' लॅपटॉपवर सतत काम करून मान आखडली आहे? हे ८ सोपे उपाय नक्की करा – InMarathi

लॅपटॉपवर सतत काम करून मान आखडली आहे? हे ८ सोपे उपाय नक्की करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमची मान दुखत असल्याचे जाणवते का? किंवा दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला मान दुखीने अस्वस्थ झालेले जाणवते का? हे विचारण्यामागे कारण इतकंच आहे की, तुम्हाला मान दुखीचा त्रास आहे की नाही ते माहीत करुन घेणे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

आजकाल आपला ‘स्क्रीन टाइम’ इतका वाढला आहे, की सतत मोबाइल किंवा लॅपटॉप घेऊन एकाच स्थितीमध्ये आपण किती तरी तास बसून काम तरी करतो किंवा मोबाइल पाहतो.

 

screen time IM

 

अनेकदा आपण पाठ टेकवून खुर्चीवर बसतो किंवा बेडवर पाय पसरून बसतो; परंतु मान, खांदे आणि डोक्याचा भाग मोकळाच असतो. त्यामुळे हळूहळू तो पुढे झुकलेला असतो त्यामुळे मानेच्या शेवटच्या मणक्यांवर आणि पाठीच्या मध्यावर ताण असतो.

हा ताण आपल्या नकळत शरीरावर येतो. परिणामी, मान आखडणे, खांदे दुखणे, पाठीचे स्नायू दुखणे या तक्रारी सुरू होतात. मानदुखीचा त्रास साधारणपणे सगळ्यांना असतो. पण ही मान दुखी कधी जीवघेणी होते सांगता येत नाही.

त्यामुळेच आपण मानदुखी आणि त्यावरचे उपाय या विषयावर अधिक माहिती घेणार आहोत. चला तर मग पाहूया आखडलेली मान सरळ करण्याचे उपाय.

१. व्यायाम :

 

rakul preet singh IM

 

थोड्या थोड्या वेळाने केलेल्या छोट्या छोट्या व्यायामांमुळे, जसेकी दर दोन तासांनी मान सावकाश एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे वळवणे. हीच क्रिया १० ते १२ वेळा करणे. तसेच खुर्चीत बसल्या बसल्या मन सावकाश पुढे, मागे नेणे. यामुळे मानेला आराम मिळतो आणि स्नायूंना आलेला ताण रिलीज होतो.

२. मसाज :

 

massage IM

 

रात्री झोपण्यापूर्वी तेलाने मानेच्या दुखर्‍या भागावर हलका मसाज करावा. ज्यामुळे आखडलेले स्नायू मोकळे होतील. बाजारात अनेक प्रकारची मसाज ओइल्स मिळतात, तसेच muscle relaxant gel मिळतात त्यांचा उपयोग आपण मानेला मसाज करण्यासाठी करू शकतो.

३. झोपण्याची पद्धत :

 

aishwarya sleeping IM

 

झोपताना कुशीवर किंवा पाठीवर झोपावे. त्यामुळे मानेवर ताण येत नाही. मात्र मान दुखत असताना पोटावर झोपणे टाळावे. झोपताना जास्त उंच उशी वापरणे टाळावे.

आजकाल मानेसाठी खास डिझाईन केलेली उशी मिळते ती वापरावी.

४. कम्प्रेसर :

 

neck pain inmarathi
ReachMD

 

दोन प्रकारांनी तुम्ही मानेला शेक देवू शकता. एक म्हणजे कोल्ड कंप्रेसर आणि दूसरा हॉट कम्प्रेसर. बर्फाच्या पिशवीने 15 ते 20 मिनिटे तुमही मानेला कोल्ड शेक देवू शकता ज्यामुळे आखडलेले स्नायू सैल होतील. तसेच जर गरम पाण्याने शेक घेतलात तर स्नायूंना आराम मिळेल. त्यासाठी तुम्ही हिटिंग पॅड देखील वापरू शकता.

५. एक्यूपंक्चर :

 

accupuncture IM

 

एक्यूपंक्चरमध्ये तुमच्या शरीरावरील विशिष्ट दाब बिंदूंमध्ये सुया घालणे समाविष्ट असते. पूर्वापार चालत आलेल्या या उपचार पद्धतीच्या मदतीने हजारो वर्षांपासून आखडलेल्या मानेवर उपचार केला जात आहे.

निर्जंतुकीकरण करूनच या सुया वापरल्या जातात. एक्स्पर्टच्या मदतीने आपण हा उपचार करून घेऊ शकतो.

६. कायरोप्रॅक्टिक उपचार :

 

chiropractic theorapy IM

 

एक परवानाधारक कायरोप्रॅक्टर वेदना आराम देण्यासाठी स्नायू आणि सांधे हाताळू शकतो. मात्र अशा प्रकारची थेरपी थोडी वेदना देते म्हणून ती तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अवलंबावी.

७. तणाव कमी करा :

 

reduce stress IM

 

तणावामुळे तुमच्या मानेतील स्नायू ताणले जाऊ शकतात. तणाव कमी केल्याने मानदुखी आणि ताठरपणाचा उपचार आणि प्रतिबंध करण्यात मदत होऊ शकते.

आपण विविध मार्गांनी तणाव कमी करणे निवडू शकता, उदा. संगीत ऐकणे, ध्यान, सुट्टी किंवा विश्रांती घेणे, तुम्हाला आनंद देणारे काहीतरी करत राहणे इत्यादी.

८. स्टँडिंग पॅड :

 

standing pad IM

 

काम करण्यासाठी स्टँडिंग पॅडचा वापर करा. लॅपटॉपचा स्क्रीन तुमच्या डोळ्यांच्या रेषेत येईल असा ठेवावा. थोड्या थोड्या वेळाने बसण्याची किंवा उभे राहण्याची स्थिति बदलावी.

मित्रांनो पूर्वीच्या काळी बैलांनी मान खाली ठेवून काम करावे यासाठी त्यांच्या मानेवर जू ठेवले जात असे, ज्यामुळे नंतर सुद्धा ते बैल मान वर करून बघण्यास कुचराई करत असत.

आजकाल लॅपटॉप हा आपल्यासाठी त्या जू चेच काम करतो आहे तेव्हा वर दिलेले उपाय वेळीच अवलंबा आणि मानेच्या जखडण्यापासून मुक्त रहा.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?