नव्हती. त्यामुळे तो उदास राहू लागला.
एक दिवस त्याला शेतात एक वनस्पती मिळाली, जी दिसायला थोडी वेगळी होती. शेतकरी त्या वनस्पतीला घेऊन आपल्या घरी गेला आणि त्याने ती वनस्पती घराच्या बाहेर मातीत लावली.
त्याने बघितले की, ही वनस्पती खूप लवचिक आहे आणि काही जास्त सांभाळ न करताही आपोआप वाढत आहे.

वनस्पती ज्याप्रकारे कोणत्याही मदतीशिवाय अपोआप वाढत होती, त्यावरून शेतकऱ्याला प्रेरणा मिळाली. वनस्पतीच्या या विकासाने त्याच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली.
शेतकऱ्याने निर्णय घेतला की, तो वनस्पतीसारखा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये लवचिकपणा आणेल आणि आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी स्वत:ला समर्पित करेल. तो कोणाचीही पर्वा न करता पुढे जात राहील.
लवकरच त्या वनस्पतीवर फूल आले. तोपर्यंत शेतकरी देखील आपल्या कष्टाने एक यशस्वी व्यावसायिक बनला होता.
लोकांनी शेतकऱ्याच्या यशस्वी होण्याचे गुपीत त्याच्या घराच्या बाहेर लावलेली हिरवीगार वनस्पती आहे असे जाणले. ह्याप्रकारे हळू-हळू लोकांनी तिला समृद्धीशी जोडून त्या वनस्पतीचे नाव मनी प्लांट असे ठेवले.
ह्या गोष्टी व्यतिरिक्त मनी प्लांटविषयी कित्येक दुसरे दावे प्रचलित आहेत. जे वेगवेगळया आधारावर आहेत.
फेंगशुईच्या नुसार, ही वनस्पती आजूबाजूची हवा शुद्ध करते. ही रेडिएशनचा प्रभाव कमी करते आणि ऑक्सिजन सोडते.
मनी प्लांटची गोष्ट तर तुम्हाला समजली. आता एक गोष्ट अजून लक्षात ठेवा.
कोणत्याही वस्तूवर असणारा विश्वास आपल्याला प्रत्येकवेळी बळ देतो, पण जीवनात काही मिळवण्यासाठी कष्ट करणे खूप गरजेचे आहे.
असे होऊ शकते की, मनी प्लांट तुमच्या जीवनातील, घरातील समृद्धी कायम ठेवू शकते. पण त्या समृद्धीची भरभराट करण्यासाठी कष्ट तुम्हालाच घ्यावे लागतील.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
तुम्ही वर लिहिले आहे कि मणी प्लांट ला फूल आले पण मनी प्लांट ला कसलेही फूल येत नाही.