' ‘डोंबिवली’ शहराला कसं मिळालं हे नाव? वाचा, अजब नावाचा गजब इतिहास – InMarathi

‘डोंबिवली’ शहराला कसं मिळालं हे नाव? वाचा, अजब नावाचा गजब इतिहास

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सध्या डोंबिवली हे नाव एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या आणि सिनेमागृहात उदंड चाललेल्या पहिल्या मराठी कॉमेडी-हॉरर चित्रपट झोंबिवलीमुळे त्याच्याशी नामसाधर्म्य असणारं डोंबिवली चर्चेत आलं आहे.

 

zombi 2 im

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

डोंबिवलीत झॉम्बी अवतरले, त्यांनी याच शहरात हैदोस घातला आणि डोंबिवलीकरांनी या विचित्र परिस्थितीतून कसा मार्ग काढला? याची गंमत या सिनेमातून पहायला मिळतो. झॉम्बी आणि डोंबिवली या नावांचं गिमिक करत दिग्दर्शकांनी झॉम्बिवली नावाची निवड केली असावी असा कयास आहे. मात्र या शहराला डोंबिवली हे नाव कसंं मिळालं? याचा कधी विचार केला आहे का?

 

dombiavli im

 

ठाण्यापासून वीस किलोमिटर अंतरावर असणारं आणि कल्याणपासून सहा किलोमिटरवर असणार डोंबिवली हे उपनगर. या नगराचा उल्लेख थेट पेशवेकाळात सापडतो.

१०७५ साली राजा हरपाल देव यांनी तुर्भे बंदराजवळील माहुल गावात वसलेल्या शिलालेखाम्वर डोंबिवलीचा उल्लेख केला होता. यावरून अंदाजे ८०० वर्षांपूर्वी डोंबिवली गाव अस्तित्वात होते असं आढळतं.

१७३० साली पेशवे राजवटीत डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. पूर्वी याठिकाणी रहिवाशांच्या आधरावार परिसरांची नावे ठेवली जात, उदाहरणार्थ, अदिवासी ठाकूर समाज रहायचा तो ठाकुर्ली परिसर, पाथर्वत म्हणजेच दगडतोड करणारे ज्या परिसरात रहात तो परिसर पाथर्ली आणि ज्या परिसरात डोंब रहात तो डोंबिवली.

डोंबिवलीजवळील कोपरगाव येथे स्थायिक होणारी पहिली व्यक्ती होती, नारायण आत्माराम पाटकर. यांच्याकडे दोन जहाजे होती, जी कल्याण खाडीतून तांदूळ आणि इतर सामानाच्या वाहतुकीसाठी वापरली जात असत.

 

patkar foundation im

डोंबिवली हे गाव त्याच्या भौगोलिक स्थानामुळे लोकप्रिय बनले. महत्वाच्या बंदरांच्याजवळ वसलेलं हे शहर असून अन्नधान्य वाहून नेणारी जहाजं याठिकाणी येत असत.

पश्चिम भारतातील इतर शहरांप्रमाणेच डोंबिवलीही अठराव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगिजांच्व्या अधिपत्याखाली आले. पोर्तुगिजांच्या साम्राज्याच्या खुणा आजही याठिकाणी आढळतात.

गजबंधन गाव म्हणून अस्तित्वात आले आणि जुनी डोंबिवली जी सध्या पश्चिमेकडे आहे तिला उल्हास नदीनं विळखा घातलेला. पूर्वी या परिसरात भातशेती होती.

 

rice farming im

 

१९ व्या शतकात या शहरातील शेतकरी भातशेती करू लागले आणि इथला भात ते कल्याण, मुंबईपर्यंतच्या बाजारात नेऊन विकू लागले. त्याकाळात हा भाग दाट अशा जंगलानं वेढलेला होता. या जंगलात अनेक जंगली श्र्वापदं असल्यानं सूर्यास्तानंतर रहिवाशी घराबाहेर पडणं टाळत असत.

कालांतरानं मुंबई नगरी विस्तारत गेली आणि डोंबिवली उपनगर बनलं. सुरवातीला इथल्या रेल्वे तिकिटावर दिमाळी असा शिक्का असे. काहीकाळ याचे सुभाषनगर असे नामकरण करण्याचेही प्रयत्न झाले.

डोंबिवली स्थानकाची उभारणी १८८७ साली झाली. सुरवातीला याठिकाणी एकच उंच केबिन होती, जिचा वापर तिकिट काढण्यासाठी तसेच सिग्नलिंगसाठीही केला जात असे.

केरळपूर्वी डोंबिवलीला आशिया खंडातील सर्वात पहिले संपूर्ण साक्षर शहर होण्याचा मान लाभला होता. कला आणि संस्कृती यांचा संगम असणार्‍या या शहरानं अनेक लेखक, कलाकार आणि नाटककार दिलेले आहेत. हॉटेल, बाजारपेठा, रस्ते, नाट्यगृह अशा वेगवेगळ्या ठिकाणी आजही डोंबिवलीकरांचा सळसळता उत्साह दिसून येतो.

 

dhol im

 

तुमच्या शहरालाही असा विशेष इतिहास आहे का? अशा लेखस्वरुपात तुम्हाला हा इतिहास वाचायला आवडेल का? नक्की कमेंट करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?