' मुन्नाभाई स्टाईलप्रमाणे या बहाद्दराने कॉपी करण्याचा प्रयत्न केला पण पकडला गेला

मुन्नाभाई स्टाईलप्रमाणे या बहाद्दराने कॉपी करण्याचा प्रयत्न केला पण पकडला गेला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्हाला मुन्नाभाई आठवत असेल ना? हो तोच मुन्नाभाई एमबीबीएस, झकासपैकी कॉपी करून डॉक्टर झालेला. ‘रानी तो पप्पानी’ असं म्हणत कॅरम खेळत बसलेला पारशी बाबा, आणि मुन्नाभाईला परीक्षेच्या प्रश्नांची उत्तरं सांगणारा त्यांचा मुलगा, हा प्रसंग अजूनही सगळ्यांच्या जसाच्या तसा लक्षात असेल. तसाच रोबोट सिनेमात सुद्धा एक प्रसंग आहे. सनाला कॉपी करण्यासाठी सुपरस्टार रजनीकांतसारखा दिसणारा रोबोट मदत करतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या दोन्ही प्रसंगामध्ये पात्रांची असहायता दाखवली आहे, असं म्हणता येईल. परीक्षेत फसवणूक केली असली, तरी त्यामागे असणारा त्यांचा उद्देश अगदीच चुकीचा नव्हता. असं या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलं आहे. या दोन्ही पात्रांनी ब्लूटूथचा वापर फार चलाखपणे केलेला दाखवला आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी लढवलेली शक्कल फारच कमाल होती नाही का?

 

bluetooth inmarathi
security intilligance

 

अशीच शक्कल लढवण्याचा प्रयत्न एका परीक्षार्थीने खऱ्या जीवनात केलाय, असं जर तुम्हाला कळलं तर? आश्चर्य वाटलं ना? पण ही गोष्ट खरी आहे. एका ‘रिअल लाईफ मुन्नाभाई’ने चक्क अशीच कॉपी करण्याचा प्रयत्न केला, पण तो पकडला गेला. नेमकं काय घडलं? त्याने असं का केलं? चला जाणून घेऊयात.

उत्तर प्रदेशातील घटना

ही कॉपीची घटना घडली आहे, ती उत्तरप्रदेशातील युपी टीईटी या परीक्षेत. यंदा पेपरफुटी आणि कॉपी करणं या दोन्हीवर करडी नजर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परीक्षार्थींकडून कुठल्याही प्रकारची लबाडी, फसवणूक होणार नाही, परीक्षेत कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार घडणार नाही, याची काळजी यावेळी घेण्यात आली होती. तरीही, २३ तारखेला पार पडलेल्या या परीक्षेत एका ‘हुशार’ विद्यार्थ्याने शक्कल लढवली आणि मोठ्या शिताफीने कॉपी करण्याचा मार्ग शाधून काढला.

 

up tet im

 

सतत बोलणं महागात पडलं…

अमेठीमधील शिव प्रताप इंटरमीडिएट कॉलेजमध्ये ही घटना घडली. या कॉलेजमधून युपी टीईटीची परीक्षा देणारा एक परीक्षार्थी सतत बोलत असल्याचं तिथल्या पर्यवेक्षकाच्या लक्षात आलं. पेपर सोडवत असताना त्याचं सतत बोलणं खटकलं नसतं तरच नवल आहे म्हणा! कारण, एखाद्या ठिकाणी आपण अडलो, तरीही मनातल्या मनात विचार करतो आणि पुढे पेपर सोडवायला सुरुवात करतो. .

 

up tet im 2

 

हा परीक्षार्थी मात्र सतत स्वतःशीच बोलत आहे, हे पर्यवेक्षकांच्या लक्षात आलं. म्हणून त्याला हटकण्यात आलं. त्याचं हे बोलणं त्याला फारच महागात पडलं आणि त्याची चोरी पकडली गेली. सुरवातीला सगळ्या गोष्टी साफ नाकारणाऱ्या त्या कॉपीमास्टरला काही वेळाने मात्र रडू फुटलं.

या कानाची त्या कानाला खबर नाही…

हा परीक्षार्थी प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी चक्क ब्लूटूथचा वापर करत होता. मुन्नाभाईप्रमाणेच हा वर्गात बसून प्रश्न सांगत होता, आणि त्याचं उत्तर त्याला समोरून सांगितलं जात होतं. आता तुम्ही म्हणाल त्याने जर ब्लूटूथचा वापर केला असेल, तर हे आधी कुणाच्याही लक्षात कसं आलं नाही? कानात असलेलं ब्लूटूथ तर लगेच दिसायला हवं; पण इथेच खरी मेख आहे.

त्याने कानात अशाप्रकारे ब्लूटूथ फिट केलं होतं, की जे सहजासहजी दिसणार नाही आणि काढताही येणार नाही. त्याच्या कानात असणारं हे डिव्हाईस बाहेर काढण्यासाठी त्याला चक्क डॉक्टरांकडे घेऊन जावं लागलं. शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या एकाच चिमट्याचा वापर करून, त्याच्या कानात बसवण्यात आलेलं ब्लूटूथ डॉक्टरांनी बाहेर काढलं.

 

up tet im 1

 

या फसवणुकीबाबत वाच्यता झाली आणि हा प्रसंग पोलिसांना सुद्धा कळवण्यात आला. गैरवर्तन आणि फसवणूक करणाऱ्या त्या परीक्षार्थीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याला अटक झाली असून, याविषयी संपूर्ण आणि सखोल तपास करण्यात येणार आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?