' या भागातील लोक जगतात १०० वर्ष , साठीत दिसतात चाळीशीचे, वाचा यामागचं सिक्रेट – InMarathi

या भागातील लोक जगतात १०० वर्ष , साठीत दिसतात चाळीशीचे, वाचा यामागचं सिक्रेट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कोणाला स्वतःला तरुण आणि सुंदर ठेवायला आवडणार नाही? वयाबरोबर तारुण्यता आणि सौंदर्य दोन्ही फिकं पडू लागतं परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पाकिस्तानमधील हुंजा येथील महिला ८० व्या वर्षातही केवळ ३०-४० वर्षांच्या दिसतात.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पाकिस्तानच्या या भागातील महिलांना जगातील सर्वात सुंदर असल्याचं म्हटलं जातं. इथल्या स्त्रिया म्हातारपणीही तरुण दिसतात, तर इथले पुरुष वयाच्या ९० व्या वर्षीही बाप होऊ शकतात.

 

hunza valley IM

 

आज काल पाकिस्तानच्या बाबतीत एखादी चांगली बातमी ऐकायला मिळणं खूपच कठीण झालं आहे. मात्र नकारात्मक बातम्या रोज कानावर येतच असतात. जसे की बॉम्बस्फोट, गोळीबार आणि दहशतवादी हल्ले यांच्याच बातम्या पाकिस्तानातून सतत येत असतात.

पाकिस्तानातील एक असा भाग आहे जो या सर्व समस्यांपासून आणि रोजच्या मानवी जीवनातील समस्यांपासून दूर आहे.

पाकिस्तानच्या हुंजा खोऱ्यातील हुंझा समुदायाचे लोक शारीरिकदृष्ट्या खूप मजबूत आहेत आणि त्यांना रुग्णालयात जाण्याची फारशी गरज पडतच नाही. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तानातील इतर लोकांचे सरासरी आयुष्य ६७ वर्षे आहे तर हुंजा येथील लोकांचे सरासरी आयुष्य १२०-१३० वर्षे आहे.\

 

hunja valley 2 IM

 

हुंजा हे उत्तर पाकिस्तानातील काराकोरम पर्वत रांगेत स्थित आहे. या समाजाच्या अनोख्या जीवनपद्धतीवर अनेक पुस्तकेही लिहिली गेली आहेत. अस मानलं जातं की, या समुदायातील लोक हे सिकंदरच्या सैन्याचे वंशज आहेत आणि हे लोक चौथ्या शतकात भारतावर आक्रमण करताना सिकंदरसोबत आले होते.

येथे राहणारे लोक हे त्यांच्या सैनिकांची वंशज आहेत असे मानले जाते आणि अशक्तपणामुळे आणि युद्धात जखमी झाल्यामुळे ते परत जाण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे या सैनिकांना सिकंदरचे सैनिक इथेच सोडून निघुन गेले, असे देखील म्हणतात.

 

sikander IM

भटक्या विमुक्त जनसमुदायाच्या वेबसाइटनुसार, या समाजातील महिला ६० ते ९० वर्षे वयापर्यंत कोणत्याही अडचणीशिवाय गरोदर राहू शकतात. एवढेच नाही तर या विशिष्ट समुदायातील महिला या जगातील सर्वात सुंदर असल्याचे देखील म्हटले जाते.

हुंजा समाजातील महिलांना जगातील सर्वात सुंदर मानले जाते. हुंजा समाजातील लोकांना बुरुशो असेही म्हणतात. ते बुरुशास्की भाषा बोलतात.

पाकिस्तानातील इतर समुदायाच्या लोकांपेक्षा हुंजा समाजाचे लोक जास्त शिक्षित असल्याचे सांगितले जाते. हुंजा खोऱ्यात हुंजा समाजाच्या लोकांची संख्या ही जवळपास ९०,००० आहे. हुंजा समाजातील लोक मुस्लिम धर्माला मानतात आणि मुस्लिम धर्माच्या सर्व परंपरा आणि प्रथा मानतात.

हुंजा खोरे हे पाकिस्तानमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पर्वतांचे सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातून लोक येथे येतात. या समुदायावर ‘द हेल्दी हुंजाज’ आणि ‘द लॉस्ट किंगडम ऑफ द हिमालय’ यासह अनेक पुस्तकेही लिहिली गेली आहेत.

 

hunza valley 2 IM

 

हुंजा समाजातील लोक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असतात. अस मानलं जातं की, त्यांची जीवनशैलीच त्यांच्या मोठ्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे.

सकाळी पाच वाजता उठणे आणि प्रवासामध्ये गाडीचा वापर कमी करतात आणि पायी जास्त चालतात. दिवसात दोनच वेळा जेवण करणे आणि त्यातही जास्तीत जास्त नैसर्गिक म्हणजेच भाज्या, दूध, फळे आणि मध यांचा समावेश असणे, हेच त्यांच्या चांगल्या आरोग्याचे रहस्य आहे.

हुंझा समुदायातील लोक सहसा फक्त जव, बाजरी, गव्हाचे पीठ खातात, ज्यामुळे त्यांना शारीरिकदृष्ट्या मजबूत होण्यास खूप मदत होते. असे म्हणतात की हे लोक क्वचितच मांसाचे सेवन करतात. इथे फक्त खास प्रसंगी मांस बनवलं जातं, पण तेही हे लोक खूप आवडीने खातात.

 

hunza valley food IM

 

हुंजा समूदायाचे लोक आहारात जर्दाळूच्या फळाचा खूप समावेश करतात. असे मानले जाते की, या फळाच्या रसाचे सेवन केल्यास ते अधिक महिने जिवंत राहतात.

जर्दाळूच्या बियांमध्ये एमीग्‍डालिन असते आणि हे व्हिटॅमिन B-17 चा एक चांगला स्रोत आहे. यामुळेच हे लोक कॅन्सर सारख्या गंभीर आजारांपासून दूर राहतात आणि चांगले, आरोग्यदायी आयुष्य जगतात.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?