' ”माझ्या ‘ब्रा’चं माप देव घेतोय”: श्वेता तिवारीचं विधान, अश्लिलतेचा कळस की स्वैराचार? – InMarathi

”माझ्या ‘ब्रा’चं माप देव घेतोय”: श्वेता तिवारीचं विधान, अश्लिलतेचा कळस की स्वैराचार?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

‘सेलिब्रिटी झालो म्हणजे उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ अशा पवित्र्यात वावरणाऱ्या सेलिब्रिटींची संख्या काही कमी नाही. मग तो बॉलिवूडकर असो वा टिव्ही मालिकांमधील अभिनेत्री!

प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी वाट्टेल ते बोलणं, मनाला येईल त्या कृती करणं याचा अधिकार मिळालेल्या एका अभिनेत्रीने नुकतंच एक धक्कादायक विधान करत पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले.

एरव्ही इंडस्ट्रीतील आपल्या शत्रुला टिकेचे लक्ष करणाऱ्या किंवा नातेसंबंधांवर टिका करणाऱ्या या अभिनेत्री श्वेता तिवारी हिने यावेळी मात्र चक्क देवावर अश्लिल टिप्पणी केलीय.

 

shweta im

 

नेमकं काय झालं?

भोपाळमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात श्वेता तिवारीने हजेरी लावली होती. आपल्या आगामी वेबसिरीजच्या घोषणेसह प्रमोशनसाठी पोहोचलेल्या श्वेताला यावेळी काही प्रश्नही विचारण्यात आले.

नेहमीच्याच तोऱ्यात प्रश्नांना उत्तरं देणाऱ्या श्वेताना ‘ब्रा’ या विषयावर प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर तिने जे काही उत्तर दिलं ते ऐकून उपस्थित पाहुण्यांसह पत्रकारही थक्क झाले.

” माझ्या ‘ब्रा’ ची साईज देव घेतो. देव आता ‘ब्रा फिटर’ झाला आहे” असं म्हणत तिने थेट देवालाच या विषयात खेचलं. रंगमंचावर हिंदू देवतांबाबत केलेली ही टिप्पणी करण्याचं धाडस करणाऱ्या श्वेतासाठी हा पब्लिसिटी स्टन्ट असला तरी तिचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मात्र तुफान व्हायरल झालाय.

 

 

संपूर्ण व्हिडीओमधील तिचे हे उत्तर एडिट करून सोशल मिडीयावर ट्रोल केले जात आहे. यात आणखी एक धक्कादायक बाब ही की या मुलाखतीत श्वेताला अभिनेता सौरभ राज जैन याने ब्रा विषयी प्रश्न विचारला होता. स्वतः सौरभ हा मालिकेत श्रीकृष्णाची भुमिका निभावतो. त्यामुळे हिंदू देवदेवतांच्या भुमिका साकारून आपलं पोट भरणाऱ्या कलाकारांना रंगमंचावर याच देवतांवर विनोद करताना ‘जनाची नाही निदान मनाची तरी…” हा प्रश्न विचारला जात आहे.

श्वेताच्या या उत्तरामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून भोपाळच्या श्यामला हिल्स पोलिस स्टेशनमध्ये तिच्या विरोधात हिंदु देवतांचा अपमान तसेच धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आली आहे.

 

shweta t im

वास्तवितः सेलिब्रिटी हे बिरूद मिरवताना अनेकजण आपल्याला फॉलो करतात, ही बाब लक्षात घेत सामाजिक भान जपणे किंवा अधिक जबाबदारीने वागणे, बोलणे अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात श्वेता तिवारी सारख्या अनेक सेलिब्रिटी प्रकाशझोतात राहण्यासाठी असल्या हीन दर्जाचे स्टन्ट्स करताना दिसतात.

श्वेताला याबाबत शिक्षा व्हावी का? श्वेताच्या शिक्षेमुळे इतर सेलिब्रिटींच्या जिबेला लगाम बसेल का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की नोंदवा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?