' कधी अतिराग, तर कधी अतिचिंता : तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवायच्या ८ टिप्स!

कधी अतिराग, तर कधी अतिचिंता : तुमच्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवायच्या ८ टिप्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आजच्या या फास्ट लाईफमध्ये तणावामुळे आपल्याला अचानक राग येणे, मूड स्वींग होणे, छोट्या छोट्या गोष्टींना मनाला लावून घेणे, स्वतःच्या वागण्यावर नियंत्रण नसणे, मन शांत नसणे, झोप न येणे नकारात्मक विचार मनात येणे, आत्मविश्वास कमी होणे, एकटेपणाची भावना असणे, लोकांमध्ये मिसळण्याची भिती वाटणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

 

emotions IM

 

या लेखामध्ये आपण अशाच काही टिप्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपण आपल्या इमोशन्स नियंत्रणात ठेवू शकू. चला तर मग जाणून घेवू काय आहेत या टिप्स?

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

१. आपल्या भावनांचा आपल्यावर काय परिणाम होतो ते अभ्यासा :

आधी हे लक्षात घ्या की सगळ्याच भावना काही वाईट नसतात. काही वेळा असे होते की काही प्रसंगामध्ये आपण आपल्या भावनांवरचे नियंत्रण गमावतो, ते प्रसंग कोणते असू शकतात हे जाणून घ्या.

 

emotions 2 IM

 

उदा. नात्यांमधील तणाव, कामाच्या ठिकाणी असलेली जास्तीची जबाबदारी वगैरे… तुमच्या अनियंत्रित भावनांचा तुमच्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम होत आहे याचा आढावा घेण्यासाठी थोडा वेळ काढा, ज्यामुळे प्रॉब्लेम काय आहे ते ओळखून तुम्ही त्यावर उपाय काढू शकाल.

२. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचे निश्चित करा :

 

control your emotions IM

 

जेव्हा तुम्ही तुमच्या भावना दडपता तेव्हा तुम्ही स्वतःला व्यक्त होण्यापासून रोखता. हे जाणीवपूर्वक किंवा नकळत होवू शकते. भावनांवर नियंत्रण ठेवायला शिकत असताना किंवा त्या व्यक्त करत असताना त्या व्यक्त होण्यामध्ये संतुलन ठेवणे हा महत्वाचा मुद्दा आहे.

३. तुम्हाला काय वाटतेय ते ओळखा :

तुमचा मूड जाणून घेण्यासाठी थोडा वेळ घेतल्याने तुम्हाला पुन्हा नियंत्रण मिळवण्यास मदत होऊ शकते. एखाद्या परिस्थितीमध्ये समोरून नकारात्मक काही आल्यास आपणही तसेच व्यक्त होतो. अशावेळी त्या गोष्टीबद्दल आपल्याला काय वाटते हे समजून घेवून मगच व्यक्त व्हा.

 

mood-disorder-inmarathi
paradigmmalibu.com

४. स्वत:शी संवाद साधा :

 

talk to yourself IM

 

मला सध्या काय वाटत आहे? माझी मानसिकता काय आहे? किंवा कसे व्यक्त व्हायचे आहे? या सगळ्या गोष्टीशी मी कशा प्रकारे सामना करू शकेन ? या आणि अशा गोष्टींबद्दल स्वत:शी संवाद साधा. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यासाठी स्वत:शी बोलणे हा सर्वोत्तम उपाय आहे.

संभाव्य पर्यायांचा विचार करून, तुम्ही तुमच्या विचारात सुधारणा करू शकाल , जे तुम्हाला तुमची पहिली तीव्र प्रतिक्रिया सुधारण्यात मदत करू शकतात.

५. ऑफिसमधील काम घरी आणू नका :

 

office-worker-suffering-InMarathi

ऑफिसचे काम शक्य झाल्यास ऑफिसमध्येच करा. काही लोकांना कामाचा ताण ऐवढा असतो की ते ऑफिसचे काम घरी घेऊन जातात. यामुळे तुम्ही दिवसरात्र फक्त कामच करत राहता.

कामाचा ताण वाढत गेल्यामुळे तुमच्या मनावरील ताणही वाढू लागतो. शिवाय यामुळे तुम्ही तुमच्या घरच्या लोकांनाही पुरेसा वेळ देऊ शकत नाही. यासाठी ऑफिस मधले काम ऑफिस मधेच करा.

६. मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा :

 

Stressed girl Inmarathi

 

कोणत्याही भावनेवर ओव्हर रीअॅक्ट होणे यामागे मानसिक ताण हे मुख्य कारण असते. तेव्हा मनावर आलेला ताण रिलीज करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी मित्रांना फोन करा. मित्र-मैत्रीणींशी आणि आवडत्या व्यक्तींशी मनसोक्त गप्पा मारा.

वाचन, लेखन किंवा छंदासाठी थोडा वेळ काढा. टीव्ही बघून किंवा संगीत ऐकून स्वतःची करमणूक करा. त्यामुळे मनाला थोडी विश्रांती मिळते. लक्षकेंद्रीत होते. त्यामुळे तणाव हलका होण्यास मदत होते.

७. व्यायाम,योगा आणि प्राणायाम :

 

actress workout inmarathi

 

नियमित व्यायाम केल्याने शरीरावरील ताण कमी होतो..तुमचा मूड चांगला राहतो. व्यायाम ही शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवणारी एक नैसर्गिक अॅन्टीडिप्रेस्टंट क्रिया आहे.

व्यायामावर भर द्या, पुरेशी झोप घ्या, मेडिटेशन करा. मेडीटेशनचा मेंदूवर चांगला परिणाम होतो. खरेतर नॉन-डायरेक्टीव मेडीटेशन हे फोर्स मेडीटेशनपेक्षा अधिक प्रभावी असू शकते.

या लेखातील टिप्स मुळे तुम्ही नक्कीच तुमचा अतिराग, अतिचिंता नियंत्रणात ठेवायला शिकू शकता आणि भावनांवर नियंत्रण मिळवू शकता. लेख कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?