' तुम्हाला आयडिया नसलेले रेल्वेच्या “हॉर्न”चे ११ प्रकार आणि त्यामागील कारणे! – InMarathi

तुम्हाला आयडिया नसलेले रेल्वेच्या “हॉर्न”चे ११ प्रकार आणि त्यामागील कारणे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

गाडी बुला रही है सीटी बजा राही है… हे गाणं तुम्ही ऐकलं असेलंच. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटल्याखेरीज राहणार नाही की भारतीय रेल्वे मध्ये रेल्वेच्या प्रत्येक हॉर्नचा अर्थ वेगवेगळा असतो.  काय म्हणता? तुम्हाला हे माहित नव्हतं?

चला तर मग जाणून घेऊया, हॉर्न वाजवून रेल्वेचा चालक आणि गार्ड कसा साधतात ताळमेळ. पाहूया भारतीय रेल्वेच्या वेगवेगळ्या हॉर्नचा अर्थ!

 

railway-marathipizza01

एकदा छोटा हॉर्न

चालकाने एकदा छोटा हॉर्न वाजवला की त्याचा अर्थ होतो रेल्वे यार्ड (जिथे रेल्वे धुतली जाते) मध्ये जाण्यास तयार आहे.

 

दोनदा छोटे हॉर्न

जर चालकाकडून दोनदा छोटा हॉर्न दिला गेला तर याचा अर्थ आहे, तो गार्डकडून रेल्वे चालू करण्यासाठी सिग्नल (संकेत) मागत आहे.

 

तीनवेळा छोटा हॉर्न

रेल्वे चालवत असताना जर चालक तीनवेळा छोटा हॉर्न वाजवत असेल तर त्याचा अर्थ आहे की गाडीने आपले नियंत्रण हरवले आहे, गार्डने आपल्या डब्ब्यामध्ये लावलेले वॅक्युम ब्रेक त्वरित लावावे.

 

Indian railway InMarathi

 

चारवेळा छोटे हॉर्न

रेल्वे धावत असताना थांबली आणि चालकाने जर चारवेळा छोटा हॉर्न वाजवला तर ह्याचा अर्थ हा की, इंजिनमध्ये खराबी आल्यामुळे गाडी पुढे जाऊ शकत नाही किंवा पुढे काही अपघात झाला आहे ज्यामुळे रेल्वे पुढे जाऊ शकत नाही.

 

एक लांब आणि एक छोटा हॉर्न

चालकाकडून जर एक लांब आणि एक छोटा हॉर्न दिला जात आहे, तर त्याचा अर्थ चालक गार्डला संकेत देत आहे की, रेल्वे निघण्यापूर्वी  ब्रेक पाइप सिस्टम बरोबर काम करत आहे की नाही ते तपासून घ्यावे.

 

दोन लांब आणि दोन छोटे हॉर्न

चालकाकडून जर दोन लांब आणि दोन छोटे हॉर्न दिले जात असतील तर ह्याचा अर्थ चालक गार्डला इंजिनवर येण्याचे संकेत देत आहे.

 

सारखा लांब हॉर्न

जर चालक सारखा लांब हॉर्न देत असेल तर याचा अर्थ रेल्वे न थांबता स्थानकांना पार करत आहे.

 

railway-im
livemint.com

 

थांबून – थांबून लांब हॉर्न

जर चालक थांबून– थांबून लांब हॉर्न देत असेल तर याचा अर्थ रेल्वे कोणत्यातरी रेल्वे फाटकाला पार करत आहे आणि रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना सावध करत आहे.

 

एक लांब एक छोटा, परत एक लांब, एक छोटा हॉर्न

जर चालक एक लांब एक छोटा आणि पुन्हा एक लांब एक छोटा हॉर्न देत असेल तर याचा अर्थ रेल्वे विभाजित होत आहे.

 

दोन छोटे आणि एक लांब हॉर्न

चालकाकडून जर दोन छोटे आणि एक लांब हॉर्न दिला जात असेल तर याचा अर्थ कोणीतरी रेल्वेची आपतकालीन साखळी ओढली आहे किंवा गार्डने वॅक्युम ब्रेक लावला आहे.

 

सहा वेळा छोटा हॉर्न

जर चालक सहावेळा छोटे हॉर्न देत असेल तर ह्याचा अर्थ कोणत्यातरी प्रकारचा मोठा धोका असू शकतो.

 

railway-im

 

आहे की नाही ही आजवर कधीही न ऐकलेली रंजक माहिती!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?